Maharashtra Breaking Marathi News Live | राज ठाकरे यांनी भाजपला सुनावलं, पाहा काय म्हणाले?

| Updated on: May 15, 2023 | 7:08 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | राज ठाकरे यांनी भाजपला सुनावलं, पाहा काय म्हणाले?
Marathi News Live Image Credit source: tv9 marathi

मुंबई : मदर्स डे निमित्त सर्वांना शुभेच्छा. देशभरात मदर्स डे निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे विरोधकांचं मनोबल उंचावलं आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक बोलावली आहे. तर कर्नाटकातही काँग्रेस विधीमंडळ पक्षाने बैठक बोलावली असून या बैठकीत नेता निवडीवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अकोल्यात काल रात्री दोन गटात तुफान राडा. शहरात 144 कलम लागू. पुण्यात वर्षभरात प्रसूती दरम्यान 124 महिलांचा मृत्यू. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 May 2023 11:43 PM (IST)

    मनोरुग्णाने बालकाच्या डोक्यात मारला दगड; 11 वर्षाचं बालक गंभीर

    हिंगोली :

    एका मनोरुग्णाने बालकाच्या डोक्यात मारला दगड

    पाठिमागून पळत येऊन मारला दगड

    डोक्यात दगड लागल्याने बालक गंभीर जखमी

    प्रणव मगर (वय 11) जखमी असलेल्या बालकाचं नाव

    वसमत शहरातील बँक कॉलनी परिसरातली घटना घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

    बालकावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

  • 14 May 2023 11:09 PM (IST)

    मी एकटा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय केलं असतं ?; गुलाबराव पाटील यांचा सवाल

    जळगाव :

    सत्ता समीकरण बदलण्यासाठी आधीच जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार गेले होते

    त्यापैकी चार आमदार माझ्याही आधी पळून गेले

    नागपूर,बुलढाणा,जळगाव, नाशिक,  दादर, ठाण्याचे सर्वच आमदार शिंदे सोबत पळून गेले

    मी एकटा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय केलं असतं ? सर्वच शिंदे सोबत पळून गेले

    चार खांदे गेले तर मी एकटा काय करू ? मग माझ्यावरती झाडी डोंगर खोके अशा जाहीरी टीका केली असती.

  • 14 May 2023 09:12 PM (IST)

    आसाममध्ये लव्ह जिहादवर बंदी, मदरसेही बंद – मुख्यमंत्री सरमा

    करीमनगर, तेलंगणात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आम्ही आसाममधील लव्ह जिहाद थांबवण्यासाठी काम करत आहोत आणि आसाममधील मदरसे बंद करण्याच्या दिशेनेही काम करत आहोत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आसाममधील 600 मदरसे बंद केले. मला ओवेसींना सांगायचे आहे की, मी यावर्षी आणखी 300 मदरसे बंद करणार आहे.

  • 14 May 2023 09:01 PM (IST)

    Raj Thakceray On Bjp | राज ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा

    पराभव मान्य करता येत नसेल तर काय बोलणार, राज ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र

    विरोधकांच्या चांगल्या गोष्टी कधीतरी मान्य करायला हव्यात, भाजपला मनसेप्रमुखांनी सुनावलं

    निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी माणसं : राज ठाकरे

  • 14 May 2023 08:23 PM (IST)

    निवडणूका आल्या की नाक्यावर सभा घेणारी ही माणसं

    आशिष शेलार यांचं नाव न घेता राज ठाकरे यांची टीका, आशिष शेलार यांच्या टीकेकर राज यांचं प्रतिउत्तर

  • 14 May 2023 07:06 PM (IST)

    पुणे : आमदार नीलेश लंके वाहतूक कोंडी सोडवण्यात व्यस्त

    पुणे-नाशिक आणि नगर कल्याण या दोन महामार्गाना जोडणाऱ्या आळेफाटा चौकातील घटना

    वाहतूक कोंडी काढण्यासाठी नीलेश लंके भर उन्हात रस्त्यावर उतरलेत

    मागच्या पाच तासांपासून दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

    भर उन्हात नीलेश लंके वाहतूक कोंडी सोडविण्यात मग्न

  • 14 May 2023 06:51 PM (IST)

    मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार

    मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार

    संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

    गेट वे ऑफ इंडिया येथील आयोजित कार्यक्रमात केली घोषणा

  • 14 May 2023 06:33 PM (IST)

    अमरावती : गाईच्या रक्षणासाठी गोवंश संरक्षण यात्रा

    अमरावतीच्या गांधी चौक ते इर्विन चौकापर्यंत निघाली यात्रा

    गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी

    सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आली गौवंश यात्रा

  • 14 May 2023 06:15 PM (IST)

    पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या पुणे दौऱ्यावर

    पुणे दौऱ्यात राजनाथ सिंह घेणार खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट

    काही दिवसांपूर्वीच भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन झाले

    बापटांच्या कुटुंबाला सांत्वन पर भेट देण्यासाठी राजनाथ सिंह त्यांच्या निवासस्थानी जाणार

    पुण्यातील एनडीए येथील भारतीय सैन्य दलाच्या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री लावणार हजेरी

  • 14 May 2023 06:03 PM (IST)

    हा केवळ काँग्रेसचाच नाही तर विरोधी पक्षांचा विजय

    कर्नाटक निवडणुकीचे निकाल विश्वास वाढविणारे

    राज्य सरकार असंवैधानिक असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निकाल

    जनतेला निकाल समजावून सांगणार

    महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा लवकरच होणार

    संजय राऊत यांची पत्रकार परिषद यांची माहिती

  • 14 May 2023 06:00 PM (IST)

    महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नाही

    भाजप अशा बातम्या पेरण्याचे काम करते

    तीनही पक्षाचे नेते आज एकत्र आहे

    सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या बाजुने निकाल दिला

    उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल नाही

    पत्रकार परिषदेत नाना पटोले यांची माहिती

  • 14 May 2023 05:58 PM (IST)

    महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक

    राज्यपालांच्या मदतीने भाजपने हे पाप केले

    जागा वाटपासंबंधीची चर्चेची तयारी

    पुण्यात कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येईल

    पत्रकार परिषदेत नाना पटोले यांची माहिती

  • 14 May 2023 05:56 PM (IST)

    दिल्लीच झुठ, कर्नाटकातील लूट जनतेच्या लक्षात आली

    कर्नाटकातील जनतेच्या मनात भाजपच्या विरोधातील राग दिसून आला

    कर्नाटकातील भाजपचा भ्रष्टाचार दिसून आला

    महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारी आहे

    नाना पटोले यांचा गंभीर आरोप

  • 14 May 2023 05:54 PM (IST)

    विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढला

    कर्नाटकातील भाजपच्या पराभवामुळे विश्वास वाढला

    सुप्रीम कोर्टाच्या निकालाची माहिती जनतेपर्यंत पोहचवणार

    जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

  • 14 May 2023 05:52 PM (IST)

    महाराष्ट्रातील जनतेला महाविकास आघाडी सक्षम पर्याय देईल

    सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर चर्चा झाली

    पावसाळ्यात काही ठिकाणी इनडोअर सभा घेण्याचा मानस

    जयंत पाटील यांनी दिली वज्रमुठ सभेविषयी माहिती

  • 14 May 2023 05:50 PM (IST)

    कर्नाटकप्रमाणे महाविकास आघाडी परिणाम दाखवेल

    लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी

    तीनही पक्ष, घटक पक्ष यांचे एकमत झाले

    उन्हाळा कमी झाला की महाविकास आघाडीच्या सभा

    जयंत पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

  • 14 May 2023 05:48 PM (IST)

    महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

    बैठकीत कर्नाटकच्या निकालाचा आढावा घेतला

    कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव

    महाविकास आघाडी एकसंघ प्रमाणात काम करेल

    जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

  • 14 May 2023 05:33 PM (IST)

    उज्ज्वला योजनेने पार केला 9.60 कोटींचा टप्पा

    पहिल्या टप्प्यात 8 कोटी घरांना गॅस सिलेंडरचे कनेक्शन

    दुसऱ्या टप्प्यात 1.6 कोटी घरांमध्ये कनेक्शन

    पंतप्रधान उज्ज्वला योजनेत जोडणी अभियान

  • 14 May 2023 05:21 PM (IST)

    पोलिस दलातील अधिकाऱ्यांचे मोफत पाससाठी दबावतंत्र

    राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

    छत्रपती संभाजी महाराजांच्या महानाट्य प्रयोगासाठी दबाव

    मोफत पाससाठी पोलीस अधिकारी देत आहेत धमकी

    नाटकाचे शो बंद करण्याची दिली धमकी- जयंत पाटील यांचा आरोप

  • 14 May 2023 05:12 PM (IST)

    राजकीय घडामोडींना आणखी वेग

    कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर भेटीगाठींचे सत्र

    आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट

    विरोधी पक्ष मोट बांधण्याच्या तयारीत

    एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले होते आदित्य ठाकरे दिल्लीत

  • 14 May 2023 05:07 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये

    भाजपच्या जिल्हा पदाधिकारी आणि नेत्यांची घेतली बैठक

    कर्नाटकच्या निकालानंतर पहिल्यांदाच शहरात दाखल

    बैठकीला अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थितीत

  • 14 May 2023 05:02 PM (IST)

    संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता

    संरक्षण मंत्रालयाने घेतला महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय

    928 लाईन रिप्लेसमेंट युनिट्सच्या स्वदेशीकरणाला सुरुवात

    याविषयीच्या यादीला केंद्र सरकारने दिली मान्यता

  • 14 May 2023 04:04 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज संभाजी नगर दौरा

    आज संध्याकाळी 7 वाजता वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह संमेलन 2023 साठी राहणार उपस्थित

    अयोध्यानगरी छत्रपती संभाजी नगर येथे होत आहे कार्यक्रम

    तर या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील आणि सकल राजपूत समाज देखील असणार उपस्थित

  • 14 May 2023 03:58 PM (IST)

    पुणे: खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला उद्या दुपारी 2 पर्यंत राहणार बंद

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

    खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला उद्या दुपारी 2 पर्यंत राहणार बंद

    कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही कार्यवाही करण्यात आल्याने पर्यटक मात्र नाराज

    खडकवासला धरणाला लागून असलेल्या उन्नत प्राद्योगिक संरक्षण संस्था (डीआयएटी) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा उद्या दौरा

    सुरक्षेच्या कारणास्तव व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

  • 14 May 2023 03:57 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर: देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक सुरू

    संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू

    छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वच पदाधिकारी बैठकीला उपस्थित

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भागवत कराड सहकार मंत्री अतुल सावे हेही बैठकीला उपस्थित

    आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू

  • 14 May 2023 03:08 PM (IST)

    बदलापूरनंतर उल्हासनगर मनसेची कार्यकारिणी सुद्धा राज ठाकरेंकडून बरखास्त

    आपापसातील हेवेदावे, गटबाजी यामुळे कार्यकारिणी बरखास्त

    उल्हासनगरच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंकडून घोषणा

  • 14 May 2023 02:58 PM (IST)

    पुण्यातील उच्चभ्रू परिसरात असणाऱ्या स्पा सेंटरवर छापे

    कोरेगाव पार्क परिसरातील ३ स्पा सेंटरवर पुणे पोलिसांची धडक कारवाई

    पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होतं सेक्स रॅकेट

    पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षेच्या विभागाने केलेल्या कारवाईत पाच पीडित मुलींची सुटका

    पिडीत महिलांमध्ये ३ परदेशी महिला तर २ भारतीय

    या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाकडून एका व्यक्तीला अटक

    कोरेगाव पार्क परिसरात असणाऱ्या हेल्थ ल्याड क्लिनिक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनिक तसेच थाई स्पा या सेंटर वर छापे

    पुणे पोलिसांकडून या महिन्यातील शहरातील विविध स्पा सेंटर केलेली ५ वी कारवाई

  • 14 May 2023 02:54 PM (IST)

    बदलापूरनंतर उल्हासनगर मनसेची कार्यकारिणी सुद्धा राज ठाकरेंकडून बरखास्त

    बदलापूरनंतर उल्हासनगर मनसेची कार्यकारिणी सुद्धा राज ठाकरेंकडून बरखास्त

    आपापसातील हेवेदावे, गटबाजी यामुळे कार्यकारिणी बरखास्त

    उल्हासनगरच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंकडून घोषणा

  • 14 May 2023 02:48 PM (IST)

    कल्याण जवळ मोहने येथील घटना, ओवर होल्टेजमुळे अनेक घरातील टिव्ही ,फ्रिज जळाले

    कल्याण जवळ मोहने येथील घटना

    महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड

    अचानक दुरुस्ती दरम्यान ओवर होल्टेजमुळे अनेक घरात टिव्ही ,फ्रिज सह इलेक्ट्रिक उपकरणं जळाली..

    महावितरणाने नुकसान भरपाई द्यावी नागरिकाची मागणी

    झालेले नुकसानीबाबत संबंधितांचे अर्ज आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल महावितरण अधिकारी म्हणणे

  • 14 May 2023 02:41 PM (IST)

    नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत

    संजय राऊत यांनी, ‘हे सरकार तीन महिन्यांत जाणार आहे..

    हे बेकायदेशीर सरकार असून, सरकारचे आदेश पाळू नये’ असे विधान केले होते..

    नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार केदारे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

    कलम 505/1 (ब) भा.दं.वि. सह कलम पोलिसांप्रती अप्रीतीची भावना चिथावणे (1922 कायदा) यानुसार गुन्हा दाखल..

  • 14 May 2023 02:35 PM (IST)

    मुलुंडमधील धक्कादायक घटना उघडकीस

    कारला कट का मारली याचा जाब विचारण्यासाठी टेम्पो अडविण्याचा प्रयत्न

    करणाऱ्या युवकाला टेम्पोने उडविले यात त्याचा जागीच मृत्यू

    मुलुंडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे

  • 14 May 2023 02:33 PM (IST)

    आमदार सुनील शेळके यांनी समर्थकांना केले मोठे आवाहन

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी समर्थकांना केले आवाहन

    सुनील शेळके यांच्या तळेगावच्या घराबाहेर जमले होते समर्थक

    त्यासर्वांना संबोधित करत असताना शेळकेंनी तालुक्यात शांतता राखण्याचे

    कोणतीही अराजकता माजनार नाही, तसेच चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचा पायंडा पडू नये.

    यासाठी आपण कार्यशील राहू, असं आवाहन केले

  • 14 May 2023 02:30 PM (IST)

    वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आजार होऊ शकतात- डॉ. अविनाश भोंडवे

    वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आजार होऊ शकतात

    त्यामुळे उन्हापासून संरक्षण करा डॉक्टरांचा सल्ला

    8 तारखेपासून तापमानात वाढ झाली आहे

    त्वचा काळवंडणे, गजकर्ण त्याचबरोबर कमी पाणी प्यायल्याने मुतखड्यासारखे आजार होऊ शकतात

    त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचं आवाहन डॉक्टर करतायेत

    उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठी टोपी वापरा डॉक्टरांचा सल्ला

  • 14 May 2023 02:25 PM (IST)

    राज ठाकरेंकडून मनसेची बदलापूर शहर कार्यकारिणी बरखास्त

    पक्षातील गटबाजीमुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतला निर्णय

    राज ठाकरेंसमोरच अनेकांनी वाचला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढा

    अखेर कार्यकारिणी बरखास्त करत असल्याची राज ठाकरेंकडून घोषणा

    पुढील १० दिवसात आमदार राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नवीन कार्यकारिणी तयार करण्याचे आदेश

  • 14 May 2023 02:20 PM (IST)

    काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रकाश आंबेडकरांवर नाव न घेता टीका

    लोकसभा निवडणुकीदरम्यान दलित समाजातील नेते कसे फसले हे आता लक्षात आले

    कर्नाटकातील काँग्रेसला मिळालेले यश अनपेक्षित – सुशीलकुमार शिंदे

    कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर सोलापूर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा जंगी सत्कार

    बाईक रॅली काढत शिंदे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत शिंदे पिता, पुत्रीचा केला सन्मान

    मोदींच्या नेतृत्वाखाली देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात होता

    इंदिरा गांधींना अटक झाली त्यानंतर त्या बाहेर आल्यावर देशातील लोकांनी त्यांना निवडून दिले

    मी कायम म्हणत होतो तसेच आता देखील झाले आहे. जनतेने काँग्रेसला पुन्हा निवडून दिले

  • 14 May 2023 02:13 PM (IST)

    उन्हाच्या तडाखा वाढला अवकाळी पावसानंतर 42.00 डिग्री सेल्सियस तापमान

    उन्हाच्या तडाखा वाढला अवकाळी पावसानंतर 42.00 डिग्री सेल्सियस तापमान

    नागरिक घेऊ लागले काळजी. रस्ते झाले शुकशुकाट

    विदर्भातील अकोला चंद्रपूर पाठोपाठ आता भंडारात सुद्धा उन्हाची झळ सामान्य माणसांना बसू लागलेली आहे.

  • 14 May 2023 02:10 PM (IST)

    खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

    खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

    नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    सरकार बेकायदा आहे, आदेश पाळू नका असे विधान केले होते

    नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल

  • 14 May 2023 02:00 PM (IST)

    भाजपने शिंदे यांच्यासोबत जाऊन चांगलाच धडा घेतला – सुषमा अंधारे

    मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांचा पलटवार

    कर्नाटक निवडणुकीसारखा निकाल महाराष्ट्रात दिसू शकतो – सुषमा अंधारे

    कर्नटकाच्या जनतेनं भाजपला संयमाने उत्तर दिलं – सुषमा अंधारे

    वाचाळांची संख्या वाढली, सुषमा अंधारे यांचा भाजप नेत्यांवर निशाणा

  • 14 May 2023 01:53 PM (IST)

    शरद पवार यांच्या उपस्थितीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होऊ शकते – राऊत

    सिल्व्हर ओकवरील मविआच्या बैठकीसंदर्भात राऊतांची माहिती

    ठाकरे गटाला २५ जागा मिळतील, हीच त्यांची लायकी – शिरसाट

    संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर निशाणा

  • 14 May 2023 01:50 PM (IST)

    अमरावती | जिल्ह्यातील टेम्भा प्रकल्प काम सुरु करण्यापूर्वी आमचं पुनर्वसण करा… गावकऱ्यांची मागणी

    अमरावती जिल्ह्यातील रोहनखेड येथील गावकाऱ्यांची मागणी

    भर उन्हात गावातील महिला पुरुष धडकले प्रकल्पावर

    प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

    गावकरी मागणीवर ठाम, पारा चाळीशी पार असल्याने उष्माघाताची शक्यता

  • 14 May 2023 01:23 PM (IST)

    पुणे | महिलांसाठी ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे मोफत स्क्रिनिंग

    पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने कोथरूड मधील चित्रपटगृहात उपक्रमाचे आयोजन

    जवळपास १० हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहावा यासाठी विशेष व्यवस्था

    गेल्या आठ दिवसांत ५ हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी पाहिला चित्रपट

    ज्वलंत विषयाची समाजात जाणीव व्हावी यासाठी भाजपकडून चित्रपटाच्या मोफत स्क्रिनिंगचे आयोजन

  • 14 May 2023 01:15 PM (IST)

    गोंदिया | सहा आदिवासी विद्यार्थिनींची पोलीस विभागात भरती…..

    वस्तीगृहात राहून केलं यश संपादन…..

    प्रकल्प अधिकारी यांनी वस्तीगृहत उपलब्ध करून दिले साहित्य आणि पुस्तके….

    प्रकल्प अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन…..

  • 14 May 2023 01:12 PM (IST)

    अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे बोलतात – आशिष शेलार

    राज ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला महत्त्व देत नाही – आशिष शेलार

    मुनगंटीवार यांचं वक्तव्य योग्य – आशिष शेलार

  • 14 May 2023 01:04 PM (IST)

    जळगाव | सलग चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या प्रमाणात मोठी वाढ

    जळगाव जिल्ह्यात 45 सेल्सिअस तापमानाची नोंद …

    हॉट जिल्हा म्हणून देशात जळगावची ओळख

    नागरिक उष्णतेने हैराण….

  • 14 May 2023 01:03 PM (IST)

    जनता स्वाभिमानी, भाजपला धडा शिकवेल – सुप्रिया सुळे

    कर्नाटकातला काँग्रेसचा विजय हा सत्याचा विजय – सुप्रिया सुळे

  • 14 May 2023 12:49 PM (IST)

    गृहनिर्माण सहकारी परिषदेतून फडणवीस; मुंबईकरांसाठी मोठी घोषणा?

    3 महिन्यात पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

    मविआच्या काळात इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा मागे पडला – देवेंद्र फडणवीस

    मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित – देवेंद्र फडणवीस

    इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणं गरजेचं – देवेंद्र फडणवीस

    इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक खिडकी योजना राबवणार – देवेंद्र फडणवीस

  • 14 May 2023 12:19 PM (IST)

    ठाणे जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा

    ठाणे जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा – 5 जूनपासून ठाणे जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या जातील. त्यानंतर महिनाभरात कशा गोष्टी राबवल्या जातायत ते बघू. अनेक पदांना त्यांचं नेमकं काम काय आहे ते माहीत नाहीये, ते सांगितलं जाईल.

    कर्नाटक निकाल – विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात. हा पराभव स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कुणी वाकडं करू शकत नाही, या विचाराचा हा पराभव आहे. जनतेला कधीही गृहीत धरू नये, हा या निकालातून सर्वांनी बोध घेण्यासारखा आहे आणि तो सर्वांनी घ्यावा.

    महाराष्ट्राचे बदलाचे संकेत असू शकतात का? – याबाबत आता काय बोलणार? आता निकाल लागलेला आहे यावरून आताच उडी मारू नका.

    राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे का? सगळ्या चॅनेलवाल्यांनी आणि त्यांच्या मालकांनी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, तरी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम दिसतोय.

    लोकसभेपर्यंत प्रभाव राहील का? – हे आता सांगायला मी काय ज्योतिषी आहे का?

    अंबरनाथ,बदलापूर, उल्हासनगरमध्ये मनसेत गटबाजी असल्याचा फटका बसतोय. – यापुढे गटबाजी होणार नाही. यासाठीच मी दौऱ्यावर आलो आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा पुऱ्या करण्यासाठी पक्ष काढलेला नाही. ज्यांना स्वतःच्या अहंपणामध्ये जगायचं असेल, ते यापुढे पदावर राहणार नाहीत.

    विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे त्यांना तुमची साथ मिळणार का? – माझी? (हसून प्रश्न टाळला)

    पहाटेचा शपथविधी ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी – सुधीर मुनगंटीवार – तुमच्याकडून चूक झाली ती झाली. उगाच कुणाला तरी धडे शिकवायला जाऊ नका. तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण असं झालेलं आहे. त्यामुळे आता या सारवासारवीला काही अर्थ नाही.

  • 14 May 2023 12:06 PM (IST)

    संजय राऊत ने उध्दव ठाकरे यांच्यावर दारोदार भीक मागण्याची वेळ आणली आहे.

    संजय राऊत ने उध्दव ठाकरे यांच्यावर दारोदार भीक मागण्याची वेळ आणली आहे.

    सुधीर मुनगंटीवार जे बोलले त्यात काहीही गैर नाही

    उध्दव ठाकरे एक दिवस लंडनला जातील आणि संजय राऊत ला हिमालयात पाठवतील

    महाविकास आघाडीत शिवसेनेला फक्त 25 जागा मिळतील

    एकटा आदित्य ठाकरे निवडून आला तरी उध्दव ठाकरे ला बस झाले

    महाराष्ट्रात जोमाने विकास करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे

  • 14 May 2023 12:05 PM (IST)

    अकोल्यात पोलिसांनी बोलावली शांतता कमिटीची बैठक….

    अकोल्यात पोलिसांनी बोलावली शांतता कमिटीची बैठक….

    या बैठकीमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि शहरातील हिंदू मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी हजर…

  • 14 May 2023 12:04 PM (IST)

    सलग चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ

    जळगाव

    सलग चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ

    रस्ते निर्मनुष्य 45 सेल्सिअस तापमानाची नोंद …

    जळगाव देशात हॉट जिल्हा म्हणून ओळखल्या जात आहे….

    नागरिक उष्णतेने हैराण….

  • 14 May 2023 12:00 PM (IST)

    राज ठाकरे पत्रकार परिषद

    राज ठाकरे पत्रकार परिषद

    येत्या 5 जूनमध्ये मनसे कार्यकर्त्यासाठी कार्यशाळा सुरू होणार

    विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो सत्ताधारी

    हा वागणुकीचा पराभव आपलं कुणी वाकड करू शकत नाही यांचा हा पराभव

    हा निकाल बोध घेण्यासाठी आहे

    जनतेला कुणीही गृहीत धरू शकतं नाही

    भारतजोडोचा राहुल गांधीचा परिणाम दिसत आहे

    तुमच्याकडून चुक झाली हि झाली कुणाला धडे शिकवायला जावू नका , मुनगंटीवारांना टोला

    उद्धव ठाकरे धडा शिकवल्या मुनगंटीवाराच्या वक्तव्यावरून टीका

  • 14 May 2023 11:58 AM (IST)

    छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजी नगर शहरात भव्य शोभायात्रा

    छत्रपती संभाजी नगर :-

    छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजी नगर शहरात भव्य शोभायात्रा सुरू आहे. या यात्रेत पालकमंत्री संदीपान भुमरे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, तानाजी सावंत आणि संजय शिरसाठ सहभागी झाले आहेत. क्रांती चौकातून टीव्ही सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत ही भव्य शोभायात्रा निघत आहे.

  • 14 May 2023 11:54 AM (IST)

    आज महाविकास आघाडीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार

    आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असावा ? यावर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार आहे

    राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार – अजित पवार, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे-संजय राऊत आणि काँग्रेसतर्फे नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे नेते बैठकीला उपस्थित राहणार

    लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे दहा महिने राहिले असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास तयारी सुरू केलीय.

    जागा वाटपातील संभाव्य मतभेदांमुळे महाविकास आघाडीत फूट पडून त्याचा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना निवडणुकीत फायदा होऊ नये यासाठी आतापासूनच महाविकास आघाडीचे नेते सावध आहेत.

  • 14 May 2023 11:38 AM (IST)

    पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार

    – पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज जयंती नियमितपणे साजरी केल्याबद्दल पंचायत समिती,पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे अभिनंदन करून पालकमंत्री पाटील म्हणाले, परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे. छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. श्री.शिवतारे म्हणाले,छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केले. स्वराज्य आणि स्वधर्म प्रेमाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि विचारांचे अनुसरण करण्याची गरज आहे.जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाई जिंकली. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढू बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल.

  • 14 May 2023 11:32 AM (IST)

    संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरचं चंद्रकांत दादांचा प्रवीण गायकवाडांना टोला

    संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरचं चंद्रकांत दादांचा प्रवीण गायकवाडांना टोला

    प्रवीण गायकवाड चांगलं काम करतात मात्र काही बाबतीत दुमतं आहे

    त्यांनी आतापर्यंत 2 हजार जणांना दुब ईत नेऊन आणलं

    एखादी गोष्ट धरली की ते शेवटपर्यंत करतात

    संभाजी महाराजांची जयंती आपण यावर्षीपासून शासकीय जयंती म्हणून साजरी करतोय

    पुढच्या वर्षी इथं मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री येतील… Flash

    पुरंदर किल्ल्यावर हिरा स्पोर्ट अकँडमीच्या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ केले सादर

    लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी,या खेळांनी येणाऱ्या शंभूभक्तांच वेधलं लक्ष

    मैदानी कसरती करत येणाऱ्या शंभुभक्तांची जिंकली मनं

    खेळ पाहण्यासाठी शंभुभक्तांनी गर्दी केली होती

  • 14 May 2023 11:31 AM (IST)

    मुनगंटीवारांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेलं वक्तव्य योग्य

    मुनगंटीवारांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेलं वक्तव्य योग्य संजय राऊताचं बोलणं बेसलेस म्हणावं लागेल संजय राऊत महाराष्ट्र एकिकरण समितीची सभा घेतली ते उमेदवार पडले शऱद पवारांनी 7 उमेदवार कर्नाटकात हारले दुस-यांच्या घरात मुलगा झाला की हे आनंदी होत आहेत संजय राऊतांनी उद्धव ठाकरेना दारोदारी भीक मागायला मजबूर केलं एकेकाळी मातोश्रीचा दरारा होता सिल्हर ओकच्या बाजूला ठाकरे गटाचं कार्यालय बांधेल राऊत उद्धव ठाकरे लंडनला जातील संजय राऊतांना हिमालयात पाठवा विधानसभा अध्यक्षाच्या हातात तुमचं भवितव्य विधानसभा अध्यक्षाकडे सन्माननं पाहिलं जातं उद्धव ठाकरे , अदित्य ठाकरे , संजय राऊत आणि अनिल परब महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही एकत्र राहणार नाही काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे ते उद्धव ठाकरे गटाला एकत्र घेणार नाही उद्धव ठाकरे गटाला फक्त 25 जागा देतील तेवढीचं त्यांची लायकी आहे 25 जागांवरही उद्धव ठाकरे समाधान मानतील मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करायला पाहिजे महाराष्ट्रात सगळे मंत्री मिळून काम करता येईल एका मंत्र्याकडे तीन – चार जिल्हे आहेत शिंदे साहेबानी राम मंदीरासाठी 10 लाख दिले ते परत करं लोकांची पैसे घेवून खाणारा आरोपी आहे

  • 14 May 2023 11:27 AM (IST)

    न्हावा शेवा येथे परदेशी सिगारेटने भरलेला 40 फुटाचा कंटेनर केला जप्त

    डीआरआय मुंबईची मोठीं कारवाई

    न्हावा शेवा येथे परदेशी सिगारेटने भरलेला 40 फुटाचा कंटेनर केला जप्त

    जवळपास 24 कोटी किंमतीचा  परदेशी सिगारेट करण्यात आला जप्त

    विविध नावाचे परदेशी ब्रॅंडचे सिगारेट तपासा दरम्यान आढळले  आहेत

    5 आरोपी यात अटक करण्यात आले आहे

    या प्रकरणी अधिक तपास डी आर आय करत आहे

  • 14 May 2023 11:27 AM (IST)

    चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानक परिसरामध्ये चार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

    चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानक परिसरामध्ये चार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

    चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली असून, यामध्ये एक आरोपीस अटक करण्यात आली आहे.

    तेलंगणातून गडचिरोलीमार्गे किंवा कोरपणा मार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये अनेक कारवाया करण्यात आले आहेत. मात्र गांजा तस्करांची फौज अद्यापही थांबलेली नाही.

    प्रतिबंधित असलेला हा गांजा चंद्रपूर जिल्ह्यातून पुढे नागपूर आणि मध्यप्रदेशात देखील पुरवठा केला जातो. या संदर्भात प्राप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बस स्थानक परिसरामध्ये सापडा रचून, आरोपीस अटक केली आहे.

  • 14 May 2023 11:26 AM (IST)

    चंद्रकांत पाटील पुरंदर किल्ल्यावर संभाजी ब्रिगेडच्या शंभू जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित

    चंद्रकांत पाटील पुरंदर किल्ल्यावर संभाजी ब्रिगेडच्या शंभू जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित

    संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरचं चंद्रकांत दादांचा प्रवीण गायकवाडांना टोला

    प्रवीण गायकवाड चांगलं काम करतात मात्र काही बाबतीत दुमतं आहे

    त्यांनी आतापर्यंत 2 हजार जणांना दुब ईत नेऊन आणलं

    एखादी गोष्ट धरली की ते शेवटपर्यंत करतात

    संभाजी महाराजांची जयंती आपण यावर्षीपासून शासकीय जयंती म्हणून साजरी करतोय

    पुढच्या वर्षी इथं मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री येतील…

  • 14 May 2023 11:25 AM (IST)

    पुरंदर किल्ल्यावर हिरा स्पोर्ट अकँडमीच्या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ केले सादर

    पुरंदर किल्ल्यावर हिरा स्पोर्ट अकँडमीच्या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ केले सादर

    लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी,या खेळांनी येणाऱ्या शंभूभक्तांच वेधलं लक्ष

    मैदानी कसरती करत येणाऱ्या शंभुभक्तांची जिंकली मनं

    खेळ पाहण्यासाठी शंभुभक्तांनी गर्दी केली होती

  • 14 May 2023 11:24 AM (IST)

    चंद्रकांत पाटील पुरंदर किल्ल्यावर संभाजी ब्रिगेडच्या शंभू जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित

    चंद्रकांत पाटील पुरंदर किल्ल्यावर संभाजी ब्रिगेडच्या शंभू जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित

    संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरचं चंद्रकांत दादांचा प्रवीण गायकवाडांना टोला

    प्रवीण गायकवाड चांगलं काम करतात मात्र काही बाबतीत दुमतं आहे

    त्यांनी आतापर्यंत 2 हजार जणांना दुब ईत नेऊन आणलं

    एखादी गोष्ट धरली की ते शेवटपर्यंत करतात

    संभाजी महाराजांची जयंती आपण यावर्षीपासून शासकीय जयंती म्हणून साजरी करतोय

    पुढच्या वर्षी इथं मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री येतील…

  • 14 May 2023 11:22 AM (IST)

    गौरव खळदे हा सिव्हिल इंजिनिअर होता तोच त्यांचा बांधकाम व्यवसाय सभळ्याचा

    मावळ,पुणे

    -गौरव खळदे हा सिव्हिल इंजिनिअर होता तोच त्यांचा बांधकाम व्यवसाय सभळ्याचा

    -गौरव खळदे ची आणि हत्या करणारा शाम निगडकर यांची मैत्री होती गौरव खळदे हा शामला वेळोवेळी आर्थिक मदत करत होता

    -याचं मैत्रीखातर शाम निगडकर आणि त्याच्या साथीदारा कडून किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली

    -यासाठी जानेवारी पासून किशोर आवारे याच्या हत्येचा कट रचण्यात येत होता,तर गेल्या महिन्याभरा पासून रेकी करत होते अखेर नगरपरिषदेच्या कार्यालयात त्यांना मारेकऱ्यांनी गाठलं

  • 14 May 2023 11:01 AM (IST)

    संजय राऊतचं बोलणं बेसलेस- संजय शिरसाट

    मुंगंटीवारांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेलं वक्तव्य योग्य- संजय शिरसाट

    पहाटेच्या शपथविधीची भाजपची खेळी योग्यच होती- संजय शिरसाट

    संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना दारोदारी भीक मागायला भाग पाडले- संजय शिरसाट

  • 14 May 2023 10:55 AM (IST)

    पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळा

    किल्ल्यावर चंद्रकांत पाटलांनी केले अभिवादन

    महिलांनी पाळणा म्हणत साजरा केला सोहळा

    शंभूभक्त कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने उपस्थित

  • 14 May 2023 10:44 AM (IST)

    भाजप नेत्यांवर इडीची कारवाई दाखवा मी पाच लाख देतो- संजय राऊत

    पटोलेंच्या राजीनाम्यानंतर अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेऊ दिली नाही- संजय राऊत

    कोश्यारींना निवडणूक घेऊ नका यासाठी दिल्लीहून निरोप होते- संजय राऊत

    2024 साली सरकार बदलल्यानंतर भ्रष्टाचाराच्या कारवाया पुठे सरकलेल्या असतील- संजय राऊत

  • 14 May 2023 10:37 AM (IST)

    संजय राऊतांचा नार्वेकरांना पुन्हा गंभीर इशारा

    योग्य निर्णय न घेतल्यास जनता रस्त्यावर फिरू देणार नाही- संजय राऊतांचा नार्वेकरांना इशारा

    कोश्यारींची निर्लज्य राज्यपाल म्हणून नोंद- संजय राऊत

  • 14 May 2023 10:26 AM (IST)

    कर्नाटकात भाजप आर्मीचा पराभव – संजय राऊत

    ‘कर्नाटक तो झाँकी है पुरा देश अभी बाकी है’- संजय राऊत

    पक्षांतर हा नार्वेकरांचा छंद- संजय राऊत

    पक्षांतराला उत्तेजन देणे हा नार्वेकरांचा व्यावसाय- संजय राऊत

  • 14 May 2023 10:20 AM (IST)

    सुधीर मुंगंटीवार यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही- संजय राऊत

    भाजपच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाची कारवाई होत नाही- संजय राऊत

    संजय राऊत यांची सुधीर मुंगंटीवार यांच्यावर टिका

  • 14 May 2023 10:15 AM (IST)

    कर्नाटकातल्या विजयानंतर राष्ट्रवादीकडून ठाण्यात बॅनर

    कर्नाटक तो झाँकी है, महारष्ट्र अभी बाकी है. अशा आशयाचे बॅनर्स

    राष्ट्रवादीचे राजा राजपूरकर यांच्याकडून लावण्यात आले बॅनर

  • 14 May 2023 10:00 AM (IST)

    तळेगावात मोर्चा निघणार

    जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी मावळ आमदार सुनिल शेळके आणि त्यांच्या कुटुंबियांवर राजकीय आकसापोटी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ तळेगांवात निषेध मोर्चा निघणार आहे

    हा मोर्चा मारुती मंदिर चौकातून हा मोर्चा तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनवर जाणार आहे

  • 14 May 2023 09:49 AM (IST)

    पुणे स्वारगेट ते मुंबई शिवनेरी

    उन्हाळ्याची सुट्टी, लग्नसराई यानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुंबई, नवी मुंबई येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ८ मेपासून नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरांतील प्रवाशांच्या सुविधेसाठी वाशी-स्वारगेट (पुणे) शिवनेरी सेवा सुरू केली.

  • 14 May 2023 09:36 AM (IST)

    पहाटेचा शपथविधी का? सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले कारण

    2019 मध्ये जनादेशाचा अवमान

    पहाटेच्या शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी

    अजित पवार सोबत येण्यास तयार झाले म्हणून निर्णय

    २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला.

    सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

  • 14 May 2023 09:28 AM (IST)

    मराठवाड्यात वाढत्या तापमानाचा कहर

    मराठवाड्यात वाढत्या तापमानाचा कहर

    मराठवाड्यात उष्मघाताने दोन जणांचा गेला बळी

    छत्रपती संभाजी नगरच्या जिल्ह्यात सूर्य ओकतोय आग

    परभणी – 44.7, बीड 43 ,छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 43 वर गेला पारा

  • 14 May 2023 09:19 AM (IST)

    उन्हामुळे अमरावतीत कार जळाली

    अमरावती: अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील जुन्या वस्तीत धावत्या कारने अचानक पेट घेतला, धुर दिसतात गाडीतील लोक बाहेर पडल्याने जीवित हानी टळली,सध्या अमरावतीत पारा 43 डिग्रीच्या वर गेला आहे त्यामुळे या धगधगत्या उन्हात ही कार जळून खाक झाली.

  • 14 May 2023 09:09 AM (IST)

    जळगावात सूर्यफुलाची मोठी आवाक

    जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीत सूर्यफूल व मक्याची प्रचंड आवक होत आहे. दररोज सुमारे 300 ते 400 वाहनांची मोजणी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.सध्या मका व सुर्यफुलाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

  • 14 May 2023 09:02 AM (IST)

    सिडकोची घरांसाठी लॉटरी

    म्हाडानंतर सिडको आता काढणार लॉटरी

    पाच हजार घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय

    प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेसाठी एक स्वतंत्र संगणक प्रणाली तयार केली

    घरे वाशी, जुईनगर, खारघर मानसरोवर उलवे कळंबोली या ठिकाणी घरे

  • 14 May 2023 08:56 AM (IST)

    चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानक परिसरामध्ये चार किलो गांजा जप्त 

    चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली

    याप्रकरणी एका आरोपीला अटक

    तेलंगणातून गडचिरोलीमार्गे किंवा कोरपणामार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी केली जाते

  • 14 May 2023 08:42 AM (IST)

    अकोल्यात कलम 144 लागू, दोन गटातील वादानंतर उचललं पाऊल

    जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून दोन गटात हिंसक मारामारी

    हिंसक जमावाने काही वाहनांचंही केलं नुकसान

    परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती

  • 14 May 2023 08:25 AM (IST)

    पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजे यांचा जयंती सोहळा

    पुरंदर किल्ल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं अभिवादन

    किल्ल्यावर महिलांनी पाळणा हलवत जन्मसोहळा केला साजरा

    पाळण्याला आकर्षक अशी सजावट करण्यात आली

    यावेळी शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • 14 May 2023 08:15 AM (IST)

    हडपसर रेल्वे टर्मिनल विकासासाठी 136 कोटी मंजूर

    हडपसर स्थानकावर नवीन तीन इमारती, प्रवाशांना बसण्यासाठी वेटिंग रूम, राहण्यासाठी रिटायरिंग रूम, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, छोटेसे कॅन्टीन, प्रशस्त पार्किंग, फलाटावर पूर्ण कव्हर्ड शेड यांसह अन्य सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार

    रेल्वे बोर्डाकडून हडपसर रेल्वे टर्मिनलसाठीचा निधी अखेर मंजूर

    पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनलचा विकास होणे गरजेचे

  • 14 May 2023 08:06 AM (IST)

    सांगली | जयंत पाटील यांना ईडीने नोटीस दिल्याच्या निषेधार्थ डिजिटल बोर्ड

    भाजपच्या नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा, असा बोर्ड

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ईडीच्या नोटिशीच्या निषेधार्थ लावला डिजिटल बोर्ड

    जतमधील एसटी स्टँडजवळ लावला बोर्ड

  • 14 May 2023 07:58 AM (IST)

    गोकुळ दूध संघात अध्यक्ष बदलाच्या हालचाली, अरुण डोंगळे होणार गोकुळचे नवे कारभारी

    गोकुळ दूध संघाच्या कारभारी नेत्यांच्या बैठकीत निर्णय

    विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील बुधवारी देणार राजीनामा

    गोकुळ दूध संघाच्या निवडणुकी वेळी दोन वर्षानंतर अरुण डोंगळे यांना अध्यक्ष पदाचा दिला होता शब्द

    आता पुढील दोन वर्ष अरुण डोंगळे यांना मिळणार संधी

  • 14 May 2023 07:57 AM (IST)

    रत्नागिरीत बारसूसह सहा गावातील माती परिक्षण पूर्ण

    माती परिक्षणासाठी 67 बोअरच्या माध्यमातून ड्रील

    माती परिक्षणाचे नमुने तपासणीसाठी पाठवले

    अहवाल येण्यासाठी महिना लागणार, अहवालावर प्रकल्पाचे भवितव्य

    माती परिक्षणपूर्ण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त देखील काढला

  • 14 May 2023 07:27 AM (IST)

    पुण्यात वर्षभरामध्ये प्रसूतीदरम्यान 124 महिलांचा मृत्यू

    तर राज्यभरात देखील प्रसूती दरम्यान मृत्यू पडलेल्या महिलांच्या आकडेवारीत मोठी वाढ

    राज्यात एकूण 1275 मातांचा प्रसूती दरम्यान मृत्यू

    राज्यातील शहरी भागात मृत्युमुखी पडलेल्या स्त्रियांचे प्रमाण अधिक

    राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाकडून धक्कादायक अहवाल समोर

    जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 41 मातांचा मृत्यू तर नंदुरबार नाशिक यवतमाळ हे जिल्हे देखील आघाडीवर

  • 14 May 2023 07:26 AM (IST)

    मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांच नावं द्या, संभाजी ब्रिगेडची राज्य सरकारकडे मागणी

    छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे संतोष शिंदे यांची मागणी

    मात्र मुंबई विद्यापीठाला महाराजांच नावं द्या, छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान होईल

    अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे

  • 14 May 2023 07:25 AM (IST)

    पुणे शहरात वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ, दोन वर्षात वाहन खरेदीमध्ये पुणे राज्यात अव्वल

    शहरामध्ये दुचाकी खरेदीचे प्रमाण वाढले दुपटीने

    2022 -23 या वर्षांमध्ये 1 लाख 21 हजार 722 वाहनांची पुणेकरांनी केली खरेदी

    इलेक्ट्रिक वाहन खरेदीमध्ये देखील पुणेकरांचा मोठा सहभाग

    इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी देखील शहरात तिपटीने वाढली

    एका वर्षात पुणेकरांकडून 29 हजार 851 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी

  • 14 May 2023 07:22 AM (IST)

    कर्नाटक विधिमंडळ पक्षाची आज बैठक, आज गटनेत्याची निवड होणार?

    कर्नाटकात काँग्रेसला प्रचंड यश मिळालं आहे, तब्बल आठ वर्षानंतर काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे

    काँग्रेसने 137, भाजपने 65, जेडीएसने 19 आणि इतरांनी तीन जागा जिंकल्या आहेत

    या विजयानंतर काँग्रेसने आता राज्यात सत्ता स्थापन्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत

    त्याचाच एक भाग म्हणून कर्नाटकात विधिमंडळ पक्षाची आज बैठक बोलावण्यात आली आहे

Published On - May 14,2023 7:18 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.