‘मेरी जान को खतरा, बचा लो’, कधी काळी अमेरिकेवरही केली होती चिखलफेक, आता इम्रानची भीक…
पल्या जीवाला धोका असल्याचे सांगत इम्रान खान यांनी अमेरिकन खासदाराला सांगितले आहे की पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्करही शक्तिशाली आहेत.
नवी दिल्ली : ‘माझे सरकार पाडणाऱ्या परकीय षड्यंत्रामागे अमेरिकेचा हात होता. हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे लेखी पुरावे असल्याची टीका मागील वर्षीच्या मे महिन्यात एका रॅलीला संबोधित करताना इम्रान यांच्याकडून अमेरिकेवर असे जाहिर आरोप करण्यात आले होते. ज्यावेळी ते अमेरिकेवर आरोप करत होते, त्यावेळी त्यांच्या सरकार सत्तेच्या बाहेर येऊन एकच महिना झाला होता. मात्र आता सध्या परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे अमेरिकेवर चिखलफेक करणाऱ्या इम्रान खान यांच्याकडून आता अमेरिकेकडे मदतीसाठी याचना केली जात आहे.
कधी काळी अमेरिकेवर आगपाखड करणाऱ्या इम्रान खान यांचा आता वेगळाच एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. या ऑडिओमध्ये इम्रान खान यांनी अमेरिकन खासदार मॅक्सियन मूर वॉटर्स यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.
पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचा फटका बसलेल्या इम्रान अमेरिकेला आपल्या बाजूने उभे राहण्याची विनंती करत आहे.
त्या ऑडिओमध्ये अक्षरशः इम्रान खान मदतीची भीक मागताना आणि अमेरिककडे मदतीची याचना करताना ऐकू येते आहे.
Breaking News :
Leak audio of Imran Khan with American congresswomen Maxian Moore Water pic.twitter.com/4CFSUsnHij
— Malik Ali Raza (@MalikAliiRaza) May 20, 2023
अमेरिकेकडून मला मदत करण्यात यावाी असंही ते वारंवार सांगत आहेत. सोशल मीडियावर जो ऑडिओ व्हायरल झाला आहे तो झूम मीटिंगचा असल्याचेही सांगण्यात येत आहे.
इम्रान खान यांच्याकडून त्या ऑडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, सध्या आपल्या देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सध्या पाकिस्तानची वाटचाल देशाच्या इतिहासातील सगळ्यात गंभीर अशा काळातून चालू आहे.
अमेरिकेने आवाज उठवावा
माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी मला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला आहे. तसेच राजकीय षडयंत्राखाली आपले सरकार पाडण्यात आले असंही ते सांगत आहेत.
अमेरिकेने आमच्यासाठी आवाज उठवला पाहिजे असंही त्यांच्याकडून त्या ऑडिओमध्ये सांगितले जात आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या मानवी हक्क आणि लोकशाही मूल्यांबाबत आवाज उठवला पाहिजे असंही ते अमेरिकन खासदारांबरोबर बोलताना सांगत आहेत.
शक्तीशाली अमेरिका
जो व्हायरल झालेला ऑडिओ आहे, त्यामध्ये इम्रान पाकिस्तानमधील लष्कर खूप शक्तिशाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र आमच्या काळात आमचे सरकार सर्वोत्तम आर्थिक कामगिरी करत होते, पण तरीही ते पाडण्याचे कारस्थान रचले गेले आहे.
देशात लोकशाहीची हत्या
कोणत्याही लोकशाही देशात सरकार पाडण्याचे असे कृत्य केले जात नाही. त्यामुळे मला पाकिस्तानमध्ये कायद्याचे राज्य हवे आहे. या सगळ्या कारणासाठीच माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी आवाज उठवावा, कारण तुम्ही जर आवाज उठवला असाल तर नक्कीच ते ऐकले जाईल असंही त्यांनी सांगितले.
इम्नान खान यांच्या जीवाला धोका
आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत इम्रान खान यांनी अमेरिकन खासदाराला सांगितले आहे की पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्करही शक्तिशाली आहेत.
जनरल बाजवा यांनी माझे सरकार पाडले होते, त्यामुळे आता पाकिस्तान सरकार आणि लष्करामुळे माझ्या जीवाला धोका असल्यामुळेच तुम्ही मला मदत करावी अशी माझी इच्छा आहे असून या सगळ्या घटनांचा परिणाम पाकिस्तानवर होणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.