Tanushree Dutta | गंगास्नान केल्यामुळे तनुश्री दत्ता ट्रोल; टीकाकारांना अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर
'तनु, मणिकर्णिका घाटजवळ मृतदेह आढळतात. तू तिथे गंगास्नान का केलंस? गंगा ही सर्वांत प्रदूषित नदी आहे. तू असं नाही करायला पाहिजे', असाही सल्ला एका नेटकऱ्याने तनुश्रीला दिला. या सर्व कमेंट्सवर आता तनुश्रीने उत्तर दिलं आहे.
वाराणसी | 7 ऑगस्ट 2023 : ‘मी टू मोहिमे’दरम्यान दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या वाराणसीमध्ये अध्यात्मिक यात्रा करत आहे. वाराणसीतल्या अनेक पवित्र स्थानांना ती भेट देतेय. त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर सतत शेअर करतेय. हिंदू धर्मात काशीमधल्या गंगास्नानचं वेगळंच महत्त्व आहे. तनुश्रीनेही गंगास्नान केलं आणि त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. तिने हा व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं. या ट्रोलर्सना तनुश्रीने तिच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे.
गंगास्नान केल्यामुळे तनुश्री दत्ता ट्रोल
तनुश्रीने मणिकर्णिका घाटजवळील गंगेत डुबकी मारली. त्याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. ‘वाराणसीमधील काशी विश्वनाथ इथल्या मणिकर्णिका घाटजवळ गंगास्नान करण्याचा चमत्कारिक अनुभव घेतला’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, ‘आता त्वचेसंबंधी समस्यांसाठी तयार राहा’. तर ‘भारतात अंधविश्वास सर्वाधिक आहे. सुशिक्षित असूनही गंगास्नान केल्याने पाप नष्ट होतात, अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
‘तनु, मणिकर्णिका घाटजवळ मृतदेह आढळतात. तू तिथे गंगास्नान का केलंस? गंगा ही सर्वांत प्रदूषित नदी आहे. तू असं नाही करायला पाहिजे’, असाही सल्ला एका नेटकऱ्याने तनुश्रीला दिला. या सर्व कमेंट्सवर आता तनुश्रीने उत्तर दिलं आहे. ‘अरे देवा, मला हे सर्व माहितच नव्हतं. डुबकी तर झाली, आता जे व्हायचं ते होईल. मला असं वाटतं की मी ठीक होईन. मला काहीच होणार नाही’, अशी कमेंट तिने एका युजरला टॅग करत लिहिली.
तनुश्री 2020 मध्ये ‘मी टू’ मोहिमेमुळे चर्चेत आली होती. तिने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. तिच्या या आरोपांमुळे इंडस्ट्रीत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. ही MeToo मोहीम त्यावेळी चांगलीच चर्चेत होती. कारण या मोहिमेची सुरुवात भारतात तनुश्रीच्या आरोपांनी झाली.