Genelia D’souza Birthday | नॅशनल लेव्हलची फूटबॉल प्लेअर अशी बनली अभिनेत्री, जेनेलियाबद्दलच्या या गोष्टी माहीत आहेत का ?

जेनेलिया डिसूजा ही एक नॅशनल लेव्हल फूटबॉलपटू आहे. मग ते सोडून ती अभिनयाकडे कशी वळली ?

Genelia D'souza Birthday | नॅशनल लेव्हलची फूटबॉल प्लेअर अशी बनली अभिनेत्री, जेनेलियाबद्दलच्या या गोष्टी माहीत आहेत का ?
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 3:28 PM

Happy Birthday Genelia D’souza | अभिनेत्री जेनेलिया डिसूजा (Genelia D’souza) हिचा आज, (5 ऑगस्ट ) 36 वा वाढदिवस आहे. सध्या ती अभिनेता मानव कौल याच्यासोबतच्या Trial Period या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जेनेलिया वयाच्या 15 व्या वर्षापासून अभिनय करत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? तिने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर साऊथमध्येही काम केलं आहे. पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की ही बबली गर्ल, अभिनेत्री नॅशनल लेव्हलची फूटबॉल प्लेयरही (football player) होती.

जेनिलिया आणि रितेश देशमुख हे जोडपं सर्वांनाच खूप आवडतं. ते एक लोकप्रिय कपल आहेत. पण जेनेलिया पहिल्यांदा जेव्हा रितेशला भेटली होती, तेव्हा तिला तो बिलकूल आवडला नव्हता. वाचून आश्चर्य वाटलं ना ? पण हे खरं आहे. जेनेलियाबद्दल अशीच काही रंजक माहिती वाचूया.

कशी बनली अभिनेत्री ?

जेनेलियाचा जन्म 5 ऑगस्ट 1987 साली मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला. तिला लहानपणापासूनच खेळाची आवड होती आणि शाळेत असताना ती नॅशनल लेव्हलची फूटबॉलपटू होती. मात्र त्यानंतर तिला चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली आणि ती या क्षेत्रात आली.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

अशी झाली रितेश-जेनेलियाची भेट

जेनेलिया आणि रितेश गेल्या १८ वर्षांपासून एकमेकांसोबत आहे. त्या दोघांना दोन मुलंही आहेत. २००३ साली आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होते. रितेशने या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

चित्रपटाच्या शूटिंगसाठी पहिल्यांदा भेट झाली तेव्हा रितेश जेनेलियाच्या प्रेमात पडला होता. पण जेनेलियाच्या बाबतीत नेमकं उलटं झालं. तिला तेव्हा तो बिलकूल आवडला नाही. पण एकत्र काम करताना एकमेकांचे स्वभाव कळले, जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. नऊ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रितेश-जेनेलिया लग्नबंधनात अडकले.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.