ICSE, ISC दहावी बारावीचा निकाल लवकरच, cisce.org रिझल्टची डायरेक्ट लिंक, असा करा चेक
ICSE इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट - cisce.org - वर पाहू शकतील. साधारणपणे ISC आणि ICSE निकाल CBSE दहावीच्या बारावीच्या निकालाप्रमाणेच जाहीर केला जातो. CBSE ने 12 मे 2023 रोजी बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर केला होता
नवी दिल्ली: कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ICSE,ISC इयत्ता 10 वीचा निकाल आज जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, बोर्डाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. ICSE इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – cisce.org – वर पाहू शकतील. साधारणपणे ISC आणि ICSE निकाल CBSE दहावीच्या बारावीच्या निकालाप्रमाणेच जाहीर केला जातो. CBSE ने 12 मे 2023 रोजी बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर केला होता, त्यामुळे ICSE आणि ISC निकाल कधीही लागण्याची शक्यता आहे. CISCE ने अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस जारी केलेली नाही.
ICSE बोर्ड निकाल 2023: निकाल कुठे पहावा
- ICSE निकाल 2023 CISCE ने जाहीर केल्यानंतर विद्यार्थी cisce.org अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतील.
- ICSE बारावीचा निकाल अधिकृत निकाल वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल, cisceresult.in.
ICSE बोर्डाचा दहावीचा निकाल
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – cisce.org
- होमपेजवर ICSE इयत्ता 10 वी निकाल 2023 च्या लिंकवर क्लिक करा
- एक नवीन पेज उघडेल, आपला युनिक आयडी आणि इतर तपशील प्रविष्ट करा
- आपला ICSE इयत्ता 10 वी निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल
- डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.