Maharashtra Marathi Live News | राज्यपालांकडून चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख, चर्चांना उधाण

| Updated on: Aug 29, 2023 | 8:44 AM

Maharashtra Breaking News : महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर.

Maharashtra Marathi Live News | राज्यपालांकडून चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख, चर्चांना उधाण

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजितदादांच्या हस्ते पार पडणार 106 फूटी ध्वजाचा लोकापर्ण सोहळा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूची नियुक्ती रद्द करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आज पुण्यात जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. शरद पवार गटाकडून ही निदर्शने करण्यात येणार आहेत. यासह राज्य, देश आणि विदेशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Aug 2023 09:20 PM (IST)

    CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांची सून आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीने घातली फुगडी

    मंगळागौर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची सून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीने घातली फुगडी. शितल म्हात्रे आणि इतरही शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी मंगळागौर मध्ये घातली फुगडी.

  • 28 Aug 2023 09:19 PM (IST)

    Devendra Fadnavis On Fda | विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या नंबरला : देवेंद्र फडणवीस

    मुंबई | “महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत पहिल्या नंबरला आहे. महाराष्ट्र 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे. एप्रिल ते जून दरम्यान राज्यात 36 हजार 634 कोटींची गुंतवूक केली आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सत्तेत आल्यानंतर आम्ही राज्याला एक नंबर करुन दाखवू असं म्हटलं होतं, ते आम्ही करुन दाखवलंय” असं म्हणत फडणवीस यांनी त्यांनी दिलेलं आश्वसन पूर्ण केल्याचं म्हटलं.

  • 28 Aug 2023 08:59 PM (IST)

    Pandharpur News | सुजय विखे पाटील यांचा नाना पटोले यांच्याबद्दल मोठा दावा

    पंढरपूर | खासदार सुजय विखे पाटील यांनी नाना पटोले यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. “नाना पटोले हे भाजपचे आहेत. नाना पटोले आहेत म्हणून आमचं सरकार आलं. जर त्यांनी स्पीकरची खुर्ची सोडली नसती तर आमचं सरकार आलं नसतं”, असं खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

  • 28 Aug 2023 08:37 PM (IST)

    Pune News | पुण्यात मोठी वाहतूक कोंडी, नागरीक हवालदिल

    पुणे | पुण्याच्या चांदणी चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालीय. पुण्यात नुकतंच 12 ऑगस्टला चांदणी चौक उड्डाणपुलाचे उदघाटन झालं होतं. मात्र अद्याप वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळालेला नाही. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्याचं चित्र आहे.

  • 28 Aug 2023 08:22 PM (IST)

    Pune News | राज्यपालांकडून चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख

    पुणे | पुण्यात छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा वितरण सोहळा सुरु आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात भाषण करताना राज्यपाल रमेश बैस यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. खरंतर त्यांच्याकडून तसा उल्लेख अनावधाने करण्यात आला असावा. पण याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाल्या आहेत.

  • 28 Aug 2023 07:58 PM (IST)

    Pune News- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पुण्यातील पुरस्कार सोहळ्यात मोठी घोषणा

    शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, मगाशी अजित दादांनी सांगितले की, खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा राष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करावा. आज मी 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करावा असे मी जाहीर करतो.

  • 28 Aug 2023 07:49 PM (IST)

    Pune News- अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मोठी मागणी

    शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभमध्ये अजित पवार यांनी मोठी मागणी केली आहे. अजित पवार हे म्हणाले की, पुरस्कार्थींची रक्कम वाढवावी. एक लाखांची रक्कम तीन लाख करावी आणि तीन लाखांची रक्कम पाच लाख करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करतो. पुढे तर कराच पण आज दिलेल्या पुरस्कार्थींना ही रक्कम अदा करता येईल.आजच्या पुरस्कार्थींचा विचार केला तर 2 कोटी 38 लाख रुपये लागतील. मी अर्थ खात्यातून ती रक्कम द्यायला तयार आहे.

  • 28 Aug 2023 07:41 PM (IST)

    Jalna News- मराठा समाजाच्या मागण्यासाठी महामार्गावर आंदोलन

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी उद्या अंबड तालुक्यातील सोलापूर- धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 10 हजार पेक्षा जास्त मराठा समाज या आंदोलनात सहभागी होणार आहे. या महामार्गावर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

  • 28 Aug 2023 07:32 PM (IST)

    ‘हा’ दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करावा- अजित पवार

    नुकताच पुण्यातून बोलताना अजित पवार म्हणाले की, ऑलिम्पिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्मदिन हा राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करावा, अशी मागणी मी करणार आहे. अजित पवार हे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ बोलले आहेत.

  • 28 Aug 2023 07:24 PM (IST)

    अजित पवारांनी माझ्याकडून क्रीडा खाते काढून घेतले- गिरीश महाजन

    पुणे येथील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा केलाय. गिरीश महाजन म्हणाले की, गेली तीन वर्षे हे पुरस्कार दिले गेले नव्हते, मी क्रीडा मंत्री झाल्यावर हे पुरस्कार जाहीर केले. परंतू मधल्या काळात आमच्याकडे अजित दादा आले आणि त्यांनी माझ्याकडून क्रीडा खाते काढून घेतले. आता ते का घेतलं? हे मला आणि दादांनाच माहीत आहे, ते मी इथं सांगणार नाही.

  • 28 Aug 2023 07:11 PM (IST)

    Pune News- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्धवट सोडून निघाले देवेंद्र फडणवीस

    शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ हा पुण्यातील बालेवाडी येथे सुरू आहे.  राज्यपाल रमेश भेंस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मात्र, हा पुरस्कार सोहळा अचानक सोडून देवेंद्र फडणवीस हे निघाले आहेत.

  • 28 Aug 2023 07:09 PM (IST)

    Malegaon News – मालेगाव सूरत महामार्गावर शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

    नाशिकच्या नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून लिलाव बंद करण्यात आला आहे. मालेगाव सूरत महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.  नाफेडने केवळ एकच वाहन लिलाव केले

  • 28 Aug 2023 06:55 PM (IST)

    Kashmir Terrorist : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई, प्रॉपर्टी जप्त

    जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. दोन दहशतवाद्यांची प्रॉपर्टी जप्त केली आहे. यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहून दहशतवादी कारवाया करणाऱ्या मोहम्म अमीन भट आणि अब्दुल रशीद यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांविरोधात यापुढे अशीच कारवाई होत राहील असं पोलिसांनी सांगितलं आहे.

  • 28 Aug 2023 06:40 PM (IST)

    कोच्चितून बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो प्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची अफवा

    कोच्चितून बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 6482 फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची अफवा उडाली होती. प्रोटोकॉलनुसार, कोच्ची विमानतळावर तपास यंत्रणांनी विमानाची तपासणी केली. त्यानंतर त्यात काहीच आढळलं नाही आणि उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल इंडिगो यांनी खेद व्यक्त केला आहे.

  • 28 Aug 2023 06:18 PM (IST)

    Tatkare On Bhujbal : भुजबळ यांनी पवारांवर केलेल्या वक्तव्याबाबत उद्या बोलेन- तटकरे

    छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर काय बोलले याबाबत मी उद्या सखोलपणे भूमिका मांडणार आहे, असं सुनिल तटकरे यांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी थेट बीडच्या सभेबाबत भाष्य केलं. बीडकरांनी अजितदादांना पाठिशी ठामपणे असल्याचं दाखवून दिलं आहे आणि यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो.

  • 28 Aug 2023 06:04 PM (IST)

    Ajit Pawar On Bhujbal : भुजबळ यांनी पवारांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी अजित पवार यांनी काढलं अंग

    अजित पवार यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यातून अंग काढलं आहे. मी जेथे बसलो होतो तेथे ते बोलले हे नीट ऐकू येत नव्हतं. त्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही. सोशल मीडियावर त्यांनी असं काही बोलल्याचं निदर्शनास आलं. पण मी अजून काही त्यांच्याशी बोललो नाही. पण मी अजून काही त्यांच्याशी बोललो नाही. कोणच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.

  • 28 Aug 2023 04:48 PM (IST)

    जेजुरीत दीड महिना खंडोबाच्या मंदिराचा गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

    जेजुरीत दीड महिना खंडोबाच्या मंदिराचा गाभारा दर्शनासाठी बंद राहणार आहे. 5 ऑक्टोंबरपर्यंत गाभारा दुरूस्तीचे काम चालणार आहे. जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहेत. मंदिराचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी माहिती दिली आहे.

  • 28 Aug 2023 03:06 PM (IST)

    पुण्यामध्ये शरद पवार गटाकडून भुजबळांविरोधात आंदोलन

    मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात पुण्यामध्ये शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. शरद पवारांबाबत बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी हे शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. पुण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाल हे आंदोलन करण्यात आलं.

  • 28 Aug 2023 01:55 PM (IST)

    औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली

    औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. जायकवाडी धरणातून येणारं लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट असताना हे लाखो लिटर पाणी वाया गेलं. सध्या शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. आता पाईपलाईन फुटल्याने शहराला पाणी पुरवठ्यात खंड पडण्याची शक्यता आहे.

  • 28 Aug 2023 01:40 PM (IST)

    सामनातील अग्रलेखाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

    अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असून नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. सामनातील अग्रलेखाबाबत ते म्हणाले, “प्रत्येक वृत्तपत्रात माझा उदो-उदो केलाच पाहिजे अशी अपेक्षा नाही.”

  • 28 Aug 2023 01:30 PM (IST)

    सांगली : विद्यार्थ्यांना विषबाधेप्रकरणी आश्रम शाळेबाहेर पालकांचा जमाव

    सांगली | जत तालुक्यातील उमदी इथल्या समता आश्रम शाळेतील 131 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याप्रकरणी पालकांनी शाळेत जमावल केला आहे. पालकांनी आश्रम शाळेवर कारवाईची मागणी केली आहे.

  • 28 Aug 2023 01:20 PM (IST)

    गणपती विसर्जन मिरवणुका वेळेत करण्यावर भर- अजित पवार

    “मानाचे गणपती हे मानाचे आहेतच पण इतर मंडळांना पण पोलिसांनी चांगली वागणूक दिली पाहिजे. कोणाच्याही मनात दुरावा निर्माण होऊ नये. यासंदर्भातील सर्व सूचना आम्ही घेतल्या आहेत. सर्वांनी या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल,” असं वक्तव्य अजित पवार यांनी गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत केलं. या बैठकीत गणपती मिरवणूक आणि विसर्जनाबाबत चर्चा झाली.

  • 28 Aug 2023 01:10 PM (IST)

    गणपती मंडळांच्या बैठकीत अजित पवारांनी घेतली चंद्रकांत पाटील यांची फिरकी

    चंद्रकांत पाटील यांच्या हिंदी बोलण्यावरून अजित पवार यांनी मिश्किल विधान केलं. “चंद्रकांत दादा तुम्ही पुण्यामध्ये आज मधूनच हिंदी का बोलायला लागले आहात, ” असं म्हणताच चंद्रकांत पाटीलदेखील खळखळून हसले.

  • 28 Aug 2023 12:57 PM (IST)

    उत्तर महाराष्ट्र – मराठवाडा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार

    अहमदनगर | समन्यायी पाणी वाटपावरून शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे आक्रमक झाले आहेत. पाणी सोडण्याला आम्ही तीव्र विरोध करू, अशी भूमिका सदाशिव लोखंडेंनी घेतली आहे. “तुम्ही घाटमाथ्याच्या पाण्यासंदर्भात आम्हाला शब्द द्या. आम्ही त्याचा पाठपुरावा करू.  काहीही झालं तरी आम्ही आमच्या हक्काचं पाणी देणार नाही. आमचं पोट उपाशी ठेवून दुसऱ्याचं पोट आम्ही भरायला तयार नाही,” असं त्यांनी केलं स्पष्ट

  • 28 Aug 2023 12:17 PM (IST)

    उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे टाइमपास – संजय शिरसाट यांची टीका

    उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे टाइमपास होती. ते सध्या रामदास आठवलेंची कॉपी करतात, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी टीका केली आहे.

    तसेच राऊतांच्या फाटक्या तोंडाला महाराष्ट्र वैतागला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

  • 28 Aug 2023 11:45 AM (IST)

    अनेक भागांत दुष्काळी स्थिती, भविष्यात पाणी टंचाई होईल – वडेट्टीवार

    अनेक भागांत दुष्काळी स्थिती  आहे , भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारने याकडे वेळीच लक्ष द्यावं, अन्यथा जनता तुम्हाला फिरू देणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेजची मागणी करावी लागले, असेही त्यांनी नमूद केले.

  • 28 Aug 2023 11:26 AM (IST)

    ठाणे : राष्ट्रवादीच्या गटाचं छगन भुजबळांविरोधात आंदोलन

    राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी भुजबळांच्या टीकेचा निषेध केला आहे.

  • 28 Aug 2023 11:12 AM (IST)

    आधी 50 खोकेच्या घोषणा, आता अजितदादा आले तर तोंड बंद – गुलाबराव पाटील यांची विरोधकांवर टीका

    वरती भाजप, कंबर शिवसेनेची आणि हातपाय राष्ट्रवादीचे, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्रिशूळ सरकारचं अनोखं वर्णन केलं आहे.

    इतकंच नाही तर आधी 50 खोकेच्या घोषणा दिल्या जात होत्या, मात्र आता अजित दादा आमच्या सोबत आल्यावर तोंड बंद झालं, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे.

  • 28 Aug 2023 11:05 AM (IST)

    उद्धव ठाकरेंची नितीन देसाईंच्या स्टुडिओवर नजर होती – नितेश राणे

    उद्धव ठाकरे यांची नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओवर नजर होती, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरेंनी नितीन देसाई यांना मदत का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

  • 28 Aug 2023 10:36 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या काळात तुम्ही काय केलं ? बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

    फडणवीसांवर केलेल्या टीकेचा उद्रेक मुंबईत होईल, महाविकास आघाडीच्या काळात तुम्ही काय केलं ? उद्धव ठाकरेंचं रोजचं पतन होत आहे. महाविकास आघाडीच्या काळात भाजपच्या आमदारांना निधी मिळाला नाही अशी टीका चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. शिंदे फडणवीस विरोधात असलेल्या आमदारांना सुध्दा निधी देतात असं बावनकुळे यांनी सांगितलं. भाजपसोबत येण्याचा अजित दादांचा निर्णय चांगला आहे. बारामतीकरांनी अजितदादांचं नेतृत्व स्विकारलं आहे. त्यांचं नेतृत्व शरद पवारांना का मान्य नाही असंही बावनकुळे म्हणाले.

  • 28 Aug 2023 10:18 AM (IST)

    देशाच्या अमृत कालखंडामध्ये आपण आहोत – अजित पवार

    देशाच्या अमृत कालखंडामध्ये आपण आहोत, लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. ध्वजाकडे पाहिल्यानंतर आपली छाती भरून येते. त्यामुळे आपला राष्ट्राभिमान जागा होत असतो. चंद्रयान 3 मुळे देशाचा लौकिक वाढला आहे. शास्त्रज्ञांचे देशावसीयांकडून मी अभिनंदन करतो असं अजित पवार म्हणाले.

  • 28 Aug 2023 10:07 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात आज प्रचंड गर्दी

    दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात आज प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. दरम्यान विश्वस्त मंडळाच्या वतीने येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी सगळ्या व्यवस्था चोख करण्यात आल्या असून सुमारे 25000 भाविकांना खिचडी आणि दुधाचा वाटप करण्यात येणार आहे.

  • 28 Aug 2023 10:06 AM (IST)

    कालीचरण महाराजांचा संतोष बांगर यांना पाठींबा

    संतोष बांगर यांच्यासारखे हिंदुत्ववादी राजकारणी समाजात आहेत, त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याकरता आज मी या कावड यात्रेत सहभागी होत असल्याचं कालीचरण महाराज यांनी सांगितलं आहे.

  • 28 Aug 2023 09:59 AM (IST)

    Sanjay Raut : राज्यात काहीच राहिले नाही- संजय राऊत

    एकेवेळी महाराष्ट्रात बैठका होत होत्या. आता गुजरातमध्ये बैठका होत आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बैठकांसाठी गुजरातमध्ये जात आहेत. राज्यात आता काहीच राहिले नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

  • 28 Aug 2023 09:55 AM (IST)

    maharashtra news : गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक

    पुण्यात आज जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक होणार आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

  • 28 Aug 2023 09:40 AM (IST)

    maharashtra news : लाच घेताना एकास अटक

    चंद्रपूर शहरातील दुर्गापूर पोलीस स्टेशन मधील एका सहायक उपनिरीक्षकाला 50 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. नरेश शेरकी असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

  • 28 Aug 2023 09:25 AM (IST)

    Ajit Pawar : अजित पवार पुणे दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अजित पवार यांच्या हस्ते 106 फुटी ध्वजाचा लोकापर्ण सोहळा करण्यात येणार आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सोहळ्याला अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.

  • 28 Aug 2023 09:12 AM (IST)

    Maharashtra News : मुंबईत लागले बॅनर

    मुंबईमध्ये इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी वांद्रे आणि महिमामध्ये इंडिया आघाडीकडून मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर लिहिले आहे “JUDEGA BHARAT” “JEETRGA INDIA” INDIA Meet 31 August to 1st September

  • 28 Aug 2023 08:59 AM (IST)

    Raosaheb danve : रावसाहेब दानवे यांनी मोडले वाहतूक नियम

    रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोडला वाहतूक नियम. विना हेल्मेट आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या बुलेटवरुन मारली रपेट. रावसाहेब दानवे यांनी स्वतःच्याच बुलेटवरून फिरताना वाहतूक नियम मोडले. बुलेटच्या नंबरप्लेटवर लिहिले होते बॉस. बॉस लिहिलेल्या बुलेटवरून विना हेल्मेट मारली रपेट

  • 28 Aug 2023 08:44 AM (IST)

    Crime News | अहमदनगरमध्ये चार युवकांना मारहाण

    अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात चार युवकांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. 25 ऑगस्टला ही घटना घडली. पीडित व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात 6 जणांची नाव घेण्यात आली असून कलम 307,364 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • 28 Aug 2023 08:27 AM (IST)

    chhagan bhujbal : भुजबळ यांच्या वक्तव्याने शरद पवार समर्थक नाराज, आंदोलनाच्या पवित्र्यात

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी काल बीडच्या सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शरद पवार समर्थकांमध्ये नाराजी आहे. “साहेब तेलगी प्रकरणातील तुम्ही माझा राजीनामा घेतला होता, तुमच्यावर सुद्धा काही आरोप झाले होते, तेव्हा तुम्ही राजीनामा का नाही दिला?” असं छगन भुजबळ म्हणाले होते. पुण्यात शरद पवार समर्थकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • 28 Aug 2023 08:08 AM (IST)

    Poisoning to students | 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

    जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. मुलांवर तातडीने उपचार सुरु, आहेत. सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना केल्या आहेत.

  • 28 Aug 2023 08:00 AM (IST)

    savitribai phule pune university : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूची नियुक्ती रद्द करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूची नियुक्ती रद्द करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राजकीय दबावातून ही नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ती रद्द केली पाहिजे, अशी मागणी करतानाच विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यामागे नेमके कारण काय? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

  • 28 Aug 2023 07:47 AM (IST)

    Raksha Bandhan : कल्याण मार्केटमध्ये राखी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, चांद्रयान, महाकाल आणि रुद्राक्षाच्या राख्यांना पसंती

    दोन दिवसावर आलेल्या रक्षाबंधन सणासाठीची बाजारांमध्ये लगबग दिसत आहे. काल रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळपासूनच राखी खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. यंदा बाजारात चांद्रयान, महाकाल आणि रुद्राक्षाची राखी ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

  • 28 Aug 2023 07:35 AM (IST)

    bhimashankar temple : तीर्थक्षेत्र भीमाशंकरला भाविकांची प्रचंड गर्दी, श्रावण सोमवार निमित्ताने रांगाच रांगा

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दुसऱ्या श्रावणी सोमवार असल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भल्या पहाटेपासून भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ मोठ्या रांगा लावत दर्शन बारीतून दर्शन घेत आहेत. पहाटेची आरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. संपूर्ण देशभरातून शिवभक्त भीमाशंकर परिसरामध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे.

  • 28 Aug 2023 07:29 AM (IST)

    ssc result : इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल; ऑनलाईन निकाल पाहता येणार

    इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने दहावीची परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट आणि तर बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत झाली होती. अतिवृष्टीमुळे तीन परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करून परीक्षा घ्यावी लागली होती. आता या परीक्षांचा आज निकाल लागणार आहे.

Published On - Aug 28,2023 7:24 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.