Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Jan 10, 2023 | 11:30 PM

राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत. वाचा सगळे अपडेट सुपरफास्ट...

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

देवभूमी उत्तराखंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के (Uttarakhand Earthquake )जाणवलेत. त्यामुळे भिंती, रस्ते, घरांना भेगा पडल्या आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे सगळ्याच्याच नजरा राजधानी दिल्लीकडे लागल्या आहेत. शिवाय पाकिस्तानमधील आर्थिक संकट अधिक गडद होत चाललं आहे. यासह सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडीही इथे वाचायला मिळतील. राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा (Maharashtra Breaking News Live) या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Jan 2023 03:15 PM (IST)

    हरियाणामध्ये नेहमीच चर्चेत असणारे सनदी अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा एकदा बदली

    हरियाणा : मागच्या ३० वर्षात अशोक खेमका यांची ही ५५ वी बदली आहे.

    खेमका यांना आता मुख्य सचिव म्हणून अभिलेखागार विभागात पाठविण्यात आले आहे.

    महाराष्ट्रात तुकाराम मुंडे यांची सतत बदली होत असल्यामुळे ते आता सर्वांनाच परिचित झाले आहेत. मुंडे यांच्यापेक्षाही खेमका यांच्या अधिक बदल्या झालेल्या आहेत.

    मुंडे यांच्याप्रमाणेच खेमका हे देखील आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात.

  • 10 Jan 2023 11:23 AM (IST)

    ‘शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राम्हणांनी केला’ या पुस्तकावर बंदीची मागणी

    ‘शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राम्हणांनी केला’ या पुस्तकावर बंदीची मागणी

    परशुराम सेवा संघाची पुणे पोलिसांकडे मागणी

    विलास खरात यांच्या या पुस्तकाचे 12 जानेवारीला प्रकाशन

    हे पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारं असल्याचा विश्वजित देशपांडे यांचा आरोप

  • 10 Jan 2023 11:22 AM (IST)

    प्रसिद्ध रंगभूषाकार प्रभाकार भावे यांचे आज पहाटे पुण्यात निधन

    पुण्यातील शुक्रवार पेठेतील मुलीच्या राहत्या घरी निधन,

    वयाच्या 78 वर्षी घेतला अखेरचा श्वास,

    रंगभूषाकार म्हणून त्यांनी 55 वर्ष कारकीर्द होती,

    ते गेल्या काही दिवसांपासून ब्रेनट्युमर आजाराने ग्रस्त होते.

  • 10 Jan 2023 10:43 AM (IST)

     छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल

    मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक बैठक होणार आहे

    मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या काही प्रश्न संदर्भात ही महत्त्वाची भेट मानली जातेय.

  • 10 Jan 2023 08:48 AM (IST)

    मराठवाड्यात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे घुमू लागले वारे

    औरंगाबाद : भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी,

    राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारीसाठी विक्रम काळे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा,

    प्रथमच प्रहार पक्षाकडून संजयराव तायडे पाटील लढणार मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणूक,

    शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी भरणार अर्ज,

    30 जानेवारी रोजी आठ जिल्ह्यात 61,529 मतदार बजावतील मतदानाचा हक्क.

  • 10 Jan 2023 08:25 AM (IST)

    क्रीडा कार्यक्रमात जेवायला गेलेल्या युवकाला मारहाण

    औरंगाबादमधील महसूलच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या क्रीडा कार्यक्रमात जेवायला गेलेल्या युवकाला मारहाण

    डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या कार्यक्रमात मारहाण

    मारहाण झाल्यानंतर रात्री बराच वेळ विद्यापीठात सुरू होता वादंग

    शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमातील 4 ते 5 सहभाग्यांनी युवकाला मारहाण केल्याचा आरोप

    कार्यक्रमात जेवायला बाहेरचा व्यक्ती आल्याने मारहाण केल्याचा आरोप

    युवक गंभीर जखमी, अंगावर व्रण येईपर्यंत मारहाण

  • 10 Jan 2023 08:09 AM (IST)

    कोंबड्यांची झुंज लावणे आले अंगलट ; पोलिसांनी घेतलं ताब्यात ;तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

    चंद्रपूर : कोंबड्यांची झुंजीवर पैज लावणे तेरा जणांचा चांगलेच अंगलट आले.

    पोलिसांनी कोंबड बजावर धाड टाकली.या धाडेत तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

    या प्रकरणी तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कार्यवाही मुल पोलिसांनी केली.

    कोंबड बाजारावर बंदी असली तरी जील्हात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने बाजार भरविला जातो.

  • 10 Jan 2023 07:41 AM (IST)

    अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी

    अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी

    शिवाजी रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी

    सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रांग पाहायला मिळतीये

  • 10 Jan 2023 07:36 AM (IST)

    पुण्यात यंदाच्या हंगामातील सगळ्यात निचांकी तापमानाची नोंद

    पुण्यात यंदाच्या हंगामातील सगळ्यात निचांकी तापमानाची नोंद

    तापमान 9.8 अंशावर पुणेकर थंडीने गारठले

    उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने थंडी वाढली

    उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर मराठवाड्यातही कडाक्याची थंडी पाहायला मिळतीये

    बुधवारनंतर थंडी कमी होण्याचा अंदाज आहे

Published On - Jan 10,2023 7:34 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.