“हिंदी महासागरावर दादागिरी खपवून घेणार नाही”; क्वाड देशांच्या बैठकीत हा इशारा नेमका कुणासाठी?
चीनकडून आपल्या नौदलामार्फत दादागिरी करण्याचाही त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे चीनने कुरापत्या करु नये असा थेट संदेशही यावेळी देण्यात आला आहे.
हिरोशिमा : जपानमधील हिरोशिमामध्ये शनिवारी क्वाड देशांची बैठक पार पडली. या गटामध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांचा समावेश आहे. या बैठकीत इंडो-पॅसिफिक (हिंद महासागर) क्षेत्रामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी संकल् आणि प्रयत्नही करण्यात आला आहे. तर त्याच वेळी या परिस्थितीमध्ये बदल करण्याची मागणी करणाऱ्या तसेच एकतर्फी कारवाईलाही विरोध करण्यात आला. या चार देशांच्या देशांच्या नेत्यांनी चीनवर जोरदार टीका केली आहे. कारण चीनकडून आपल्या वेगळ्या भूमिकेमुळे इतर देशांसाठी त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृत्यांपासून दूर राहण्याचे संकेत दिले असून वास्तविक, चीनकडून हिंदी महासागरात सातत्याने कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले आहेत.
भारताचा हिंदी महासागरावर नेहमीच प्रभाव राहिला आहे. त्यामुळेच चीनकडून होणाऱ्या कारवायांवर त्यांची बारीक नजर आहे.
चीनकडून आपल्या नौदलामार्फत दादागिरी करण्याचाही त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे चीनने कुरापत्या करु नये असा थेट संदेशही यावेळी देण्यात आला आहे.
हिंदी महासागरावरून उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून चीनला थेट इशाराच देण्यात आला आहे. इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी ते पूर्णपणे वचनबद्ध असल्याचेही क्वाड देशांनी संयुक्त असे निवेदन जारी केले.
तसेच त्यामध्ये सांगण्यात आले आहे की,हिंदी महासागरात, आम्ही अस्थिरता किंवा एकतर्फी कारवायांना तीव्र विरोध करतो आहे. ज्यामध्ये परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न केले जातात.
त्या क्वाड परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याच्या सुचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत. आम्ही सैन्यीकरण, तटरक्षक दल आणि सागरी मिलिशिया जहाजांचा धोकादायक वापर यावरही यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणावरही क्वाड देशांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत झालेल्या अनेक ठरावांचे त्यांच्याकडून उल्लंघन केले जात आहे.
त्यांच्याकडून सतत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली जात असल्याने त्यांचाही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रक्षेपणांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरतेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचेही मत या परिषदेत व्यक्त करण्यात आले आहे.
क्वाडने उत्तर कोरियाला UNSCR अंतर्गत आपल्या सर्व जबाबदाऱ्यांचे पालन करण्याचे आणि चिथावणी देण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.