Four Day Working : 4 दिवस काम, 3 दिवस आराम, आता इतक्या कंपन्यांमध्ये चालणार सुपरहिट फॉर्म्युला!

Four Day Working : कंपन्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अथवा त्यांना चांगेल वर्किंग कल्चर देण्यासाठी काहींना काही युक्ती करतात. सध्या 4 दिवस काम, 3 दिवस आराम हा नवीन सुपरहिट फॉर्म्युला गाजत आहे.

Four Day Working : 4 दिवस काम, 3 दिवस आराम, आता इतक्या कंपन्यांमध्ये चालणार सुपरहिट फॉर्म्युला!
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 7:19 PM

नवी दिल्ली : बहुराष्ट्रीय कंपन्या (International Companies) कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अथवा त्यांना चांगेल वर्किंग कल्चर देण्यासाठी काहींना काही युक्ती करतात. आठवड्यात केवळ 4 दिवस काम (4 Day Working Concept) 3 दिवस आराम हा नवीन सुपरहिट फॉर्म्युला गाजत आहे. इंग्लंडमधील (England) कंपन्यांनी या फॉर्म्युलावर काम करायला सुरुवात केली आहे. यासंबंधीचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. या अहवालातील बाबी अत्यंत सकारात्मक आहे. हा फॉर्म्युला यशस्वी झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अर्थात या अहवालातील निष्कर्षानंतर जगभरातील कंपन्यांना या सुपरहिट फॉर्म्युलाची भूरळ पडली आहे. अनेक कंपन्या हा प्रयोग राबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्राथमिक प्रयोगानंतर इंग्लंडमधील अनेक कंपन्यांनी हा फॉर्म्युला राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या कंपन्यांमध्ये आता कर्मचारी केवळ 4 दिवस काम 3 दिवस आराम करतील. या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. इंग्लंडमध्ये या प्रयोगाची सुरुवात गेल्या जून महिन्यात करण्यात आली होती. या प्रयोगात जवळ जवळ 61 कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

हा पायलट प्रकल्प फोर डे वीक ग्लोबल, फोर डे वीक युके कॅम्पेन आणि ऑटोनॉमी या नॉन प्रॉफिट ग्रूपने सुरु केला होता. या प्रकल्पातंर्गत जवळपास 3,000 कर्मचाऱ्यांना पाच दिवसांत पूर्ण होणारे काम केवळ चार दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या प्रकल्पाकडे सर्व जगाचे लक्ष होते. ऑक्सफोर्ड, केम्ब्रिज विश्वविद्यालयासह अनेक नामांकित विद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षण तज्ज्ञांनी या प्रकल्पात सहभाग नोंदवला होता.

हे सुद्धा वाचा

पथदर्शी प्रकल्पातील जास्तीत जास्त कंपन्या या प्रकल्पामुळे प्रभावित झाल्या आहेत. त्यांनी 4 डे वर्किंग रुल कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आकड्यांनुसार जवळपास 91 टक्के कंपन्या 4 डे वर्किंग आणि 3 डे लीवच्या बाजूने आहेत. या प्रयोगात सहभागी केवळ 4 टक्के कंपन्यांनीच हा प्रयोग राबविण्यास नकार दिला आहे. कंपन्यांना या प्रयोगात त्यांचा अनुभव शेअर करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यांना 10 ते 8.5 अंकाचे मानांकन द्यायचे होते.

या प्रकल्पात सहभागी कंपन्यांनी त्यांची उत्पादनता, कामगिरी, दर्जा यासंबंधी त्यांना या प्रयोगात काय अनुभव आले याची माहिती देणे आवश्यक होते. या ट्रायलमधील कंपन्यांनी 10 पैकी 7.5 अंकांचे मानांकन दिले आहे. महसूलाच्या दृष्टीनेही कंपन्यांना मोठा फायदा झाला. तसेच कार्यालयीन खर्चात मोठी कपात झाली. या प्रयोगाच्या दरम्यान कंपन्यांच्या महसूलात त्याच्या गेल्यावर्षीपेक्षा 35 टक्के फायदा झाला.

Four Day Work Week या प्रायोगिक प्रकल्पात बँकिंग, मार्केटिंग, रिटेल, फायनान्ससह इतर अनेक सेक्टरमधील कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या प्रकल्पात कर्मचाऱ्यांच्या आरोग्यताही मोठी सुधारणा झाल्याचे दिसून आले. प्रकल्पातील दाव्यानुसार, चार दिवसांच्या कामाच्या प्रयोगामुळे कंपन्यांमधील उत्पादन वाढले आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.