Maharashtra Breaking News Live | राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच बैठकीला येणार एकत्र

| Updated on: Aug 09, 2023 | 11:22 PM

Rahul Gandhi Parliament Speech Live Today: राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Live  | राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच बैठकीला येणार एकत्र
Breaking News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : लोकसभेत आजही अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. काल लोकसभेत या प्रस्तावावर चर्चा करताना शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यामुळे आजही या ठरावावर लोकसभेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे. प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज अमरावतीच्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन. आजपासून मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द, मुंबईकरांना मोठा दिलासा. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आज राजीनामा देण्याची शक्यता. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Aug 2023 11:20 PM (IST)

    ऑनलाईन गेम्स, कसिनो आणि घोड्यांच्या शर्यती यावर जीएसटी लागणार

    नवी दिल्ली | ऑनलाईन गेम्स, कसिनो आणि घोड्यांच्या शर्यती यावर जीएसटी लावला जाणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभेत 28 टक्के जीएसटी लावण्यासंबंधी विधेयक मांडले जाणार आहे. हे विधेयक येत्या 11 ऑगस्टला मांडलं जाणार आहे.

  • 09 Aug 2023 07:04 PM (IST)

    मीरा भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांची बदली

    मीरा भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांची नुकताच बदली झाली आहे. दिलीप ढोले यांच्या जागेवर मीरा भाईंदर मनपा आयुक्त पदी संजय काटकर यांचा नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप ढोले यांनी मोठा काळ मीरा भाईंदर मनपामध्ये गाजवला आहे.

  • 09 Aug 2023 06:54 PM (IST)

    हरी नरके यांचे पार्थिव थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचणार

    प्राध्यापक हरी नरके यांचे पार्थिव थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचणार आहे. थोड्या वेळात केले जाणार अंत्यसंस्कार. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि जवळचे लोक उपस्थित राहिले आहेत. मंत्री छगन भुजबळ हे देखील राहणार अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

  • 09 Aug 2023 06:25 PM (IST)

    पुण्यात शनिवारी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक

    पुण्यात शनिवारी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडणार आहे. बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच बैठकीला येणार एकत्र. शनिवारी सकाळी पुण्यात होणार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक

  • 09 Aug 2023 06:11 PM (IST)

    नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला नाशिकच्या आमदाराची दांडी

    नाशिकमधील एकमेव काँग्रेस आमदार असलेले हिरामण खोसकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली आहे. यामुळे आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आदिवासी दिनाचा कार्यक्रम केला आयोजित करण्यात आला होता. नाना पटोले यांनी जाहीर भाषणात आमदार हिरामण खोसकर यांच्यावर नाव न घेता केलीय टीका

  • 09 Aug 2023 05:59 PM (IST)

    कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच मोठं वक्तव्य

    नुकताच कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठे विधान केले आहे. 16 आमदार अपात्र होणार आणि त्यांच्या बरोबर गेलेलेही आमदार अपात्र होणार असे त्यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट निकाल दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष वेळकाढूपणा करतायेत. एका आमदाराला एक वकिलही दिला जाऊ शकतो. म्हणजे 16 वकिल बाजू मांडतील वेळ काढण्याचं अध्यक्ष काम करतायेत. नैतिकतेला धरून संविधानाला धरून अध्यक्षांची कृती नाही. राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा, असेही असीम सरोदे म्हणाले.

  • 09 Aug 2023 05:19 PM (IST)

    Lok Sabha Live | अमित शाह यांचा विरोधकांवर जोरदार घणाघात

    नवी दिल्ली | अमित शाह यांचं लोकसभेत भाषण सुरु झालंय. अमित शाह विरोधकांवर सडकून टीका करत आहेत. “सत्ता वाचवण्यासाठी आमचं राजकारण नाही. आम्ही सिद्धांतासाठी सत्ता सोडणारे आहोत. आम्ही सिद्धांताचं राजकारण करतो. अविश्वासाचा प्रस्ताव हा जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी सादर करण्यात आलाय.  पण जनतेला मोदी सरकारबद्दल विश्वास आहे”, असं अमित शाह आपल्या लोकसभेतील भाषणात म्हणाले.

  • 09 Aug 2023 04:51 PM (IST)

    माझा मविआशी संबंध नाही

    माझा मविआशी संबंध नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. युतीसाठी माझा फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुका लवकरच होतील. भाजप विरोधात आम्ही लढवणार आहोत. त्यासाठी तयारी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • 09 Aug 2023 04:22 PM (IST)

    राहुल गांधी यांची पाठराखण

    खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. ज्यांच्या मनात विष भरलंय ते समजू शकत नाहीत, असा पलटवार त्यांनी केला आहे. त्या ठाकरे गटाच्या खासदार आहेत.

  • 09 Aug 2023 04:09 PM (IST)

    राहुल गांधी यांच्याकडून संसदेत फ्लाईंग किस

    राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या स्मृती इराणी यांनी केला. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे 22 महिला खासदारांनी तक्रार दिली आहे.

  • 09 Aug 2023 03:45 PM (IST)

    हरी नरके यांच्या मृत्यूला लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार; मित्राकडून गंभीर आरोप

    हरी नरके यांच्या मृत्यूला लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नरकेंचे मित्र संजय सोनवणी यांनी केला. “अस्थमाचा त्रास नसतानाही त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना आजार मात्र हृदयाचा होता. जामनगरला गेल्यावर कळालं की उपचार चुकीचे होत आहेत. डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शासनाने याची चौकशी करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • 09 Aug 2023 03:35 PM (IST)

    कल्याण- शिळ महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल

    कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा चौकातील उड्डाण पुलावर गर्डर बसवण्याच्या कामाला आज रात्रीपासून सुरुवात होणार आहे. वाहतूक कोंडी न होण्यासाठी आजपासून पाच दिवसांसाठी कल्याण- शिळ महामार्गावरील वाहतुकीत पोलिसांनी मोठा बदल केला आहे. आजपासून (9 ऑगस्ट) सोमवारपर्यंत (14 ऑगस्ट) रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत यामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. 1- कल्याण फाटाकडून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड – अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद असेल. या वाहनांना कल्याण फाटा – मुंब्रा बायपास – खारेगाव टोलनाकामार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

    2- कल्याणकडून कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना खोणी नाका – तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

  • 09 Aug 2023 02:01 PM (IST)

    डोंबिवलीत भिडे गुरुजींविरोधात रिपब्लिकन सेनेचे आंदोलन

    भिडे गुरुजीच्या फोटोला आग लावत पायाखाली तुडवत आंदोलन

  • 09 Aug 2023 01:35 PM (IST)

    जन एल्गार मोर्चासाठी आमदार बच्चू कडूंचा ताफा अमरावती शहरात दाखल

    ओपन जिप्सीमधून बच्चू कडू अमरावती शहरात दाखल. बच्चू कडू यांचा आज शेतकरी, शेतमजूर आणि घरकुलसह 10 मागण्यांसाठी अमरावती विभागीय कार्यालयावर मोर्चा

  • 09 Aug 2023 01:22 PM (IST)

    भारत मातेच्या हत्येवर टाळ्या वाजवण हेच काँग्रेसचं लक्ष्य – स्मृती इराणी

    आम्ही शौचालयाच्या मुद्द्यावर बोलतो तेव्हा काँग्रेसवाले हसतात

  • 09 Aug 2023 01:18 PM (IST)

    भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात मनविसेचं आंदोलन

    वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आशिष बंगिनवार यांच्या विरोधात मनविसे आक्रमक. विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनसाठी लाच घेणाऱ्या डीन विरोधात मनसेचं आंदोलन. मनसे कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड. डॉ. आशिष बनगीनवार यांच्या विरोधात मनसेचा महाविद्यालयात गोंधळ सुरु.

  • 09 Aug 2023 01:00 PM (IST)

    काँग्रेसने काश्मिरी पंडितांचा आवाज कधीच ऐकला नाही

    काँग्रेसने काश्मिरी पंडितांचा आवाज कधीच ऐकला नाही. काँग्रेसचं चाललं तर ते कलम 370 परत आणतील.

  • 09 Aug 2023 12:55 PM (IST)

    गांधी कुटुंबासाठी भारत म्हणजे फक्त उत्तर भारत!- स्मृती इराणी

    गांधी कुटुंबासाठी भारत म्हणजे फक्त उत्तर भारत! भारत मातेच्या हत्त्येच्या वक्तव्यावर काँग्रेसने टेबल वाजवला, काँग्रेसची ही कृती निषेधार्ह! मणिपूर कधीही भारतापासून वेगळा होणार नाही. इंडिया आघाडीचे लोक भारत तोडण्याची भाषा करतात.

  • 09 Aug 2023 12:50 PM (IST)

    स्मृती इराणींचा राहुल गांधींना पलटवार

    तुम्ही म्हणजे भारत नाही, स्मृती इराणींचा राहुल गांधींना पलटवार. मणिपूर विभाजीत नाही, भारताचा अविभाज्य घटक! मणिपूर खंडित ना था, ना है, ना होगा!

  • 09 Aug 2023 12:48 PM (IST)

    Rahul Gandhi LIVE : मोदी देशाचा आवाज ऐकत नाहीत फक्त 2 लोकांचा आवाज ऐकतात

    तुम्ही भारत मातेचे रक्षक नाहीत तर हत्यारे आहात. तुम्ही देशप्रेमी नाही तर देशद्रोही आहात. मणिपूरमध्ये भाजपने भारतमातेची हत्या करण्यात आली. एक माझी आई इथे आहे, दुसऱ्या आईची हत्या भाजपने मणिपूरमध्ये केली. मोदी देशाचा आवाज ऐकत नाहीत फक्त दोन लोकांचा आवाज ऐकतात. रावण फक्त दोन लोकांचंच ऐकायचा, एक मेघनाद आणि दुसरा कुंभकर्ण. रावणाप्रमाणे मोदी दोन लोकांचंच ऐकतात- एक अमित शाह आणि दुसरे अदानी. रावणाला त्याच्या अंहकारानेच मारलं!

  • 09 Aug 2023 12:41 PM (IST)

    मणिपूरमध्ये सरकारने हिंदुस्थानाची हत्या केली!

    “मणिपूरमध्ये सरकारने हिंदुस्थानाची हत्या केली!” राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल. सत्ताधारी खासदार आक्रमक. राहुल गांधींच्या मणिपुरवरील वक्तव्यावर भाजप आक्रमक, लोकसभेत गदारोळ. राहुल गांधींनी माफी मागावी भाजप खासदार किरेन रिजिजू यांची मागणी.

  • 09 Aug 2023 12:37 PM (IST)

    Rahul gandhi speech LIVE: एका महिलेनं सांगितलं, माझ्या डोळ्यासमोर मुलाला गोळी झाडली

    मणिपूरवर तुम्ही खोटं बोलता, मी नाही. एका महिलेनं सांगितलं, माझ्या डोळ्यासमोर मुलाला गोळी झाडली. ते दृश्य आठवून माझ्यासमोर ती महिला बेशुद्ध झाली होती. घटना सांगतानाच ती बेशुद्ध झाली होती. मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केलीये – राहुल गांधी

  • 09 Aug 2023 12:33 PM (IST)

    Rahul Gandhi Speech Live: पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर भारतात नाही

    मी मणिपूर या शब्दाचा उच्चार केला, मात्र सत्यात आज मणिपूर अस्तित्त्वात नाही. मणिपूरला तुम्ही तोडलंत, त्याचे दोन भाग केलेत. पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूर आता राहिलेलं नाही तुम्ही त्याचे दोन भाग केलेत. पंतप्रधान मोदी मणिपूरला गेले नाही मी गेलो.

  • 09 Aug 2023 12:30 PM (IST)

    …म्हणूनच मी देश समजून घ्यायचा असं ठरवलं

    यात्रेदरम्यान अहंकार नाहीसा झाला. यात्रेत शेतकऱ्यांनी दुःख मांडली. यात्रेत चालण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. आज मी आक्रमक बोलणार नाही. दहा वर्षे मला शिव्या खाल्ल्या म्हणूनच मी देश समजून घ्यायचा असं ठरवलं – राहुल गांधी

  • 09 Aug 2023 12:24 PM (IST)

    भारत जोडो यात्रा सुरु केली तेव्हा माझ्या मनात अहंकार होता- राहुल गांधी

    अविश्वास ठरावावर राहुल गांधींचं भाषण. अदानींवर बोलणार नसल्याचं सांगितलं. देश समजून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेला सुरुवात. भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलो. देश समजून घेण्यासाठी मी मोदी सरकारच्या जेलमध्ये जायला तयार होतो. भाजपच्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही. भारत जोडो यात्रा सुरु केली तेव्हा माझ्या मनात अहंकार होता. दुसऱ्याच दिवशी माझा अहंकार नष्ट झाला. भारत देश अहंकार नष्ट करतो – राहुल गांधी

  • 09 Aug 2023 12:16 PM (IST)

    आज दिमाग से नहीं दिल से बोलुंगा!

    सत्ताधाऱ्यांना आज घाबरण्याचं कारण नाही. सत्ताधाऱ्यांने रिलॅक्स राहावं. आज दिमाग से नहीं दिल से बोलुंगा. मी आज अदानींवर बोलणार नाही, मी अदानींवर बोलण्याने त्रास – राहुल गांधी

  • 09 Aug 2023 12:15 PM (IST)

    संविधानाला वाचवण्याचं युद्ध सुरु- नाना पटोले

    संविधानाला वाचवण्याचं युद्ध सुरु आहे. काँग्रेस कायम लढत राहणार- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

  • 09 Aug 2023 12:05 PM (IST)

    तोडफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची अधोगती- विजय वड्डेटीवार

    विरोधी पक्षनेता, ओबीसी नेता म्हणून अनेक आव्हानं पेलायची आहेत. तोडफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची अधोगती झालीये. मोदींच्या अहंकारामुळे देश अधोगतीकडे. सरकारमध्ये चुकीची धोरणं, भ्रष्टाचार आहे. भाजपकडून तोडफोडीचं राजकारण – विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार

  • 09 Aug 2023 11:45 AM (IST)

    अविश्वास प्रस्तावावर थोड्याच वेळात सुरू होणार चर्चा

    अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत थोड्याच वेळात चर्चा सुरू होणार आहे. आज या चर्चेचा दुसरा दिवस आहे. तर विरोधकांच्या गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

  • 09 Aug 2023 11:37 AM (IST)

    सामान्य जनतेला न्याय देण्याचं आमचं काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    आमचं सरकार सामान्यांच्या आशांना बळ देणारं आहे. सामान्य जनतेला न्याय देण्याचं आमचं काम आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवरायांच्या विचारांवर राज्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, असेही ते म्हणाले.

  • 09 Aug 2023 11:25 AM (IST)

    महापालिका मुख्यालयासमोर पुणेकरांचं आंदोलन

    पुण्यातील विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी महापालिका मुख्यालयाला घेराव घालत आंदोलन सुरू केले आहे. विविध बॅनर्स हाती घेऊन पुण्यातील सामाजिक संस्था आणि नागरिक आंदोलन करत आहेत.

  • 09 Aug 2023 11:08 AM (IST)

    रोहित पवार यांची प्रा.हरी नरके यांना श्रद्धांजली

    अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी रामचंद्र नरके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत रोहित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

  • 09 Aug 2023 10:56 AM (IST)

    पंतप्रधान मोदींची ठाकरे आणि पवारांबद्दल दोन मोठी वक्तव्य

    भाजपने नाही तर उद्धव ठाकरेंनी युती तोडली असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला याशिवाय शरद पवार यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रसनं त्यांना डावलंलं असल्याचेही ते म्हणाले. दिल्लीत एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान बोलत होते. 

  • 09 Aug 2023 10:47 AM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आज होणार

    एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. 90 हजार कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आज होणार असल्याचे सांगण्याच येत आहे.

  • 09 Aug 2023 10:34 AM (IST)

    आजच्याच दिवशी इंग्रजाना “जले जाओ”चा नारा दिला होता- मुख्यमंत्री शिंदे

    ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत आहेत. भारतीयांनी सर्वात प्रथम या मैदानात इंग्रजांना जले जाओचा नारा दिला होता. इंग्रजांसोबतच्या लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी केले होते. कित्तेकांनी आपले सर्वस्व पणाला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 09 Aug 2023 10:22 AM (IST)

    गुलामीच्या सर्व खुणा संपवण्याची सुरूवात झाली आहे – देवेंद्र फडणवीस

    ऑगस्ट क्रांती मैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला संबोधीत करत आहेत. गुलामीच्या सर्व खुणा संपवण्याची सुरवात झाली असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. भारतात इंग्रजांनी केलेल्या सर्वच गोष्टी या उत्तम असल्याचे इंग्रजांनी भारतीयांमध्ये भरवले होते, मात्र ते चुकीचे आहे असे फडणवीस म्हणाले. ऑगस्ट क्रांती मैदानाच्या नुतनीकरणाच्या कार्यक्रमात ते बोलत आहेत.

  • 09 Aug 2023 10:13 AM (IST)

    आज शहिदांना नमन करण्याचा दिवस- देवेंद्र फडणवीस

    ऑगस्ट क्रांती मैदानाच्या विकास कामाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रस स्थळी दाखल झालेले आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानाचा पालिकेने उत्तम विकास केला असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आजचा दिवस हा शहिदांना नमन करण्याचा दिवस आहे. ते होते म्हणून आपण आहोत असेही फडणवीस म्हणाले.

  • 09 Aug 2023 09:53 AM (IST)

    यवतमाळमध्ये आज जनआक्रोश मोर्चा

    मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आज यवतमाळमध्ये विविध 28 संघटनाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन

    यवतमाळच्या आझाद मैदानातून मोर्चा सुरू होणार

  • 09 Aug 2023 09:42 AM (IST)

    राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी आजचा दिवस महत्वाचा

    राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे

    आज ठाण्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे

  • 09 Aug 2023 09:32 AM (IST)

    दौंडमध्ये शिक्षकाची आत्महत्या

    विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने शिक्षकाची तणनाशक पिऊन आत्महत्या

    दौंड तालुक्यातील जावजी बुवाचीवाडी हद्दीतील होलेवस्ती प्राथमिक शाळेतील धक्कादायक प्रकार

  • 09 Aug 2023 09:17 AM (IST)

    शिवसेनेची निवडणुकीची तयारी सुरू

    एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीची सुरू तयारी केली आहे

    शिवसेनेकडून जिल्हा निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत

  • 09 Aug 2023 09:00 AM (IST)

    पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

    चांदणी चौक उड्डाणपूलासह रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. येत्या शनिवारी चांदणी चौक मार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकापर्ण होणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार करण्यात येणार आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

  • 09 Aug 2023 08:51 AM (IST)

    राज्यात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णसंख्येत वाढ

    राज्यात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत 2 लाख 48 हजार 851 या बाधित झाले आहेत. पुणे जिल्ह्यात 16, 105 रुग्ण असून,पिंपरी-चिंचवडमध्ये 4,445 रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. ऍडिनो व्हायरसमुळे डोळे येण्याचा संसर्ग होतो. हा सौम्य संसर्ग असला, तरी एका व्यक्तीला डोळे आले तर संपर्कात आलेल्या दुसऱ्याला याची लागण होऊ शकते. राज्यातील बुलढाणा, जळगाव, पुणे, नांदेड, अमरावती, अकोला या जिल्ह्यात अनेकजण बाधित झाले आहेत.

  • 09 Aug 2023 08:29 AM (IST)

    इर्शाळवाडीतील विस्थापीत कुटुंबांच्या पुर्नवसनाच्या कामाला गती

    रत्नागिरी- इर्शाळवाडीतील विस्थापीत कुटुंबांच्या पुर्नवसनाच्या कामाला गती मिळाली आहे. एमएमआरडीसीकडून ( सिडको) घरांच्या लेआऊटला मंजूरी मिळाली आहे. खालापूरमधील मौजे चौक इथं केलं जाणार कुटुंबाचे पुर्नवसन केले जाणार आहे.

  • 09 Aug 2023 08:22 AM (IST)

    पीक विम्यातून ही पीकं वगळ्यामुळे शेतकरी चिंतेत, आमदारांशी चर्चा केल्यानंतर सुध्दा…

    राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा देण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून एक रुपया घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभ देण्यात येणार आहे. मात्र पीक विम्यातून पपई आणि मिरची पिकाला यातून वगळ्यामुळे काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही शेतकऱ्यांनी आमदारांची भेट घेतली. परंतु सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

  • 09 Aug 2023 08:08 AM (IST)

    10 लाखाची लाच स्वीकारणाऱ्या पालिका वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला अटक

    पुणे : तब्बल 10 लाखाची लाच स्वीकारणाऱ्या पालिका वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला अटक केल्यामुळे खळबळ माजली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार डॉ. आशिष बनगीनवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 09 Aug 2023 08:00 AM (IST)

    नितीन देसाई मृत्यूप्रकरणी एडलवाईजच्या एमडीची पुन्हा चौकशी

    नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी एडलवाईज कंपनीच्या एमडींना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 11 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे. तसेच येताना सर्व कागदपत्रं घेऊन येण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

  • 09 Aug 2023 07:38 AM (IST)

    बच्चू कडू पुन्हा मैदानात, आपल्याच सरकारविरोधात आज एल्गार मोर्चा

    प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आफल्याच सरकारच विरोधात बच्चू कडू यांनी आज जन एल्गार मोर्चाची हाक दिली आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. मोर्चातून एकूण 10 मागण्या मांडण्यात येणार आहेत.

  • 09 Aug 2023 07:23 AM (IST)

    आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा मैदानात, कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

    मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. औरंगाबादच्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर हे मोर्चेकरी मुंबईकडे रवाना होणार आहेत.

  • 09 Aug 2023 07:19 AM (IST)

    पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आज राजीनामा देण्यातची शक्यता

    पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपुष्टात येत असल्याने शरीफ राजीनामा देण्याची शक्यता आहे.

Published On - Aug 09,2023 7:16 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.