Maharashtra Breaking News Live : धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांना पोलिसांची नोटीस

| Updated on: Mar 19, 2023 | 6:00 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांना पोलिसांची नोटीस
Maharashtra Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडून गेली आहे. रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. तर, दुसरीकडे मुंबईच्या वेशीवर आलेला शेतकऱ्यांचा लाँगमार्च अजूनही थांबलेला नाही. जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही, असा आक्रमक शेतकऱ्यांनी घेतला आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Mar 2023 08:44 PM (IST)

    एमपीएससी विद्यार्थी उद्या शरद पवारांना पुन्हा भेटणार

    पुणे : 

    एमपीएससी विद्यार्थी उद्या शरद पवारांना पुन्हा भेटणार

    शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी एमपीएससीचे पवारांची विद्यार्थी घेणार भेट

    शरद पवारांचे आभार मानण्यासाठी एमपीएससीचे विद्यार्थी उद्या शरद पवारांना भेटणार

    एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये शरद पवारांनी केली होती मध्यस्थी

    परीक्षा प्रणाली रद्द करण्यासाठी एमपीएससीचे विद्यार्थ्यांनी पुण्यात केलं होतं मोठे आंदोलन

    याच आंदोलनात शरद पवारांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन काढली होती समजूत

    नंतर नवीन परीक्षा प्रणाली 2025 पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे

    त्याच अनुषंगाने विद्यार्थी उद्या शरद पवारांचे आभार मानणार

    उद्या सकाळी नऊ वाजता शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी होणार भेट

    या भेटीमध्ये विद्यार्थ्यांच्या इतर समस्या बाबतीत देखील होणार चर्चा

  • 18 Mar 2023 07:07 PM (IST)

    जगभरातील अब्जाधीश का सोडतायेत त्यांचा देश

    या तीन देशांना का देत आहेत सर्वाधिक पसंती

    या तीन देशांमध्ये श्रीमंतांचं स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले

    या कारणांमुळे भारतातूनही श्रीमंतांचं पलायन

    काय मिळत आहे विशेष सोयी-सुविधा

    काय आहेत या पलायनवादा मागील कारणे, वाचा सविस्तर 

  • 18 Mar 2023 06:30 PM (IST)

    सांगली : माजी नगरसेवक खून प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा

    विक्रम ताड आणि संदीप चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा

    संदीप चव्हाण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेला व्यक्ती

    उमेश सावंत आणि विजय ताड यांच्यात सुरू होता राजकीय संघर्ष

  • 18 Mar 2023 06:06 PM (IST)

    आता प्रत्येकाच्या हाताला मिळेल काम

    20 लाख लोकांना रोजगार

    काय आहे मोदी सरकारचा मेगा प्लॅन

    या क्षेत्रात लवकरच येणार बुमिंग

    कॅबिनेटने मंजूर केले 4,445 कोटी रुपयांचे अनुदान

    या सात राज्यात उभारणार मोठे प्रकल्प, वाचा बातमी 

  • 18 Mar 2023 05:39 PM (IST)

    जळगाव : जुन्या पेन्शन योजनेसाठी अमळनेरमध्ये संपकरी कर्मचारी आक्रमक

    जुन्या पेन्शन योजनेसाठी अमळनेरमध्ये संपकरी कर्मचारी आक्रमक

    तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत संपकरी कर्मचाऱ्यांनी वेधले शासनाचे लक्ष

    मोर्चात विविध विभागातील हजारोंच्या संख्येने शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग

    जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडकला संपकरी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

  • 18 Mar 2023 05:11 PM (IST)

    डॉलरला भारतीय रुपया देणार धोबीपछाड

    आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची टशन

    अनेक देशांची व्यापारासाठी रुपयाला पसंती

    जगातील 49 देशांनी खास खाते उघडले

    अजून अनेक देश रुपयांत करणार व्यापार

    डॉलरच्या महागाईला रुपयाचे उत्तर, बातमी एका क्लिकवर 

  • 18 Mar 2023 05:06 PM (IST)

    नंदुरबार : पाचव्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी

    धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे गारपीट झाली

    तोरणमाळ हे राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण

    सातपुडाच्या डोंगर रांगांमध्येदेखील अतिवृष्टीच्या फटका बसतो

    रब्बी हंगामातील पिकांच्या यात मोठे नुकसान होणार

  • 18 Mar 2023 04:21 PM (IST)

    या सरकारी कंपनीच्या शेअरने घेतली उसळी

    चार दिवसांत या शेअरने केली कमाल

    गुंतवणूकदारांना या सरकारी कंपनीने केले मालामाल

    केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी प्रस्तावासाठी

    सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अनेक योजनांचे कंत्राट, वाचा बातमी 

  • 18 Mar 2023 04:03 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यात तुफान गारपीट

    पिशोर परिसरातील सात ते आठ गावांना गारपिटीच्या पावसाचा फटका

    जवळपास अर्धा ते एक तास झाली तुफान गारपीट

    गारांचा पाऊस पडल्यामुळे नागरिकांची झाली मोठी तारांबळ

    गहू, हरभरा, कांदा बियाणे आणि चिकूच्या बागांना बसला मोठा फटका

  • 18 Mar 2023 03:50 PM (IST)

    Lalbaugh Murder Case : आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी रिंपलला सँडविचवाल्याने मदत केली?

    Lalbaugh Murder Case : हा सँडविचवाला आणि रिंपलच्या कनेक्शनबद्दल पोलिसांना कसं कळलं? वाचा सविस्तर…..

  • 18 Mar 2023 03:48 PM (IST)

    पुणे : धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराजाला अटक करा

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

    आज मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला अंनिसने केला विरोध

    अंनिसने बागेश्वर महाराजांना अटक करण्याची मागणी केली

    तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या भोंदूबाबांचा कार्यक्रम मुंबईत घेऊ नये

  • 18 Mar 2023 03:46 PM (IST)

    परभणी : गंगाखेडमध्ये गारांसह अवकाळी मुसळधार पावसाची हजेरी

    परभणी : गंगाखेडमध्ये गारांसह अवकाळी मुसळधार पावसाची हजेरी

    वारा, विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस

    गारांसह पाऊस पडल्याने नागरिकांसह सर्वांचीच धावपळ

    शेतीतील कापूस, ज्वारी, गहू, हरभरा यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता

  • 18 Mar 2023 03:22 PM (IST)

    इम्रानच्या घरावर बुलडोजर

    पाकिस्तानातील परिस्थिती गंभीर झाली आहे. तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर राहण्यासाठी इम्रान खान आपल्या कार्यकर्त्यांसह रवाना झाले. त्याचवेळी पंजाब पोलिसांनी इम्रानच्या घराबर बुलडोझर चालवल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. सविस्तर वाचा

  • 18 Mar 2023 03:13 PM (IST)

    Ahmednagar Unseasonal Rain | अहमदनगर शहरात अवकाळी पावसाला सुरुवात

    अहमदनगर शहरात अवकाळी पावसाला सुरुवात

    तर अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

    सकाळपासून होते ढगाळ वातावरण

    पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

  • 18 Mar 2023 02:52 PM (IST)

    बागेश्वर बाबांच्या मुंबईतील कार्यक्रमाला काँग्रेसचा विरोध कायम

    बागेश्वर धाम सरकार धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा विरोध करणारे जवळपास 15 ते 20 कांग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात..

    कांग्रेस कार्यकर्ते आयोजन स्थाळात काळे झेंडे दाखवण्यासाठी येत होते ..

    कांग्रेस कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्याच्या पूर्वी घेतलं ताब्यात..

  • 18 Mar 2023 02:26 PM (IST)

    Relationship Insurance : मुलीने फसवलं, Breakup नंतर मुलाला विमा कंपनीकडून मिळाले 25 हजार रुपये

    Relationship Insurance : रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप नंतर पैसे मिळवून देणारी कुठली स्किम आहे? जाणून घ्या, त्या बद्दल. वाचा सविस्तर…..

  • 18 Mar 2023 02:22 PM (IST)

    जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी नगरमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा

    संगमनेर तहसील कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी केली‌ जोरदार घोषणाबाजी

    पेन्शनच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

    मोर्चात शिक्षक, महसूल, पंचायत समितीसह आरोग्य कर्मचारी सहभागी

    काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात भव्य मोर्चा

    बाळासाहेब थोरात यांनी घेतली मोर्चेकऱ्यांची भेट

  • 18 Mar 2023 02:20 PM (IST)

    शेतकऱ्याच्या आंदोलन स्थगिती नंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात

    वाशिंद रेल्वे स्टेशनहून विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आलीय

    सर्व शेतकऱ्यांना या रेल्वे गाडीने नाशिक स्टेशनला सोडले जाणार आहे

    सरकार दरबारी आपले म्हणणे मांडून आपल्या मागण्या शेतकऱ्यानी मंजूर करून घेतल्या

  • 18 Mar 2023 02:18 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवर पिकांचं नुकसान

    गेल्या आठ दिवसांत जळगाव जिल्ह्यात दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि वादळाने तडाखा दिलाय

    अवकाळी पावसामुळे मका, गहू पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पण अजूनही नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.

    सरकारला शेतकऱ्यांविषयी काही एक देणं घेणं नाही

    राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पाटलांची सरकारवर टीका

    सरकारने शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची जयश्री पाटलांची मागणी

  • 18 Mar 2023 02:17 PM (IST)

    अहमदनगर शहरात अवकाळी पावसाला सुरुवात

    सोलापूर शहरात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

    सकाळपासून होते ढगाळ वातावरण

    पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

  • 18 Mar 2023 02:16 PM (IST)

    सोलापूर मध्ये शिवसेनेच्या वतीने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांचा फेटे घालून सन्मान

    राज्य सरकारने लागू केलेल्या महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आलीय

    ही सवलत लागू झाल्याच्या आनंदात शिवसेनेच्या वतीने महिलांचा फेटे बांधून, पेढे भरवत सत्कार करण्यात येत आहे

    सरकारने आम्हाला खऱ्या अर्थाने सन्मान दिला आहे.

    सरकारने 50% सवलत देऊन महिलांना आधार दिलाय

    सरकारच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो

    या सवलतीमुळे 50% सवलतीमुळे आता लेकीकडच्या फेऱ्या देखील वाढतील, महिलांची प्रतिक्रिया

  • 18 Mar 2023 02:16 PM (IST)

    शहराचे नाव बदलण्याच्या निषेधार्थ मुस्लिम नुमाईंदा कमिटीची आज निदर्शने

    छत्रपती संभाजी नगर : विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होत आहेत निदर्शने,

    निदर्शनांमध्ये मुस्लिम नुमाईनदार कमिटीसह मुस्लिम समाजातील अनेक संघटना सहभागी,

    औरंगाबाद शहराचे नाव बदलल्याच्या निषेधार्थ होत आहेत निदर्शने,

    निदर्शनांमध्ये हजारो मुस्लिम समाजातील नागरिक सहभागी,

    आंदोलनासाठी पोलिसांचाही कडे कोट पोलीस बंदोबस्त.

  • 18 Mar 2023 01:36 PM (IST)

    Team India : टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटर्सनी सुपरस्टार रजनीकांत यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

    Team India : थलायवाला भेटल्याचा आनंद क्रिकेटर्सच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाचा सविस्तर….

  • 18 Mar 2023 01:12 PM (IST)

    अमरावतीत आढळले कोरोनाच्या नव्या एच 3 एच 2 व्हेरिअंटचे तीन रुग्ण

    अमरावती : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार,

    11 बेडच्या अत्याधुनिक आयसोलेशन वार्ड तयार,

    नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवाहन.

  • 18 Mar 2023 01:07 PM (IST)

    पुणे शहरातील रखडलेल्या 24 बाय 7 पाणी पुरवठा योजनेचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेणार आढावा

    पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक

    शहारात 24 तास पाणी पुरवठा योजना राबिण्यासाठी पालकमंत्री मैदानात

    गेल्या अनेक वर्षांपासून शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे

    पुणेकरांना 24 तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून प्रकल्प हाती घेण्यात आला होता

    पण अजूनही ही सेवा सुरू झाली नाही, आज पालकमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष

  • 18 Mar 2023 12:14 PM (IST)

    बागेश्वर शास्त्रींच्या कार्यक्रमाची जंगी तयारी

    बागेश्वर धाम सरकार धिरेंद्र शास्त्री यांचे दोन दिवसीय कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे..

    मोठं भलं स्टेज तसेच भाविकांना बसण्यासाठी सोय केली गेली आहे

    एक लाखापर्यंत भाविक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    गंगा जमुना सरस्वती असे नदींचे नाव बसण्याचे जागेची दिली गेली आहे.

    मुंबईत मीरारोड येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन

  • 18 Mar 2023 12:10 PM (IST)

    Babar Azam ने आपल्याच टीमला असं हरवलं, शाहीन आफ्रिदीने हिसकावला विजय VIDEO

    PSL 2023 : बाबर आजममुळेच त्याची टीम हरली. लीगमधून बाहेर झाल्यानंतर बाबर आजमने पराभवाच कारण सांगितलं. पेशावर जाल्मीच्या पराभवाला बाबर आजम स्वत: कारणीभूत आहे. वाचा सविस्तर…

  • 18 Mar 2023 11:51 AM (IST)

    राज्यातील महिला स्वच्छतागृहा संदर्भात महिला आयोगाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

    महाराष्ट्रात महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे

    राज्यभरात 1 लाख 60 हजार स्वच्छ्तागृह आहेत

    यातील 1 लाख कम्युनिटी टॉयलेट तर 60 हजार ही पब्लिक स्वच्छतागृह तसेच राज्यातील पेट्रोल पंप, मॉल मध्ये मोफत स्वच्छ्तागृह नाहीत

    विधान भवनाच्या बाहेर असणाऱ्या महिलांकरिता देखील स्वच्छ्ता गृह नसल्याकडे आयोगाने मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे

    सरकारने महिला स्वच्छतागृह या विषयावर गांभीर्याने विचार करून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे महिला आयोगानं राज्य सरकारला निर्देश दिले आहेत

  • 18 Mar 2023 11:45 AM (IST)

    रामदास कदमांच भास्कर जाधवांना आव्हान

    खेड : 40 आमदारांनी उठाव केला नसता तर आम्ही राजकारणातून संपलो असतो

    भास्कर जाधवला 2024 ला मी आमदार होऊ देणार नाही

    त्याचं आव्हान मी स्विकारलं आहे

    भास्कर जाधव हा नाच्या आहे

    त्याला मी राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही

    त्याच्या 100 पिढ्या आल्या तरी योगेश कदम संपणार नाही

    मात्र भास्कर जाधवला विधानसभेत पुन्हा जाऊ देणार नाही – रामदास कदम

  • 18 Mar 2023 11:11 AM (IST)

    राज्यभरातील कर्मचारी संपाचा आज पाचवा दिवस

    राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आजही संपावर

    सरकारी यंत्रणेवर संपाचा मोठा परिणाम

    अनेक सरकारी विभागातील कामे गेल्या पाच दिवसापासून रखडली

    संपाचा सगळ्यात जास्त फटका आरोग्य यंत्रणेला, संपामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली

    राज्यातील एकूण 32 विभागातील कर्मचारी पाच दिवसांपासून संपावर

  • 18 Mar 2023 11:07 AM (IST)

    बिसलेरी खरेदीला टाटाकडून पूर्णविराम

    चर्चा अंतिम टप्प्यात असताना बोलणी फिस्कटली

    ब्रँडच्या मूल्यांकनावरुन वाद पेटल्याची चर्चा

    चौहान कुटुंबियांना अधिक किंमत येण्याची होती आशा

    आता कंपनीचा कारभार संभाळणार का जयंती चौहान, वाचा बातमी 

  • 18 Mar 2023 11:03 AM (IST)

    मोर्चातील शेतकऱ्यांचा मृत्यु सरकारच्या हलगर्जीपणामुळे- संजय राऊत

    शेतकऱ्याच्या मृत्युचे सरकारने प्रायचीत्त घ्यावे- संजय राऊत

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यानी राज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे- संजय राऊत

    2014 मध्ये शिवसेनेने स्वाभिमानासाठी युती तोडली होती- संजय राऊत

  • 18 Mar 2023 10:51 AM (IST)

    NZ vs SL : विलियमसनच वादळ, Virat Kohli ला टाकलं मागे, क्लासिक प्लेयरची क्लासिक इनिंग, VIDEO

    NZ vs SL : विलियमसनच्या तुफानी खेळीमुळे विराट कोहली मागे पडलाय. विलियमसनच्या वादळात श्रीलंकेची वाताहात. विलियमसनच्या शतकाच्या बळावर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. वाचा सविस्तर….

  • 18 Mar 2023 10:46 AM (IST)

    केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयात हिंदुत्ववादी संघटनांची बैठक सुरू

    छत्रपती संभाजी नगर : बैठकीला सर्वच हिंदुत्ववादी संघटना झाडून उपस्थित,

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी, शिंदे गट शिवसेना यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित,

    केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि सहकार मंत्री अतुल सावे बैठकीला उपस्थित,

    उद्या छत्रपती संभाजी नगर शहरात निघणार हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा,

    मोर्चाला हैदराबादचे आमदार राजभैय्या राहणार उपस्थित,

    मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांची बैठक सुरू.

  • 18 Mar 2023 10:03 AM (IST)

    HDFC ला आरबीआयने ठोकला दंड

    इतक्या लाखांचा दंड आकारला

    नियमांचे उल्लंघन पडले महागात

    नेमके काय आहे प्रकरण

    कोणत्या कारणासाठी केली दंडात्मक कारवाई, वाचा बातमी 

  • 18 Mar 2023 09:58 AM (IST)

    Entertainment Update : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन; वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    भालचंद्र कुलकर्णी यांनी ३०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं…

    आता त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे…. वाचा सविस्तर

  • 18 Mar 2023 09:53 AM (IST)

    राज ठाकरे यांची सभा वादळी होणार

    राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली. आता निकाल काही दिवसांत येणार आहे. शिवसेनेतील या संघर्षावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. गुढीपाडव्याच्या सभेसाठी केलेल्या टिझरमधून राज ठाकरे यांच्या भूमिकेचे संकेत दिले गेले…वाचा सविस्तर

  • 18 Mar 2023 09:52 AM (IST)

    राष्ट्रवादीकडून चार फुटीर संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता

    अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी अंतर्गत हालचाली वाढल्या

    नगरचे प्रभारी अंकुश काकडे यांनी दिला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अहवाल

    राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एका मताने झाला होता पराभव

    तर चार मतं फुटल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला

    त्यामुळे या निकालाची दखल राष्ट्रवादीने घेतली असून या संदर्भात नगरचे प्रभारी अंकुश काकडे यांनी प्रदेशाकडे अहवाल पाठवला आहे

    आत हे फुटीर संचालक कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

  • 18 Mar 2023 09:46 AM (IST)

    IND vs AUS : Ravindra Jadeja ने 5 दिवसात अपयश मागे सोडलं, तासभर एकटाच बसला, बदलून टाकली गोष्ट

    रवींद्र जाडेजाने एकट्यात बसून केलेल्या विचाराचा परिणाम शुक्रवारी दिसून आला. वाचा सविस्तर….

  • 18 Mar 2023 09:45 AM (IST)

    IND vs AUS : वनडेमध्ये टीम इंडियाला लागलय सूर्यग्रहण, 15 सामन्यांपासून नुसता अंधार

    IND vs AUS : हे सूर्यग्रहण कधी संपणार? चमकण्याची संधी पुन्हा वाया घालवली. वाचा सविस्तर….

  • 18 Mar 2023 09:45 AM (IST)

    IND vs AUS : फक्त 25 चेंडूत मॅच फिरली, तिथेच ऑस्ट्रेलियाचा ‘गेम ओव्हर’ हातून असा निसटला सामना

    पहिली वनडे जिंकण्यासाठी टीम इंडियाला 25 चेंडू पुरेसे ठरले. वाचा सविस्तर….

  • 18 Mar 2023 09:44 AM (IST)

    IND vs AUS : KL Rahul-हार्दिक पंड्याने मिळून संपवला 9 वर्षांचा वनवास, पहा VIDEO

    IND vs AUS : असा कुठला वनवास होता, जो हार्दिक पंड्या आणि केएल राहुलने मिळून संपवला? वाचा सविस्तर….

  • 18 Mar 2023 09:16 AM (IST)

    सोन्या-चांदीच्या भावात जोरदार उसळी

    दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर भावात एकदम वाढ

    सोने नवीन रेकॉर्ड तयार करणार

    2 फेब्रुवारीचा सोन्याचा विक्रम मोडीत निघणार

    चांदीच्या भावात ही मोठी उसळी

    चांदीच्या किंमती 73,100 रुपयांच्या ही पुढे जाणार, वाचा बातमी 

  • 18 Mar 2023 08:58 AM (IST)

    राज्यभरातील कर्मचारी संपाचा आज पाचवा दिवस

    राज्यभरातील कर्मचारी संपाचा आज पाचवा दिवस

    राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आजही संपावर

    सरकारी यंत्रणेवर संपाचा मोठा परिणाम

    अनेक सरकारी विभागातील कामे गेल्या पाच दिवसापासून रखडली

    संपाचा सगळ्यात जास्त फटका आरोग्य यंत्रणेला, संपामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली

    राज्यातील एकूण 32 विभागातील कर्मचारी पाच दिवसांपासून संपावर

    राज्यातील बांधकाम विभाग,महसुल विभाग, कृषी विभागातील अनेक कामे रखडली

  • 18 Mar 2023 08:42 AM (IST)

    परभणी : गंगाखेडमध्ये गारांसह अवकाळी मुसळधार पावसाची हजेरी

    परभणी : गंगाखेडमध्ये गारांसह अवकाळी मुसळधार पावसाची हजेरी

    वारा, विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस

    गारांसह पाऊस पडल्याने नागरिकांसह सर्वांचीच धावपळ

    शेतीतील कापूस, ज्वारी, गहू, हरभरा यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता

  • 18 Mar 2023 08:40 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल घसरले

    कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण

    तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय

    पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या का

    केंद्र सरकार कधी करणार कर कपात

    मार्चमध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री घटली

    देशात इंधनाची मागणी घटल्याने चिंता,  वाचा बातमी 

  • 18 Mar 2023 08:33 AM (IST)

    जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन

    कोल्हापूर

    जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन

    वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    कोल्हापूरच्या कळंबा इथल्या घरी अल्पशाआजाराने झालं निधन

    अनेक मराठी चित्रपटांमध्ये बजावल्या होत्या भूमिका

  • 18 Mar 2023 08:13 AM (IST)

    शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

    पुणे परिमंडलामध्ये वीजबिलांपोटी १४६ कोटींची

    वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई

    शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

    पुणे परिमंडलातील ६ लाख ३६ हजार ५४१ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे १४६ कोटी १४ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये ५ लाख ४९ हजार ३९७ घरगुती ग्राहकांकडे ९३ कोटी ५० लाख रुपये, ७५ हजार ४७ वाणिज्यिक ग्राहकांकडे ३३ कोटी ६८ लाख रुपये तसेच १२ हजार ९७ औद्योगिक ग्राहकांकडे १८ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

  • 18 Mar 2023 07:47 AM (IST)

    जून्या पेन्शनसाठी सर्वस्तरीय कर्मचाऱ्यांनी केली शासनाच्या पत्रकाची होळी

    गोंदिया : जुन्या पेन्शनसाठी गोंदियातील 25 हजार कर्मचारी बेमुदत संपावर,

    कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने नागरीकांना होतोय प्रचंड त्रास.

  • 18 Mar 2023 07:41 AM (IST)

    औरंगाबाद नामांतराचा वाद कोल्हापूरपर्यंत

    नामांतराला विरोध करणाऱ्या पोस्टवरून पेठवडगाव परिसरात तणाव

    नामांतराला विरोध करत युवकाने ठेवली आक्षेपार्ह पोस्ट

    सावर्डे इथल्या तरुणाच्या घरावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा हल्लाबोल

    पेठवडगाव पोलीस ठाण्याबाहेरही मारला ठिय्या

    हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोस्ट प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

  • 18 Mar 2023 07:41 AM (IST)

    कोल्हापूरसाठी नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर

    कोल्हापूर

    कोल्हापूर साठी नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर

    300 विद्यार्थी क्षमता असलेल्या नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंत्रिमंडळाचे मंजुरी

    221 कोटी 48 लाखाच्या खर्चाला ही मान्यता

    येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार यांत्रिकी महाविद्यालयात सुरुवात

    उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

    नवे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी बद्दल भाजपकडून होणार आज आनंदोत्सव

  • 18 Mar 2023 07:35 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस…

    अमरावती ब्रेकिंग

    अमरावती जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस…

    अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकाच ,कांद्याच, संत्र्याच आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान…

    अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुका सह इतर भागातही पिकांना अवकाळी पावसाने झोडपले…

    पुढील दोन दिवस अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज…

  • 18 Mar 2023 07:20 AM (IST)

    पुणे शहरातून जाणाऱ्या चार महामार्गांवर आता चार्जिंग स्टेशनची सोय

    शहरातून जाणाऱ्या चार महामार्गांवर उभारणार 24 चार्जिंग स्टेशन

    इलेक्ट्रिक वाहनांसाठी महामार्गांवर आता चार्जिंगची सुविधा उपलब्ध

    भारत पेट्रोलियम कंपनीतर्फे उभारण्यात येणार महामार्गांवर चार्जिंग स्टेशन

    पुणे मुंबई महामार्ग वगळता शहरातून जाणाऱ्या चार महामार्गांवर उभे राहणार चार्जिंग स्टेशन

    या महामार्गांवर चालू होणार 24 चार्जिंग स्टेशन

    पुणे – नाशिक महामार्ग

    पुणे – कोल्हापूर महामार्ग

    पुणे – सोलापूर महामार्ग

    पुणे- नगर – छत्रपती संभाजी नगर महामार्ग

  • 18 Mar 2023 07:19 AM (IST)

    सावधान पुणे शहरात पुन्हा कोरोना वाढतोय

    सावधान पुणे शहरात पुन्हा कोरोना वाढतोय

    शहरात १५ दिवसांत कोरोनाचे १८१ नवे रुग्ण

    वातावरणातील बदलामुळे शहरात पूर्ण रुग्णसंख्या वाढण्याची भीती

    राज्यात देखील कोरोना रुग्णांच्या सक्रिय रुग्णांची संख्या ७०० च्या पार

    लसीकरणाबाबतीत देखील पुणेकरांची उदासीनता

    पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग माञ सज्ज

  • 18 Mar 2023 06:28 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझर जारी

    टिझरच्या माध्यमातून मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भाष्य

    22 तारखेला राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा

    या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष

  • 18 Mar 2023 06:27 AM (IST)

    लाल वादळ लाँगमार्चमधील एक आंदोलकांचा मृत्यू

    या आंदोलकाचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची सूत्रांची माहिती

    सरकार अजून किती बळी घेणार? शेतकऱ्यांचा आक्रोश

    अत्यवस्थ वाटत असल्याने आंदोलकर शेतकऱ्याला शहापूर रुग्णालयात केले होते भरती, उपचारा दरम्यान झाला मृत्यू

    पुंडलिक अंबादास जाधव असं या मृत शेतकऱ्याचं नाव

    माहुडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील रहिवासी

  • 18 Mar 2023 06:19 AM (IST)

    बागेश्वर बाबा मुंबईत दाखल; मिरा रोड येथे होणार कार्यक्रम

    बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे मध्यरात्री मुंबई विमानतळाहून मिरा रोड येथे कार्यक्रमासाठी भाईंदर पश्चिमेकडे असलेल्या श्री माहेश्वरी भवनात पोहचले

    धीरेंद्र शास्त्री यांचा भाईंदरच्या माहेश्वरी भवनात मुक्काम असणार आहे

    धीरेंद्र शास्त्री यांचा आजपासून दोन दिवसीय कार्यक्रम मिरा रोड येथे पार पडणार

    धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

Published On - Mar 18,2023 6:16 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.