Maharashtra Breaking News Live | आदित्य ठाकरे यांचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात सहभागी
Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाबाबत आज विशेषाधिकार समिती चर्चा करणार आहे. हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार उडाला आहे. त्यामुळे राज्याचं तब्बल 8 हजार कोटी रुपयांच नुकसान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात पुन्हा पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
BJP MLA | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिला सरकारला घरचा आहेर
चिमूरडीच्या हत्येच्या निषेधार्थ आमदार गायकवाड यांनी मुक मोर्चा काढला. राजकीय लोकांचे पोलीस बंदोबस्त काढा आणि सर्वसामान्य जनतेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवा अशी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.
-
मनीषा कायंदे यांनी केले मोठे भाष्य
विरोधकांना काही काम उरलेला नाहीये. विरोधक म्हणून काही कन्स्ट्रक्टिव्ह काम करणार काही मदत करणे किंवा सरकार पुढे योग्य ते विषय आणने हे कधीच नसते. सभागृहात देखील पूर्ण पराभूत मनस्थितीत होते. त्यांना फक्त निवडणुका कधी होत आहेत हेच पाहिजे आहे. कोणाला ठाण्यात लढायचे कोणाला वरळी सोडून पुण्यात लढायचे कोणाला अमरावतीत लढायचं आहे, असे मनीषा कायंदे या म्हणाल्या आहेत.
-
-
Pune News | नीलम गोऱ्हे यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून विरोध
नीलम गोऱ्हे यांनी बोलावलेल्या गणेश मंडळाच्या बैठकीला काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आलाय. जिल्ह्याला पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना एका पक्षाच्या पदाधिकारी बैठक कशा घेऊ शकतो, असा सवाल ठाकरे गट आणि काँग्रेसने उपस्थित केला आहे. शिवाय बैठकीतील निर्णय सर्वांना बंधनकारक करणे चुकीचे, असल्याचे ठाकरे गटाचा आरोप आहे. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या शहरातील गणेश मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय.
-
ठाकरे गटाच्या सिनेट सदस्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट
मुंबई | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिनेट सदस्य निवडणूक पदाधिकारी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ येथे आले होते. या प्रसंगी युवासेना सचिव वरुण सरदेसाई , पवन जाधव आदी उपस्थित होते .
-
आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का, निकटवर्तीयाचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरुन चांगल्याच नाट्यमय घडामोडी रंगताना दिसत असतानाच आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे माजी सिनेट सदस्य प्रवीण पाटकर शिंदे गटात प्रवेश करत आहेत. प्रवीण पाटकर हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत.
-
-
Cabinet Decision News : महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द केला. मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्वाचे निर्णय झाले. गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयांत आनंदाचा शिधा देणार आहे. 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी पाड्यापर्यंत मुख्य रस्त्याने जोडण्यात येणार आहे.
-
Jalgaon News : राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचे छापे
जळगाव येथील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने छापा टाकला आहे. समूहाच्या विविध कार्यालयावर पण धाडसत्र सुरु आहे. नाशिक आणि ठाण्यातील कार्यालयावर पण ईडीने छापे टाकले. या कारवाईवर विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे.
-
Mumbai News : मुंबई विद्यापीठाने युवा सेनेचे उमेदवारी अर्ज स्वीकारले
मुंबई विद्यापीठीच्या सिनेट निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. सिनेट निवडणुकीला स्थगिती असताना युवा सेनेने अर्ज दाखल केले. युवा सेनेकडून 10 अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाने पण युवा सेनेचे हे उमेदवारी अर्ज स्वीकारले.
-
CAG Report News : मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये गैरव्यवहार
केंद्र सरकारच्या 7 योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगच्या अहवालात करण्यात आले आहे. आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात करण्यात आला आहे.
-
Entertainment Update | सलग ७ व्या दिवशी सनी देओल यांना पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी, कामाईचा आकडा थक्क करणारा
११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ सिनेमाची चर्चा रंगत आहेत. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने कमाईचा २५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. एवढंच नाही तर, सिनेमा काही दिवसांत ३०० कोटी रुपयांचा गल्ला पार करेल अशी देखील चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे…. वाचा सविस्तर
-
LIVE UPDATE | मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार – भरत गोगावले
आम्हाला घरी बसण्याचं वेड नाही असं म्हणत भरत गोगावले यांनी विरोधकांवर टीका केली आहे. आम्हाला कामाचं वेड, घरी बसण्याचं नाही. मंत्रिमंडळ विस्तार होणार, आता पंचाग बघतो. मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असं देखील भरत गोगावले म्हणाले.
-
LIVE UPDATE | निवडणुका घेण्यासाठी सत्ताधारी घाबरतात – आदित्य ठाकरे
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुका रद्द केल्या. काय असं घडलं त्यामुळे निवडणुका रद्द झाल्या? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तीन महिन्यात मतदारांचं व्हेरिफिकेशन केलं तरीही निवडणुका रद्द झाल्या. विद्यापीठाची बैठक कुठे झाली, बैठकीत झालं. मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका घेण्यासाठी सत्ताधारी घाबरतात… असं वक्तव्य करत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुक स्थगित झाल्या… असं देखील ठाकरे म्हणाले.
-
मनसेच्या आंदोलनानंतर सरकारला जाग येईल – राज ठाकरे
लोक जाब विचारत नाहीत, म्हणून राजकारण्यांचं फावतं. मनसेच्या आंदोलनानंतर सरकारला जाग येईल. लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
-
मतपेटीतून राग दाखवल्याशिवाय खड्डे बुजणार नाहीत – राज ठाकरे
जो पर्यंत मतदार त्यांच्या मनातील राग मतपेटीतून दाखवणार नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजणार नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. ते दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत.
-
दिल्ली विमानतळावर बॉम्बची धमकी
दिल्ली विमानतळावरील दिल्ली – पुणे विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. व्हिस्तारा कंपनीच्या विमानात धमकी मिळाली असून विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यात जल्लोषात स्वागत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले असून त्यांचं पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.
-
सिनेट निवडणूक स्थगित करणं ही हुकूमशाही
सिनेट निवडणूक स्थगित करणं ही हुकूमशाही आहे, मुंबई विद्यापीठावर नेमका कुणाचा दबाव आहे, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. अमोल मातेले यांनी उपस्थित केला आहे.
7 दिवसांत निवडणुका जाहीर करा, अन्यथा कुलगुरूंना घेराव घालणार, असा इशाराही त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाला दिला आहे.
-
लवकरच होणार राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार – चंद्रशेखर बावनकुळे
हिवाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रीमंडळ विस्तार होणार, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नागपूरच्या अधिवेशनाआधी विस्तार करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
-
Maharashtra News : हळदीत घसरण थांबली
वाशिम जिल्ह्यात मागील 15 दिवसापासून हळदीच्या दरात सुरू असलेली घसरण शुक्रवारी थांबली. सोमवारी बाजार समितीत हळदीला 14 हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले होते. मात्र आता हळदीचा दर 14 हजार 700 रुपये प्रती क्विंटलपर्यंत झाला आहे.
-
Pune Nashik Accident : बस अपघात, १० जखमी
पुणे, नाशिक महामार्गावर शिवशाही बसला अपघात झाला. नारायणगाव बाह्यवळणावर दुचाकीस्वाराला वाचविताना बस रस्ता दुभाजकावरून विरुध्द दिशेला गेली. दुभाजकला धडक बसल्याने शिवशाही बसचे दरवाजे लॉक झाले. या अपघातात दहा जण जखमी झाले.
-
NCP : आयोग नोटीस बजावणार
निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटीस बजावली जाणार आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाला म्हणणे सादर करण्यासंदर्भात ही नोटीस असणार आहे.
-
Sanjay Raut : मविआ जागा वाटपाचे सूत्र ठरले- संजय राऊत
महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन काहीच मतभेद नाही. जो जिंकेल ती जागा त्यांची असणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
Sanjay Raut : मनपा निवडणूक घेतल्या जात नाहीत- संजय राऊत
राज्य सरकार निवडणुकीपासून पळ काढत आहे. राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेत नाही. पराभवाच्या भीतीमुळे कोणत्याही निवडणुका सरकार घेत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
Sanjay Raut : सिनेट निवडणूक का केली रद्द- संजय राऊत
राज्य सरकारने भीतीमुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक रद्द केली असल्याचा आरोपी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
-
Nanded news : फळ विक्रेत्याने भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणांचे दोन्ही हात छाटले
नांदेडमध्ये केवळ हसल्याच्या कारणावरून एका फळ विक्रेत्याने भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणांचे दोन्ही हात छाटले आहेत. मनगटापासून दोन्ही हाथ गमावलेल्या जखमीचं नाव अझहर मोहम्मद असे नाव आहे.
-
NCP : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आठ सप्टेंबरनंतर नोटीस बजावली जाणार
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आठ सप्टेंबरनंतर नोटीस बजावली जाणार आहे. निवडणुक आयोगाने सांगितलं आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी पक्षावर दावा केला आहे.
-
Ajit pawar : सोलापूरातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट
सोलापूरातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी सोलापूर दौरा केला होता. त्याचबरोबर शहरात भरपूर विकास कामे होऊन शहराचा कायापालट व्हावा यासाठी घेतली भेट आहे. तसेच आगामी महानगरपालिका, झेडपी, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.
-
pune news : ससून रुग्णालयात लठ्ठपणावर उपचार होणार
पुण्यातील ससून रुग्णालयात लठ्ठपणावर उपचार करणाऱ्या बेरीया ट्रिक सर्जरी वार्ड सुरू करण्यात आला आहे. एकूण 10 बेड या वार्डमध्ये असणार आहेत. 100 ते 160 किलो वजनाच्या व्यक्तींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील एकमेव शासकीय रुग्णालय तिथं आहे. लठ्ठपणावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
-
NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? कधी सुरु होणार सुनावणी?
8 सप्टेंबरपर्यंत अजित पवार आणि शरद पवार गटानं कागदपत्रांसह , लिखीत उत्तर एकमेकांना द्या. दोन्ही गटाचे उत्तर एकत्रित 8 सप्टेंबरपर्यंत दाखल करा. 8 सप्टेंबरनंतर केंद्रीय निवडणूक आयोग तक्रार दाखल करून घेणार. 8 सप्टेंबरनंतर केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटाला नोटीस जारी करणार. त्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता. सूत्रांनी माहिती दिली आहे.
-
Rahul Gandhi | राहुल गांधी यांचा पत्ता पुन्हा बदलणार
खासदार राहुल गांधी यांचा पत्ता पुन्हा बदलणार. बारा तुघलक लेनऐवजी सात सफदरजंग लेन हा राहुल गांधी यांचा नवीन पत्ता आहे. राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांच्यासह घराची पाहणी केली. आठ दिवसात लोकसभा सचिवालयाला निर्णय कळवावा लागणार.
-
Belgaon News | बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव
बेळगाव जिल्ह्याचे लवकरच विभाजन करणार. कर्नाटक सरकार बेळगाव जिल्ह्याचे तीन जिल्ह्यात विभाजन करण्याच्या तयारीत आहे. बेळगाव, गोकाक आणि चिकोडी असे तीन जिल्हे करण्याचा प्रस्ताव आहे. बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी माहिती दिली.
-
Mushaal malik | मुशाल मलिक पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री
मुशाल मलिकचा नवरा भारतीय तुरुंगात बंद आहे. जम्मू-काश्मीरमधील फुटीरतवादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणात यासीन मलिक अटकेत आहे. वाचा सविस्तर….
-
MNS : ठाणे, पालघरमधील लोकसभेच्या चारही जागा लढणार; मनसेची मोठी घोषणा
ठाणे आणि पालघरमधील लोकसभेच्या चारही जागा लढणार असल्याची घोषणा मनसेने केली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ही घोषणा केली आहे. या चारही लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यात आला असून आम्ही तुल्यबळ उमेदवार देणार असल्याचंही अविनाश जाधव यांनी सांगितलं.
-
uddhav thackeray : उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, मातोश्रीवर लोकसभा निवडणुकांचा आढावा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मातोश्री निवासस्थानी लोकसभा निवडणुकांचा आढावा घेण्यात येत आहे. आढावा बैठकीचा आज तिसरा दिवस आहे. आज बारामती, मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.
-
MNS : मनसेने हॅन इन्फ्रास्ट्रक्चरचं कार्यालय फोडलं, राजापूरनंतर मनसे कार्यकर्ते रत्नागिरीतही आक्रमक
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी रत्नागिरी पाली खानूतील महामार्गावरील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफिस फोडलं. राजापूरनंतर मनसे कार्यकर्ते रत्नागिरीतही आक्रमक झाले आहेत.
-
mumbai university : हे तर घाबरटपणाचे लक्षण; वरुण सरदेसाई यांची सिनेट निवडणुकीवरून घणाघाती टीका
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे, अशी टीका युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे.
Published On - Aug 18,2023 7:20 AM