Maharashtra Breaking Marathi News Live | खासदार गजानन कीर्तीकर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

| Updated on: May 27, 2023 | 7:20 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | खासदार गजानन कीर्तीकर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : बदलापूर, अंबरनाथ, नालासोपारा आणि विरार परिसरात पावसाच्या सरी. वातावरणात गारवा. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आजपासून भाविकांना विनापास प्रवेश दिला जात आहे. जळगावा जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कासवे ग्रामीण भागातून धनगर समाज मशाल मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना. आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा. पुण्यातील जेजुरीच्या मार्तंड देवसंस्थान समितीमधील, नवनिर्वाचित विश्वस्त निवडीचा वाद चिघळणार. जेजुरीत आज नवनिर्वाचित विश्वस्त निवडीच्या विरोधात रास्ता रोको आणि चक्री उपोषणाला सुरुवात. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 May 2023 08:43 PM (IST)

    राष्ट्रवादीने एका महिलेला शिवसेनेच्या त्या गटाला भाडेतत्त्वावर दिले : तानाजी सावंत

    राष्ट्रवादीने एका महिलेला शिवसेनेच्या त्या गटाला भाडेतत्त्वावर दिले

    तुम्हाला आमच्या विषयी बोलण्याचा अधिकार नाही

    तुमचा संपूर्ण सर्च रिपोर्ट आमच्याकडे आहे

    ज्यावेळेस आमची रणरागिनी मैदानात येईल. तेव्हा तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही

    अशी टीका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारेंवर केली आहे

  • 26 May 2023 08:22 PM (IST)

    40 लोकांचे सरकार आल्यापासून देवाच्या नावाने राजकारण : यशोमती ठाकूर

    40 लोकांचे सरकार आल्यापासून देवाच्या नावाने राजकारण

    हे सरकार आल्यापासून आम्हाला विकासासाठी एक रुपया मिळत नाही

    सगळ्यांना मिळून घेतलं तर अजून चांगल्या प्रमाणात पक्ष वाढेल

    असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे

  • 26 May 2023 08:06 PM (IST)

    सातारा जिल्ह्यातील म्हसवड परिसरात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

    सातारा जिल्ह्यातील म्हसवड परिसरात पावसाची हजेरी

    विजेच्या कडकडाटासह दोन तास पावसाची सतंतधार सुरू

    अवकाळी पावसामुळे हवेतील उष्णता कमी झाली

    मात्र या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली

  • 26 May 2023 06:26 PM (IST)

    Eknath Shinde | गजानन कीर्तीकर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

    शिवसेना-भाजप अनेक वर्ष जुने मित्र

    निवडणुकांना वेळ, सर्व काही व्यवस्थित होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

    खासदार गजानन कीर्तीकर यांच्या प्रश्नावरुन शिंदेची प्रतिक्रिया

  • 26 May 2023 06:18 PM (IST)

    New Parliament Building Inauguration | नव्या संसद भवनाचं 28 मे रोजी उद्घाटन

    नव्या संसद भवनाचं रविवारी 28 मे रोजी उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    व्हीडिओत पाहा नवीन संसद भवनाची वास्तू

  • 26 May 2023 05:56 PM (IST)

    रत्नागिरी : बनावट दारू जप्त

    राज्य उत्पादन शुल्क शाखेची चिपळूण येथे मोठी कारवाई

    गोव्यावरून येणारी 64 लाखांची बनावट दारू जप्त करण्यात आली

    चिपळूण रेल्वे स्थानकावर कारवाई करण्यात आली

  • 26 May 2023 05:35 PM (IST)

    पुढचा १०० किमीचा मार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री

    पुढचा १०० किमीचा मार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री

    समृद्धी महामार्ग करताना अनेक अडथळे मात्र करून दाखवलं

    आम्ही घरात बसून चर्चा करणारे नाही – एकनाथ शिंदे

    मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

    दिलेला शब्द पाळण्याची आमची सवय – शिंदे

  • 26 May 2023 05:26 PM (IST)

    समृद्धीचा तिसरा टप्पा मुंबईपर्यंत जाणार – देवेंद्र फडणवीस

    समृद्धीचा तिसरा टप्पा मुंबईपर्यंत जाणार – देवेंद्र फडणवीस

    ६ ते ८ महिन्यांत महामार्ग सुरू होईल – फडणवीस

    समृद्धी महामार्ग १५ जिल्ह्यांचे भाग्य बदलणार

    विकासासाठी राज्यातील मागास भाग मुंबईला जोडावा लागणार

    महामार्गाच्या भूसंपादनासाठी ठाकरे-पवार यांचा विरोध होता

  • 26 May 2023 05:19 PM (IST)

    गोपीचंद पडळकर यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    संजय राऊत यांच्यामुळे महाराष्ट्राची रोज करमणूक होते

    भाजपसोबत आलेले शिंदे गटाच्या सर्व आमदारांची स्वतंत्र ताकत

    सरकारच्या कामाच्या जोरदार 2024 मध्ये पुन्हा निवडून येतील

    उद्धव ठाकरे यांना एकमेव माणूस चांगला भेटलाय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर

    ठाकरे प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला मानतील – गोपीचंद पडळकर

  • 26 May 2023 04:51 PM (IST)

    आता मंदिरात लागू होणार ड्रेस कोड

    मदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय

    मंदिर विश्वस्तांचा एकत्रित निर्णय

    नागपूर येथे झाली बैठक, त्यात घेतला निर्णय

  • 26 May 2023 04:43 PM (IST)

    थोड्याच वेळात मुख्यमंत्री सभेला करतील संबोधित

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मांडतील विचार

    कोकमठाण या कार्यक्रमस्थळी मान्यवरांचे स्वागत

    आता मुंबई, पुणे या शहरांत पोहचणे झाले सोपे

  • 26 May 2023 04:33 PM (IST)

    शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते समृद्धीचं लोकार्पण

    701 किमी पैकी 600 किमीचे काम झाले पूर्ण

    तीन टोलनाक्यावर तीन इंटरचेंज रस्ते

    आजपासून वाहतूक सुरु झाली

    एकूण 80 किमीचा हा महामार्ग

  • 26 May 2023 04:30 PM (IST)

    समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्धघाटन

    मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

    शिर्डी ते भरवीर या 80 किमी रस्त्याचे काम पूर्ण

    23 जिल्हे समृद्धी महामार्गाने जोडल्या जाणार

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कोनशिला

  • 26 May 2023 04:27 PM (IST)

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता कार्यक्रमस्थळी

    कोकमठाण या ठिकाणी उद्धघाटन कार्यक्रम

    शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचं उद्धघाटन

    लोकार्पणासाठी शिंदे आणि फडणवीस दाखल

    तीन ठिकाणी एक्झीटची व्यवस्था

    तीन ठिकाणी टोलनाके

  • 26 May 2023 04:24 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीत दाखल

    कन्नड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रम आटोपून शिंदे शिर्डीत

    शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचं उद्धघाटन

    लोकार्पणासाठी शिंदे आणि फडणवीस दाखल

    खासदार हेमंत गोडसे यांनी केले मुख्यमंत्र्यांचं स्वागत

  • 26 May 2023 04:22 PM (IST)

    समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्धघाटन थोड्याच वेळात

    शिर्डी ते भरवीर या 80 किमी रस्त्याचे काम पूर्ण

    23 जिल्हे समृद्धी महामार्गाने जोडल्या जाणार

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कोनशिला

  • 26 May 2023 04:19 PM (IST)

    शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अन्नाची नासाडी

    लोकांकडून अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी

    वाढप्याचे प्रमाण कमी असल्याने व्यवस्थेचा बोजवारा उडाला

    कन्नड येथील कार्यक्रमात भोजन व्यवस्था कोलमडली

  • 26 May 2023 04:15 PM (IST)

    संजय राऊत यांची टेप ऐकण्याची कोणाचीच मानसिकता नाही

    राज्यात महिला मुख्यमंत्री करता आले नाही

    संसदेच्या उद्धघाटनावरुन विरोधाकांवर केली टिका

    खासदार नवनीत राणा यांचा विरोधकांवर हल्लाबोल

  • 26 May 2023 04:11 PM (IST)

    समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्यांचं आज लोकार्पण

    देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल

    कन्नड येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निघाले

    थोड्याच वेळात शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला

  • 26 May 2023 04:08 PM (IST)

    डायरी ऑफ महाराष्ट्र खोका सरकार

    असा चित्रपट बनवणार, संजय राऊत यांचा निशाणा

    राष्ट्रवादी-ठाकरे गटाच्या प्रेम संबंधांवर सैराट चित्रपट काढणार

    संजय शिरसाट यांची टीका

    माकडाच्या हाती कोलीत असा चित्रपट काढणार

    शहाजीबापू पाटील यांचा टोला

  • 26 May 2023 04:04 PM (IST)

    कर्नाटकचे मुख्यमंत्री काँग्रेस श्रेष्ठींच्या भेटीला

    सिद्धरमाय्या यांनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट

    कर्नाटकची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिल्लीत दाखल

    विविध विषयांवर चर्चा केल्याची दिली माहिती

  • 26 May 2023 03:56 PM (IST)

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार सॅम डिसूझाचा याचिकेत मोठा दावा

    ‘खंडणीप्रकरणात वानखेडेंविरोधात जबाब देण्यास सांगितलं’

    ‘शाहरुख – ज्ञानेश्वर सिंह यांची NCB ऑफिसमध्ये भेट’

    ज्ञानेश्वर सिंह यांनी १५ लाखांची मागणी केल्याचा डिसूझाचा दावा

  • 26 May 2023 03:24 PM (IST)

    पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडून टिंबर मार्केटची पाहाणी

    गुरुवारी टिंबर मार्केट मध्ये आग लागली होती

    टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीनं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं

    घटना स्थळाची पाहणी करत चंद्रकांत पाटलांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत

    महापालिका आयुक्तांनी देखील पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत

  • 26 May 2023 03:09 PM (IST)

    आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागायचं – एकनाथ शिंदे

    औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

    आमचं सरकार तुमच्या दारी – एकनाथ शिंदे

    आमचं सरकार जनतेच्या मनातलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मागेल त्याला ठिबक सिंचन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मी आणि फडणवीसांनी ठरवलं जनतेपर्यंत पोहचायचं – एकनाथ शिंदे

  • 26 May 2023 02:57 PM (IST)

    शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत

    शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत

    सभेला पैसे घेऊन गर्दी आलेली नाही

    शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत

    सभेला पैसे घेऊन गर्दी आलेली नाही

    ५४५७ कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं आहे

    सहा लाख लोकं हा कार्यक्रम ऑनलाईन पाहत आहेत.

    अतिशय चांगली तयारी आपण केली आहे

  • 26 May 2023 02:54 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला लोकं आली आहेत

    मुख्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला लोकं आली आहेत

    नंतर व्हिडीओ व्हायरल करतात

    जे खरं आहे, ते दाखवा

    आमच्याकडून कधी चूकी झाली तर नक्की दाखवा, पण  सध्याची सत्य परिस्थिती नक्की दाखवा

    आज कन्नड येथे आज कार्यक्रम आहे.

  • 26 May 2023 02:52 PM (IST)

    औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात

    मुख्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात

  • 26 May 2023 02:45 PM (IST)

    वारंवार उदघाटनं हा जनतेच्या पैशाचा अपव्यय – नितिन शिंदे

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी या उद्घाटन सोहळ्याबाबत आक्षेप घेतला आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले असताना वारंवार असे कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. जनतेच्या पैशातून भाजप-सेनेचा प्रचार सुरू असून आधी 182 गावातील जनतेला 52 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे उद्घाटन करून पाणी द्या अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आज हे कार्यकर्ते शिर्डी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून मज्जाव केलेला आहे.

  • 26 May 2023 02:30 PM (IST)

    वाळूच्या टिप्परने धडक दिल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू

    वाळूच्या टिप्परने धडक दिल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू

    घरी जात असताना टीप्पर ने दिली धडक

    गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरातील घटना

  • 26 May 2023 02:09 PM (IST)

    मुकेश अंबानी आज पुन्हा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला

    मुकेश अंबानी आज पुन्हा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला

    आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना

    मुंबई विरुद्ध लखनऊच्या सामना वेळी देखील अंबानी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला दाखल झाले होते

    मुकेश अंबानी मुलगा आकाश, सून आणि नातवंडांसह दर्शनाला

  • 26 May 2023 02:07 PM (IST)

    पहिली ते आठवीचे मुलं फक्त एकच पुस्तक घेऊन शाळेत जातील – दिपक केसरकर

    गणवेशाच्या बाबतीत काहीच कन्फ्युजन नाही.

    नवीन धोरण ठरवत असताना शाळांना त्यांचे उत्पादन थांबवण्यास सांगितले होते

    त्यामुळे आता शाळेचा एक आणि आमचा एक असे दोन गणवेश असतील

    शालेय स्तरावर स्काऊट गाईड राबणावर

    पहिली ते आठवीचे मुलं फक्त एकच पुस्तक घेऊन शाळेत जातील.

    पुस्तकात कोरी पाने जोडली आहेत.

    गणवेश धोरण जून पासून लागू होणार.

    यावर्षी शाळा समिती कडूनच गणवेश बनवून घेतले जातील.

  • 26 May 2023 02:04 PM (IST)

    संसद भवनाच्या उद्घाटनावर तीच तीच टेप रेकॉर्डर राऊत याची सुरू – नितेश राणे

    संजय राऊत याने आपल्या मालकाचा इतिहास तपासावा

    मनोहर जोशी लवकरच बरे होऊन बाहेर येतील पण ज्यांनी बाळासाहेबांसोबत शिवसेना उभी केली

    त्यांना तुझ्या मालकाने शिवसेना दसरा मेळाव्याच्या वेळी अपमानित करून पाठवली

    पार्ले येथील शिवसैनिकांना आदेश दिले होते

    अडवाणींबाबत बोलण्याचा अधिकार राऊत यांना नाही

    जुन्या शिवसैनिकांची वाईट अवस्था, उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्यामुळे झाले

    राऊत याने चंदू मास्टर यांच्या घरी जाऊन दाखवावं

    बाळासाहेबांच दुर्दैव होत म्हणून उद्धव ठाकरेंसारखा मुलगा त्यांच्या घरात जन्माला आला.

    जोशी साहेब बरे व्हावेत ही ठाकरेंची इच्छा नाही

    मालकाचा पेंग्विन मुलगा मातोश्रीच्या कुठच्या पंगतीमध्ये बसवतो ते सांग

    आता तो तुला नाही तर इतरांना नेतो, राष्ट्रीय पातळीवर तुझा पत्ता कट झालाय

    संजय राऊत याचा मनोहर जोशी कधी होणार याची आम्ही वाट पाहतोय

    दुसऱ्यांच्या अपमानाबाबत बाबत बोलण्यापेक्षा राऊत यांनी आपली मातोश्रीवरील लायकी बघावी

    ठाकरेंसोबत असलेल्या माकडांचा घोळका राहुल नार्वेकर यांना भेटण्यासाठी गेला होता

    ज्या नार्वेकरांवर टीका करतोस, त्यांच्यासोबत ठाकरेंची निष्ठवंत माकड कशी हसी मजाक करतात ते बघा

    ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तो पक्ष नाही

    तुझा मालक भामट्यांचा प्रमुख आहे.

    जागावाटप बाबत वरिष्ठ निर्णय घेतील, आमच्याच सगळा जागा येणार

    महाविकास आघाडी आणि महायुतीत फरक आहे

    90 टक्के खासदार आमचे असतील

    डायरी ऑफ दिशा सालीयन हा चित्रपट संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्या रागा पोटी काढणार आहे.

    तुझ्या मालकाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला राष्ट्वादी काँग्रेस किती जागा मिळतात ते बघ

    संजय राऊत याला कोण विचारतंय, सिंधुदूर्ग जिल्ह्यात जेवढी जागा हवी तेवढी आम्ही देऊ

    मी आणि माझं हे बोलण्याचा अधिकार राऊतला आहे का ?

    कोविडमध्ये पैसे खाल्लेस, पत्राचाळ घोटाळा केलास

    काँग्रेसची किती चाटायची याबाबत स्पर्धा लागलीय

    उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिले नाही कारण त्यांच्याकडे पक्ष नाही

    आणि संजय राऊतला स्वतःचा पक्ष माहीत नाही, नेमका राष्ट्रवादी की उबाटा

  • 26 May 2023 02:00 PM (IST)

    सर्वात लांब एक्सप्रेस वे जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात आपण निर्माण केलेला समृद्धी एक्सप्रेस – देवेंद्र फडणवीस

    समृद्धी एक ग्रोथ इंजिन आहे, शेती व्यापार कृषीसाठी चालना

    कृषी संवर्धन केंद्र हे उभारणार आहोत

    आपला जगातील सर्वात मोठा पक्ष

    नवभारताची निर्मिती केली, मोदींच्या जगात करिष्मा

    मोदींचा करिष्मा, अमेरिका राष्ट्रअध्यक्ष सही मागतात

    मोदी वैश्विक नेतृत्व, मोदींना मिळणारा सन्मान हा भारताचा सन्मान

  • 26 May 2023 01:54 PM (IST)

    शिवसेनेने विश्वासघाताचं राजकारण केले – राधाकृष्ण विखे पाटील

    उद्धव ठाकरे यांच्यावर निशाण

    कोविड काळात जग हतबल झालं, मात्र मोदींमुळे देश सावरले

    आपण बूथ लेवलला संघटन केले तर कितीही आघाड्या झाल्या तर फरक पडणार नाही

    आघाडी करतात करता यांच्या तोंडाला फेस

    सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचवा

    संघटनात्मक बाबींकडे लक्ष देण्याची गरज

    मी संपूर्ण जिल्हात दौरा करणार

    शतप्रतिशद भाजप या जिल्हात झाले पाहिजे

    राम शिंदे तुम्ही काळजी करू नका, कालही जबाबदारी माझी, उद्याही जबाबदारी माझी

    येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप जिंकल्या शिवाय राहणार नाही

  • 26 May 2023 01:52 PM (IST)

    चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचा मेव्हणा ईडीच्या रडारवर

    प्रवीण काकडे असं धानोरकर यांच्या मेव्हण्याचं नाव

    विविध पोलीस स्थानकात प्रवीण काकडे विरोधात गुन्हे दाखल आहेत का याबाबत ईडीकडून चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली विचारणा

    जिल्ह्यात चौकशीसाठी येणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची केली विनंती

    ईडीच्या नागपूर कार्यालयाने यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना पाठवले पत्र

    राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची वक्रदृष्टी वळल्याने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडण्याची शक्यता

  • 26 May 2023 01:50 PM (IST)

    नाशिकहून हैद्राबादला मेथी घेऊन जाणारा ट्रक पलटला

    बीडच्या पाली गावाजवळ घडला अपघात

    अपघातात दोघे जण गंभीर जखमी

    राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत

  • 26 May 2023 01:46 PM (IST)

    पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

    मालेगावात ग्रामीण भागातील महिलांचा हंडा मोर्चा

    पाण्यासाठी काढला हंडा मोर्चा

    भर उन्हाळ्यात 26 गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ संतप्त

  • 26 May 2023 01:46 PM (IST)

    माकडाच्या हातात कोलीत संजय राऊत असा चित्रपट काढणार – शहाजी बापू पाटील

    लवकरच माकडाच्या हातात कोलीत शहाजी बापूंचा नाव चित्रपट येणार

    संजय राऊत यांच्या महाराष्ट्र डायरी ऑफ खोका या चित्रपटला टक्कर देण्यासाठी

    मुळात संजय राऊत हे बारक्या खुराड्यात बसले आहेत

    आता संजय राऊत नेमक्या कोणत्या पक्षातून बोलत आहेत त्यांना समजत नाही

    संजय राऊत बिनबुडाचं गाडगं आहे, कुठे पण गरगळत आहे

    हे खोक खोक म्हूणन संजय राऊत दगड हाणत फिरणार

    आम्ही पण एक चित्रपट काढणार आहे

    आम्हाला किती जागा मिळणार हे संजय राऊत यांनी बोलू नये

    संजय राऊत ठाकरे गटाचा बुद्धिभेद करण्याचं काम करीत आहे

  • 26 May 2023 01:43 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादहून कन्नड येथे रवाना

  • 26 May 2023 01:40 PM (IST)

    जेजुरी ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार बेल भंडारा

    आंदोलनकर्त्यांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना खंडोबा देवाचा बेल भंडारा पोस्टाने पाठवला जाणार

    जेजुरीकरांचे गाऱ्हाणे सरकार समोर मांडण्यासाठी ग्रामस्थ पोस्टाने पाठवत आहेत बेल भंडारा

  • 26 May 2023 01:39 PM (IST)

    मोठ्या घोषणा करणाऱ्या नेत्याचं पाणीपत झालं, तो बारगळला – अनिल देशमुख

    खरेदी विक्रीत विरोधकांचा पराभव झाल्यानं त्यांनी नरखेड बाजार समितीती सभापती विरोधात अविश्वास ठराव घेतला होता

    अतिशय दुःख आहे, महासिकस आघाडीचा ठाकरे गटाने निरोप देऊन राजू हरणे यांनी ऐकले नाही

    ठाकरे गटाने  वरिष्ठांचा आदेशाचं पालन केलं नाही

    ते इंटरनॅशनल नेते त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही

    मी महाराष्ट्र स्तरावरचा नेता आहे, त्यावर बोलणार नाही

  • 26 May 2023 01:31 PM (IST)

    संजय राऊत यांची विधाने कन्फ्युजन निर्माण करणारी असतात – केसरकर

    ते भविष्य सांगणाऱ्या पोपटाप्रमाणे रोज एक कार्ड काढतात

    शिवसेनेनं महाविकास आघडीतून बाहेर पडावे ही प्रकाश आंबेडकर यांनी केलेली सूचना योग्य

    मविआ शिवसेना संपवत आहे हे खरं

    शिक्षक भरतीचा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केलीय

    न्यायालयाने त्याला 5 जूनपर्यंत स्थगिती दिलीय

    ती उठली की सर्व शाळांना शिक्षक मिळतील

    आम्ही पैसे घतेल्याचे संजय राऊत ने एकदा तरी सिद्ध करून दाखवावे

    आम्ही स्वतःला विकायला बसलो नाहीत

    संजय राऊत यांना असं बोलायला थोडी तरी लाज वाटली पाहिजे

    ज्या नेत्याने आमची काळजी घेतली, त्याच्यासोबत आम्ही आहोत

    त्यांच्याकडे कुठून आली संपत्ती, गाड्या हे त्यांना विचारा

    एकदा चर्चा झालीच पाहिजे

    आमची प्रॉपर्टी विकून आम्ही राजकारण करतो

    आम्ही धनुष्यबाण चिन्हावर लढणार

    धनुष्यबाण आणि कमळ एकत्र आले तर ताकद वाढते

    काही लोक सोबत येतील त्या दृष्टिकोनातून तयारी सुरूय

    विनायक राऊत कुणामुळे निवडून आले, हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेय

    मला दिल्लीत जाण्यात रस नाही

    मी शिक्षण मंत्री म्हणून चांगले काम करत नाही असे तुम्हाला वाटते का?

    विनायक राऊत यांच्या विरोधात लढण्याची माझी इच्छा नाही

    परंतु पक्षाने आदेश दिला तर समोर कोण हे दुय्यम

  • 26 May 2023 01:29 PM (IST)

    गणवेशाच्या बाबतीत काहीच कन्फ्युजन नाही – दिपक केसरकर

    नवीन धोरण ठरवत असतानाच शाळांना त्यांचे उत्पादन थांबवण्यास सांगितले होते

    आता शाळेचा एक आणि आमचा एक असे दोन गणवेश असतील

    शालेय स्तरावर स्काऊट गाईड राबणावर

    पहिली ते 8 वीचे मुलं फक्त एकच पुस्तक घेऊन शाळेत जातील, त्यांच्या पाठीवरील ओझे कमी होणार

    पुस्तकात कोरी पाने जोडली आहेत

    गणवेश धोरण जूनपासून लागू होणार

    यावर्षी शाळा समितीकडूनच गणवेश बनवून घेतले जातील

    पुढील वर्षीपासून राज्य सरकारच्या पातळीवर गणवेश बनवून घेतले जातील

    विरोध करण्याचे कारण नाही

  • 26 May 2023 01:22 PM (IST)

    कल्याण कोळसेवाडी परिसरातील धक्कादायक घटना

    गुंगीचे औषध देत महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार

    महिला पोलिसाला ही इंस्टाग्रामवर मैत्री पडली महागात

    लग्नाचे आमिष दाखवून पीडितेबरोबर करणे वारंवार शारीरिक संबंध

    कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 26 May 2023 01:21 PM (IST)

    सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने मटका फोड आंदोलन 

    फडणवीसांच्या दौऱ्यानंतर शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्याविरोधात आंदोलन
    सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या ढिसाळ नियोजनाविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन
    सोलापूर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मटका फोड आंदोलन करत केली निदर्शने
    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या बाबतीत कोणतीही महत्त्वाची भूमिका न घेता नवीन इमारतीच्या उद्घाटनात व्यस्त असल्याने केला निषेध
    आठवडाभरात पालिकेने सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासण्याचा इशारा
    सोलापूरकर पाणी प्रश्नावर चिंतेत असताना उपमुख्यमंत्री नूतन इमारतीच्या उद्घाटनात व्यस्त असल्याचा आरोप
  • 26 May 2023 01:19 PM (IST)

    नवी मुंबईतील तब्बल 1500 कोटी रुपयांचे ड्रग्स नष्ट केले

    कस्टम झोन तीन विभागाची मोठी कारवाई

    मुंबई कस्टम विभागाच्या वतीने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ड्रग्स नष्ट केले

    कस्टम विभागाच्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले होते ड्रग्स

  • 26 May 2023 01:18 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा आमच्यासाठी अभिमान – सुधीर मुनगंटीवार

    शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले

    100 च्या वर कार्यक्रम होतील

    अनेक संस्था यामध्ये आहेत

    शिवभक्तांनी अनेक स्थानावरील जल एकत्रित केले आहे

    1108 जलकुंभाची पूजा राज्यपाल यांच्या हस्ते झाली

    जलपूजन करून हा रथ निघतोय

    2 जूनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक नेते उपस्थित राहतील

    राज ठाकरे यांनी देखील अनुमती दिलीय

    पुढच्या शतक वर्षपर्यत ये विचार आपण पोहोचवत आहोत

    आम्ही सर्वांना निमंत्रण दिलंय

    उदयन राजे यांच्यापासून आपण सर्वाना निमंत्रण दिलंय

  • 26 May 2023 01:16 PM (IST)

    सॅम डिसूझाचा हायकोर्टात खळबळजनक दावा

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसूझाचा खळबळजनक दावा

    ज्ञानेश्वर सिंग यांना 9 लाख दिल्याचा दावा

  • 26 May 2023 01:14 PM (IST)

    अबू सालेमचा भाचा मोहम्मद आरिफ यूपी पोलिसांच्या ताब्यात

    मोहम्मद आरिफला यूपी पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात

    बनावट कागदपत्रांच्या आधारे एका महिलेची जमीन बळकावल्याचा आरोप

  • 26 May 2023 01:11 PM (IST)

    शिवसेना भाजप युतीत कोणतेही मतभेद नाहीत – फडणवीस

    लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार

    नाना पटोले, संजय राऊत बोलघेवडे लोकं

    विखे पाटी-राम शिंदेंमध्ये कोणताही वाद नाही

  • 26 May 2023 01:07 PM (IST)

    शासकीय योजनांचा वेग वाढविण्याचे फडणवीसांचे आदेश

    देवेंद्र फडणवीसांकडून नगरमधील शेती, विकासकामांचा आढावा

    जलयुक्त शिवराची मोठ्या प्रमाणात कामं झाली

    257 कामे दुसऱ्या टप्प्यात घेतली

    गाळयुक्त धरण, प्रधानमंत्री आवास योजनांअंतर्गत 18 हजार 600 घरं पूर्ण

    आता नवीन टार्गेट दुप्पट करणार

    वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय

    याची सुरवात झालेली आहे

    राळेगणसिद्धी येथे आपण सौरऊर्जा सुरु केले

    आता जिल्हात 800 फिडर ठिकाणी सुरु करणार

    आता अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांना मिळालं

    सततच्या पावसाचा निधी आपण रिलीज करतोय

    लवकरात लवकर पैसे देण्यासंदर्भात मी जिल्हाधिकारी यांना सांगितलं

    शासन आपल्या दारी ही योजना सुरु केली

    निळवंडे संदर्भात बैठलं झाली

  • 26 May 2023 01:04 PM (IST)

    पुण्यात एका पोलिसाची आत्महत्या

    पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिसाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे

    विशाल माने असं त्या पोलिसाचे नाव आहे.

    काल रात्री त्यांनी राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली

    विशाल पिंपरी परिसरात कुटुंबियांसोबत राहायचे.

  • 26 May 2023 12:58 PM (IST)

    नागपूरमध्ये प्राण्यांसाठी आईस्क्रीम पार्टी

    – नागपूरमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अनेक प्राण्यांना त्रास होत आहे.

    – या प्राण्यांसाठी बर्फावर शहद आणि आईस्क्रीम टाकून त्याचा आस्वाद दिला जात आहे.

    – नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालय आणि महाराज बाग प्राणीसंग्रहालयात असलेल्या अस्वलांसाठी ही खास व्यवस्था केली जात आहे.

    – दोन-चार दिवसातून एक वेळ असे थंड खाऊ दिला जात आहे.

    – हे प्राणी सुद्धा याची चव चाखताना दिसत आहेत.

  • 26 May 2023 12:51 PM (IST)

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सभेची जय्यत तयारी

    – समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर होणाऱ्या जाहीर सभेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

    – सभास्थानी 3 हजार लोकांची व्यवस्था असलेल्या पंडालमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी फूड पॅकेट्स तयार करण्यात आले आहेत.

    – पाण्याच्या दोन बाटल्या, कोल्ड्रिंक ,बिस्कीट पॅकेट्स असे फूड पॅकेट प्रत्येकाला दिले जाणार आहे.

    – रणरणत्या उन्हात कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

  • 26 May 2023 12:46 PM (IST)

    दुकान बंद होण्याची भीतीने सर्व एकत्र येत आहेत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

    – अडीच वर्षे फक्त फेसबुक वर सरकार होतं, त्यात महाराष्ट्राचा फार मोठे नुकसान झालं

    – आता जनतेच्या मनातल्या सरकार आल्यानंतर या सर्व योजनांना गती देण्याचा प्रयत्न करत आहे.

    – निवडणूक जवळ आला की हा प्रयोग आपल्या देशात अनेक वेळा झाला. पण प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींना जगाने स्वीकारलय

    – केजरीवाल हे पवारांबद्दल काय बोलले होते त्यांचा किती उद्धार केला आहे.

    – आपली दुकान बंद होण्याची भीतीने सर्व एकत्र येत आहेत.

    – कोणाचे किरकोळ दुकान होते कोणाचे होलसेल मध्ये होते.

    – त्यांच्याकडे कोणताही समान कार्यक्रम नाही, सर्व सत्तेकरता एकत्र येत आहेत.

    – काँग्रेसचा जनार्दन संपला आहे, महाराष्ट्रात काँग्रेसला कधी स्थान नव्हतं, हे नेहमी अधोरेखित झाले आहे.

    – आता सुद्धा महाविकास आघाडीत मुठभर लोकांना सत्ता पाहिजे होती.

    – काँग्रेस पक्ष यांनी फरपटत नेला. पक्षातील आमदार आणि कार्यकर्ते यांची काळजी कोणी केली नाही हेच काँग्रेसचे दुर्दैव आहे

  • 26 May 2023 12:31 PM (IST)

    नव्या संसद भवनातील राजदंडाचे कनेक्शन कोल्हापूर, अभ्यासकांचा दावा

    – रविवारी नवी दिल्ली इथे नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे.

    – नव्या संसद भवनात स्थापित होणाऱ्या राजदंडाचे कोल्हापूर कनेक्शन अभ्यासकांनी समोर आणलय.

    – नव्या संसद भवनात ठेवल्या जाणाऱ्या राजदंडाची प्रतिकृती कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वर वाडी इथल्या प्राचीन शिव मंदिरात पाहायला मिळते.

    – एका स्त्रीच्या हातात असलेला हा राजदंड 12 व्या शतकातील असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.

    – सत्ता आणि पुरुषत्वाचा प्रतीक असलेला नंदी या दगडी राजदंडावर आरूढ आहे.

    – सध्या चक्रेश्वर वाडीतला हा दगडी राजदंड भग्न अवस्थेत आहे.

    – मात्र नव्या संसद भवनातील राजदंडाच्या निमित्ताने चक्रेश्वर वाडीतील या राजदंडाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे…

  • 26 May 2023 12:22 PM (IST)

    राजकारणामधला प्रेम चोपडा, शिंदे गटाच्या प्रवक्त्याची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका

    – संजय राऊत याला काही ना काही बडबड करून कोणाला नांदू द्यायचं नाही.

    – त्यांनी आम्हाला जो खुराडा म्हटले आहे त्यांनी रमजानमध्ये शीर कुरमा जास्त खाल्ल्यामुळे त्यांच्यावर जास्त इफेक्ट झाला आहे.

    – ज्याची नसबंदी झालेली असते त्याला मुलं होत नाही असे म्हणतात.

    – पण, संजय राऊत असा एक चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यानंतरही आम्हाला मुले होईल असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

    – 18 खासदारांपैकी तेरा खासदार निघून गेले. पाच राहिले तरी दावा 19 चा करतात हे मूर्खपणाचे लक्षण आहे, अशी खरमरीत टीका शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलीय.

  • 26 May 2023 12:15 PM (IST)

    भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका, शिल्लक सेनेला खरंच आदर असता तर…

    – ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला, ही सध्याच्या शिल्लक सेनेची स्थिती आहे.

    – संधीसाधू राजकारणाचा काँग्रेसचा गुण शिल्लक सेनेच्या नसानसात भरलेला दिसत आहे.

    – संजय राऊत यांना काँग्रेसची झिंग चढली आहे. त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भाजपाने केले, एनडीएने केले.

    – राष्ट्रपती मुर्मू यांच्याबद्दल शिल्लक सेनेला खरंच आदर असता तर त्यांना खुल्या मनाने पाठिंबा दिला असता.

    – खासदार राहुल शेवाळे यांना जाहीर भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांना स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी मुर्मू यांना पाठिंब्याची भूमिका घेतली, असा टोला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

  • 26 May 2023 12:07 PM (IST)

    2019 ला जागावाटप होते तेच कायम रहाणार, शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

    – महाविकास आघाडी सरकारमध्ये आमची कामे झाली पाहिजे, आम्हाला सापत्नक वागणूक दिली जातेय अशा भावना होत्या.

    – संजय राऊत बसल्या बसल्या मनोरंजन करतात. उपमर्द करणारी भाषा आणि ते जे बोलतात त्याला अर्थ नाही आम्ही त्याला फार गांभीर्याने घेत नाही.

    – आम्ही उद्धवजींना सांगितले होते एकत्र येऊ, परंतु आता सर्व संपले आहे.

    – एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्यामुळे आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत.

    – त्यामुळे जागा वाटप जे 2019 ला होते तेच राहणार आहे, असा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी केलाय.

  • 26 May 2023 12:01 PM (IST)

    कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही जागांवर उद्धव ठाकरे गटाचा दावा

    – कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लढल्या आणि जिंकल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही जागा आमच्या आहेत असा दावा उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी केला आहे.

    – हुकूमशाही, दादागिरी आणि दडपशाहीचे सरकार देशभरात आतापर्यंच्या इतिहासात पाहिलं नव्हतं. त्यांना थांबवलं नाही तर लोकशाही धोक्यात येईल.

    – भाजप आणि मिंदे गटाचा उमेदवार इथे निवडून येणार नाही हेच आमचे ध्येय असेल.

    – शिंदे गट, भाजपमध्ये उदासीनता असून कर्नाटकात जे घडले तेच महाराष्ट्रात घडणार आहे.

    – 22 जागा लढण्याबाबत ते गंमत करत असतील, 22 जागा मागण्याइतके तुमच्याकडे उमेदवार आहेत का? असा सवाल संजय पवार यांनी केला.

    – आम्ही भक्कम आहोत ते दाखवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असेल पण भाजप त्यांना जास्त जागा देणार नाही.

  • 26 May 2023 11:57 AM (IST)

    आपचे नेते सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर

    सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात झाली होती अटक

    वैद्यकीय कारणास्तव सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर

    सत्येंद्र यांना दिलासा

  • 26 May 2023 11:47 AM (IST)

    शिंदेंचा पक्ष नव्हे तर कोंबड्यांच खुराड – संजय राऊत

    भाजपन कोंबड्यांच्या खुराडाला पाळलयं- संजय राऊत

    आमचा 19 खासदारांचा आकडा कायम – संजय राऊत

  • 26 May 2023 11:41 AM (IST)

    गोंदियात NCP च्या नगराध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

    गोंदियात NCP च्या नगराध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

    मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पक्ष प्रवेश

    नगराध्यक्षांसोबतच कार्यकर्तेसुद्धा देणार NCP ला सोडचीठ्ठी

  • 26 May 2023 11:21 AM (IST)

    अहमदनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

    आज उपमुख्यमंत्र्याचा अहमदनगर दौरा

    उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय इमारतींचे लोकार्पण

    समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी शिर्डीत होणार दाखल

  • 26 May 2023 11:12 AM (IST)

    जेजुरीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला सुरूवात

    जेजुरी देवस्थान विश्वस्त पदाच्या निवडणूकी विरोधात ग्रामस्थ आक्रमक

    जेजुरीत आज रास्ता रोको आणि चक्री उपोषण

  • 26 May 2023 11:07 AM (IST)

    नरखेड बाजार समितीमध्ये कोण बाजी मारणार?

    आशिष देशमुख आणि अनिल देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला

    नागपूरातील काटोल मतदार संघात वर्चस्वाची लढाई

    बाजार समिती सभापतीविरोधात आशिष देशमुख यांचा अविश्वास प्रस्ताव

  • 26 May 2023 10:48 AM (IST)

    नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यास विरोध योग्य नाही – राजनाथ सिंह

    नवीन संसदेचे उद्घाटन हा ऐतिहासिक दिवस असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

    निषेधासाठी हा प्रसंग योग्य नाही.

    विरोधी पक्षांनी सहभाग घ्यावा. हेच आवाहन करेन.

    राष्ट्रपतींना यात ओढता कामा नये.

  • 26 May 2023 10:45 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबादच्या कन्नड दौऱ्यावर

    शासन आपल्या दारी महासंकल्प कार्यक्रमाला लावणार हजेरी

    लाखो लोकं राहणार उपस्थित

  • 26 May 2023 10:34 AM (IST)

    समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन

    शिर्डी ते इगतपुरीजवळील भरवीर या ८० किमी महामार्गाचे होणार लोकार्पण

  • 26 May 2023 10:27 AM (IST)

    लवकरच 75 रुपयांचे नाणे बाजारात दाखल होणार

    संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सरकार 75 रुपयांचे विशेष नाणे बाजारात आणणार आहे.

    वित्त मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

  • 26 May 2023 10:16 AM (IST)

    वकिलाच्या सल्ल्यानंतर पुढील निर्णय घेणार – आशिष देशमुख

    आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर

    देशमुखांची काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी हकालपट्टी

    वकिलाच्या सल्ल्यानंतर पुढील निर्णय घेणार, आशिष देशमुख यांनी केले स्पष्ट

    माझ्या हकालपट्टीचा निर्णय गैरसंविधानिक

  • 26 May 2023 10:10 AM (IST)

    शिंदेचा पक्ष नव्हे ते तर कोंबड्यांचं खुराडं, संजय राऊत यांची टीका

    भाजपाने कोंबड्यांचं खुराडं पाळलं आहे

    शिंदे गटाच्या कोंबड्या कधीही कापल्या जातील

    शिंदेना लोकसभेच्या 5 जागा मिळाल्या तरी खूप आहेत.

  • 26 May 2023 10:08 AM (IST)

    भारतातील लोकशाही कुठे आहे ? संजय राऊत यांचा सवाल

    राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना निमंत्रण का नाही ?

    भाजपाला ज्या लालकृष्ण आडवाणी यांच्यामुळे अच्छे दिन आले, ते कुठे आहेत ? त्यांना निमंत्रण का मिळाले नाही ?

    संसदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा फक्त एका पक्षापुरताच आहे का ?

  • 26 May 2023 10:03 AM (IST)

    संसदेविषयीचा निर्णय नैतिकतेचा – संजय राऊत

    उद्घाटनच्या कार्यक्रमाला आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही

    निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचेही नाव नाही

    राष्ट्रपती आणि संविधान यांचा सन्मान राखावा, संजय राऊत यांची मागणी

  • 26 May 2023 09:59 AM (IST)

    GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : मुंबई इंडियन्ससाठी खरा क्वालिफायर सामना फक्त 12 ओव्हर्सचा असेल, कसा?

    GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा फैसला फक्त 12 ओव्हरमध्ये होईल. याच 12 ओव्हर सामन्याची दिशा ठरवतील. या सीजनमध्ये मुंबई आणि गुजरातची टीम तिसऱ्यांदा आमने-सामने असेल. वाचा सविस्तर….

  • 26 May 2023 09:58 AM (IST)

    Rohit Sharma IPL 2023 : लखनऊ विरुद्ध मुंबई जिंकली, पण रोहितचा एक निर्णय सेहवागला अजिबात नाही आवडला

    Rohit Sharma IPL 2023 : वीरेंद्र सेहवागने स्पष्टपणे रोहितच्या त्या निर्णयावर नाराजी बोलून दाखवली. रोहित शर्माने मॅच दरम्यान अशी कुठली गोष्ट केली, जी सेहवागला अजिबात नाही आवडली. वाचा सविस्तर…..

  • 26 May 2023 09:57 AM (IST)

    GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : आज मॅचच्या सुरुवातीलाच मुंबईसमोर मोठा धोका, हाच अडथळा करावा लागेल पार

    GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : गुजरातच एक प्लेयर मुंबई इंडियन्सवर भारी पडू शकतो. सामन्याच्या सुरुवातीलाच तो जास्त घातक आहे. मुंबई या धोक्याच आव्हान कसं परतवून लावते, त्यावर बरच काही अवलंबून आहे. वाचा सविस्तर….

  • 26 May 2023 09:57 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांचा जलाभिषेक

    शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जलाभिषेक

    देशातील विविध ठिकाणाहून आणण्यात येणार पवित्र स्थानांचे जल

    हे जल रथ यात्रेच्या माध्यमातून पोहोचणार रायगडावर

    सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

  • 26 May 2023 09:52 AM (IST)

    शिवशाही बसचा विचित्र अपघात

    पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात

    सुदैवाने 25 प्रवासी बचावले

    ब्रेक फेल झाल्यानं थेट फुटपाथवर

    फुटपाथच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली

    बसचं धडकेत मोठं नुकसान तर झाडंही जागच्या जागी आडवं झालं

    सकाळी 7 वाजता झाला अपघात

    संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकातली घटना

  • 26 May 2023 09:49 AM (IST)

    बारावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज

    बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज भरता येणार

    जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार

    परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना 29 मे ते 9 जूनदरम्यान नियमित शुल्कासह,

    तर 10 जून ते 14 जूनदरम्यान विलंब शुल्कासह शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरता येणार

    राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांची माहिती

  • 26 May 2023 09:45 AM (IST)

    माहेरवासीन असणाऱ्या लेकींचा सन्मान

    इचलकरंजी शहरातील सरस्वती गणेशोत्सव मंडळ व युवक मंडळाच्या वतीने यांच्या वतीने माहेरवासीन असणाऱ्या लेकींचा सन्मानाचा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम घेऊन सुमारे 100 हून अधिक लेकिनचा सन्मान करण्यात आला

  • 26 May 2023 09:40 AM (IST)

    हिंगोलीत वर्षभरात 225 जणांचा अपघाती मृत्यू

    हिंगोली जिल्ह्यात रस्ते चांगले होऊनही वाहतूक नियमाला बगल दिल्याने सर्वाधिक अपघात घडत आहेत.हिंगोली जिल्ह्यात मे 2022 ते 23 मे 2023 या वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी 341अपघात झाले त्यात 225 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 450 जखमी झालेत आहेत

  • 26 May 2023 09:34 AM (IST)

    गावडेवाडी वनदेव डोंगराला वनवा

    पुणे  जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथे वनदेव डोंगराला वनवा

    सुमारे 3 ते 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर संपूर्ण आग आटोक्यात

    वन खाते व बिबट रेस्क्यू टीमला वनवा विझवण्यात आले यश

  • 26 May 2023 09:26 AM (IST)

    मुंबईतील अनेक भागांत पाऊस

    मुंबई उपनगरातील कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि बोरिवलीच्या काही भागात पाऊस
    पावसाच्या हलक्या सरी पडल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला
    वाळवीच्या पावसामुळे आर्द्रताही वाढली आहे
  • 26 May 2023 09:19 AM (IST)

    पुणे नाशिक महामार्गावर अपघात

    पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील पुणे नाशिक महामार्गावर प्रवाशी रिक्षाला कारने जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती .खेड पोलिसांनी तातडीने येऊन वाहतूक कोंडी सोडवली.

  • 26 May 2023 09:12 AM (IST)

    समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण

    महाराष्ट्रातील तब्बल 24 जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामर्गाचे शिर्डी ते भरविर या 80 k.m च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.

  • 26 May 2023 09:06 AM (IST)

    फडणवीस नगरला जाणार

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच वेळात अहमदनगरच्या दिशेने होणार रवाना

    समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटनासाठी फडणवीस नगरला जाणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे होणार उद्घाटन

  • 26 May 2023 08:56 AM (IST)

    उत्तर प्रदेश | नोएडातील कसना पोलीस स्टेशन परिसरात बस आणि ट्रक यांच्यात धडक

    धडकेत एकाचा मृत्यू, 28 जण जखमी

  • 26 May 2023 08:48 AM (IST)

    देहू संस्थानकडून पालखी सोहळा प्रमुखांची नावे जाहीर

    देहू संस्थानकडून तीन पालखी सोहळा प्रमुखांची निवड

    संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे आणि भानुदास महाराज मोरे यांची निवड

    संपूर्ण वारी सोहळ्याचे नियोजन हे या पालखी सोहळा प्रमुखाकडे प्रामुख्याने असणार

    देहू ते पंढरपूर पायी वारी सोहळा सुनियोजितपणे पार पाडावा यासाठी ही निवड

  • 26 May 2023 08:40 AM (IST)

    मुंबईतील कस्तुरबा पोलिसांकडून पाच जणांना अटक

    चोरीच्या संशयावरून एका 29 वर्षीय तरुणाला केली होती बेदम मारहाण

  • 26 May 2023 08:33 AM (IST)

    वेताळ टेकडीवर बांधकाम तात्काळ थांबवण्याचे नीलम गोऱ्हे यांचे आदेश

    वेताळ टेकडीवर 250 काँक्रीट पोल्स उभे करण्याचे काम सुरू

    काँक्रीट पोल्स उभे करून रस्त्याचे रेखांकन करण्यात येणार

    नीलम गोऱ्हे यांनी 25 एप्रिल रोजी पत्र पाठवून काम थांबविणेबाबत कळवले होते

    गोऱ्हे यांनी प्रधान सचिव नगरविकास विभाग आणि मनपा आयुक्त यांना तशा सूचना दिल्या आहेत

  • 26 May 2023 08:25 AM (IST)

    शिंदे गट लोकसभेच्या 22 जागांवर दावा करणार

    ठाकरे गटानं लढलेल्या 23 पैकी 22 जागांवर शिंदे गटाची तयारी

    लोकसभेसाठी शिंदे गटाचं मिशन-22

    मुख्यमंत्री शिंदे 22 जागांसाठी आग्रही

    विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती

  • 26 May 2023 08:17 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

    अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारणीला उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

    पुणे विद्यापीठात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम

    यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही।उपस्थित राहणार

  • 26 May 2023 08:08 AM (IST)

    जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला

    विश्वस्तपदाच्या निवडीबाबत जेजुरीत आज स्थानिकांचे आंदोलन

    जेजुरी गडाच्या विश्वस्तांच्या निवडीच्या विरोधात ग्रामस्थ आजपासून करणार रास्ता रोको आणि चक्री उपोषण

    ग्रामसभेत घेण्यात आला उपोषणाचा निर्णय

    देवस्थानच्या सात विश्‍वस्तांपैकी 5 ते 6 विश्‍वस्त हे एकाच राजकीय पक्षाशी निगडीत असून ते बाहेरील रहिवासी असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

  • 26 May 2023 08:02 AM (IST)

    समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार उद्घाटन

    नाशिक आणि शिर्डीमधील अंतर जलदगतीने पार करता येणार

    या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण होणार आहे

  • 26 May 2023 07:36 AM (IST)

    शेगांवच्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीसाठी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार

    गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 54 वे वर्ष…750 किलोमीटरचा पालखीचा पंढरपूरपर्यंत असणार पायदळ प्रवास

    यावर्षी पालखी सोबत 700 वारकरी पंढरपूरला जाणार, विदर्भातील सर्वात मोठी पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख

    भगव्या पताका, टाळ मृदुंग घेउन वारकरी पालखीत सहभागी

    आषाढी एकादशी निमित्ताने 27 जूनला गजानन महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार

    31 दिवस वारकरी गजानन महाराजांच्या पालखी सोबत पायदळ चालणार

    4 जिल्ह्यातून जाणार गजानन महाराजांची पालखी

    गजानन महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम आज अकोला जिल्ह्यातील पारसमध्ये

    24 जुलैला पालखी शेगावला परत येणार

  • 26 May 2023 07:16 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर

    शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम

    कार्यक्रमाला एक लाख लोक जमावण्याचं कार्यकर्त्यांना टार्गेट

    मकरंदपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला 1 लाख लोकांना जमा करण्याचे टार्गेट

  • 26 May 2023 07:10 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगर दौरा

    सकाळी 10 वाजता पोलीस परेड ग्राउंडवर हेलिकॉप्टरने आगमन होणार

    देवेंद्र फडणवीस उपस्थित विविध विकास कामांचा शुभारंभ

    नूतन शासकीय विश्रामगृहाच भूमिपूजन, तर जिल्ह्यातील विद्युत केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन

    सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक

    आढावा बैठकीनंतर कोहिनूर मंगल कार्यालय येथे भाजप पदाधिकारी संवाद मेळावा

    त्यानंतर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना रवाना

  • 26 May 2023 07:09 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील कळवण एपीएमसी सभापती, उपसभापतींची बिनविरोध निवड

    सभापतीपदी धनंजय पवार तर उपसभापती दत्तू गायकवाड बिनविरोध

    धनंजय पवार यांची बिनविरोध सभापतीपदाची हॅट्रिक

    बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताही कायम राखली आहे

    सभापती व उपसभापती पदाची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला

  • 26 May 2023 07:05 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यात भल्या पहाटे पावसाच्या सरी, अवकाळी पावसाने सर्वच सुखावले

    अंबरनाथ, बदलापूर, विरारमध्ये अवकाळी पाऊस

    आज पहाटे 5 च्या सुमारास पावसाची हजेरी

    हलक्या पावसाच्या सरी बदलापूर, अंबरनाथ, वसई, विरार, नालासोपाऱ्यात पडल्या

    या पावसामुळे शहरात जरी गारवा निर्माण झाला असला तरी ग्रामीण भागात मात्र पिकांचे नुकसान। केले आहे

Published On - May 26,2023 7:02 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.