Gadar 2 | सनी देओलच्या ‘गदर 2’चा बंपर धमाका; 6 दिवस बाकी असताना विकली गेली तब्बल इतकी तिकिटं

2001 मध्ये 'गदर : एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानच्या 'लगान' चित्रपटाशी त्याची टक्कर झाली होती. विशेष म्हणजे या शर्यतीत 'गदर 2'ने बाजी मारली होती. आता 22 वर्षांनंतरही 'गदर 2' या सीक्वेलची क्रेझ जास्त आहे.

Gadar 2 | सनी देओलच्या 'गदर 2'चा बंपर धमाका; 6 दिवस बाकी असताना विकली गेली तब्बल इतकी तिकिटं
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 2:24 PM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहते. गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर ‘बार्बी’ आणि ‘ओपनहायमर’ या दोन मोठ्या हॉलिवूड चित्रपटांची टक्कर पहायला मिळाली. त्यानंतर आता येत्या 11 ऑगस्ट रोजी बॉलिवूडच्या दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ या चित्रपटासोबतच अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा बहुचर्चित चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही चित्रपटांसाठी ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत या चित्रपटांच्या ॲडव्हान्स तिकिटांची बुकिंग दमदार झाली आहे. मात्र अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ या चित्रपटाला धमाकेदार ओपनिंग मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थिएटरमध्ये ‘गदर 2’ या चित्रपटाबाबत 22 वर्षांपूर्वी झालेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. 2001 मध्ये ‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाशी त्याची टक्कर झाली होती. विशेष म्हणजे या शर्यतीत ‘गदर 2’ने बाजी मारली होती. आता 22 वर्षांनंतरही ‘गदर 2’ या सीक्वेलची क्रेझ जास्त आहे.

बॉक्स ऑफिसच्या गणिताचा हिशोब करणारी वेबसाइट sacnilk ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी ‘गदर 2’ या चित्रपटाची तब्बल 90 हजार 885 तिकिटं विकली गेली. शुक्रवारी रात्रीपर्यंत हा आकडा एक लाखापर्यंत पोहोचला. या आकड्यानुसार चित्रपटाने शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत 2.42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात तिकिट बुकिंग होण्याची शक्यता आहे. ओपनिंगपर्यंत ही बुकिंग जवळपास 10 कोटी रुपयांपर्यंत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ या चित्रपटाची 12 हजार तिकिटं विकली गेली आहेत.

हे सुद्धा वाचा

सनी देओलच्या या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता पाहता पहिल्याच दिवशी चित्रपटाची बंपर कमाई होऊ शकते, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा 30 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही अनिल शर्मा यांनीच केलंय. विशेष म्हणजे जवळपास 20 वर्षांनंतर प्रदर्शित होणाऱ्या या सीक्वेलमधील बरेच कलाकार हे पहिल्या भागातील आहेत.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.