Mukesh Ambani : शिक्षणातही मागे नाहीत मुकेश अंबानी! व्याही पण नाहीत कमी, परदेशातील विद्यापीठात काढले नाव

Mukesh Ambani : रिलायन्सचं साम्राज्य विस्तारणारे मुकेश अंबानी यांनी शिक्षणातही मोठी भरारी घेतली आहे. एवढेच नाही तर त्यांचे व्याही पण उच्च शिक्षित आहे. घरात व्यवसायचं बाळकडू असतानाही या सगळ्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही.

Mukesh Ambani : शिक्षणातही मागे नाहीत मुकेश अंबानी! व्याही पण नाहीत कमी, परदेशातील विद्यापीठात काढले नाव
शिक्षणातही अग्रेसर
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 4:48 PM

नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना सगळेच ओळखतात. रिलायसन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) स्थापना करणारे धीरुभाई अंबानी, त्यांचा भाऊ अनिल अंबानी, नीता अंबानी, त्यांची मुले याविषयी सर्वांनाच माहिती आहे. पण मुकेश अंबानी यांच्या शिक्षणाचा (Educational Graph) आलेखही उंचावलेला आहे. एवढेच नाही तर त्यांचे तीनही व्याही उच्च शिक्षित आहेत. तीन ही मुलांचे सासरे उच्च शिक्षित आहे. त्यांनी परदेशातील विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्याकडे विविध विषयांच्या पदव्या आहेत. उद्योगासाठी लागणारे शिक्षणाचे भांडवल त्यांच्याकडे अगोदरच आहे. रिलायन्सचं साम्राज्य विस्तारणारे मुकेश अंबानी यांनी शिक्षणातही मोठी भरारी घेतली आहे. घरात व्यवसायचं बाळकडू असतानाही या सगळ्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही.

आशियातील श्रीमंतांपैकी एक मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा विस्तार केला. त्यांनी टेलिकॉममध्ये ही जिओच्या रुपाने मोठी कंपनी स्थापन केली आहे. रिलायन्स उद्योग आज प्रत्येक व्यवसायात अग्रेसर आहे. या यशामागे जेवढे मेहनत, कष्ट आहेत. तेवढंच शिक्षणाचंही महत्व आहे. शिक्षणामुळे माणसाचे विचार, तुमची विचार करण्याची, समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

मुकेश अंबानी यांनी घरात व्यावसायिक वातावरण असताना, सूख पायाशी लोळण घेत असतानाही शिक्षणाची कास सोडली नाही. मुकेश अंबानी यांनी Institute of Chemical Technology Mumbai मधून केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर Stanford University मधून एमबीए केले आहे. 1980 मध्ये रिलायन्सची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांना भारतात परतावं लागलं. त्यांना एमबीए पूर्ण करता आले नाही.

हे सुद्धा वाचा

अजय पीरामल हे भारतातील मोठे उद्योगपती आहेत. त्यांचा मुलगा आनंद पीरामल याच्यासोबत मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचे लग्न झाले आहे. फोर्ब्सनुसार,पीरामल इंडस्ट्रीज फार्मा, हेल्थ सेक्टर आणि फायनान्स सेक्टरमध्ये सक्रिय आहे. अजय पीरामल यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. त्यांनी या विद्यापीठातून बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. मुकेश अंबानी यांच्यासोबतच त्यांनी परदेशात शिक्षण घेतले.

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांचे सासरे रसेल मेहता हे आहेत. डायमंड किंग म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा हिऱ्यांचा कारभार फार मोठा आहे. जगातील अनेक देशात त्यांच्या शाखा आहेत. ब्लू डायमंड कंपनी नावाने त्यांची कंपनी जगप्रसिद्ध आहे. रसेल मेहता यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. Gemological Institute of America (GIA) in California, USA येथून त्यांनी डायमंड ग्रेडिंगचा डिप्लोमा कोर्स केला. शिक्षणामुळे प्रगती झाल्याचे रसेल मेहता सांगतात.

वीरेन मर्चेंट हे मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचे सासरे आहेत. त्यांची मुलगी राधिका मर्चेंट हिच्याशी अनंत अंबानी याने लग्न केलेले आहे. भारतातील श्रीमंतांपैकी वीरेन मर्चेंट एक आहे. ते एनकोर हेल्थकेअर लिमिटेडचे सीईओ आहेत. वीरेन मर्चेंट यांची एकूण संपत्ती जवळपास 755 कोटी रुपये इतकी आहे. वीरेन मर्चेट हे उच्च शिक्षित आहेत. मुंबईतच त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. इंग्लंडमधील केंट विद्यापीठातून त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर ओहायो विद्यापीठातून शिक्षण घेऊन त्यांनी घरचा व्यवसाय संभाळला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.