लग्नाच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला! लग्नाला चाललेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार

Belgaon Road Accident : मृतांमध्ये मुलीचा भाऊ, काका, काकू आणि आजीचा समावेश आहे.

लग्नाच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला! लग्नाला चाललेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 2:31 PM

बेळगाव : लग्नाला आलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात (Karnataka Accident) झाला आहे. तवंदी घाटातील अपघातात चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये मुलीचा भाऊ, काका, काकू आणि आजीचा समावेश आहे. बेळगाव कडून निपाणीच्या (Belgaon Nipani) दिशेने येणाऱ्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. मृत आणि जखमी सर्वजण निपाणी तालुक्यातील बोरगाववाडी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नस्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असताना कुटुबीयांच्या कारचा भीषण अपघात झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे. पुणे-ंबंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bengaluru Highway) तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर हा अपघात झाला. एका वळणावर भरधाव कंटेनरचे कारचा चिरडलं आणि त्यात जबर मार लागून चौघांचा मृत्यू झाला. कारमधील सर्वजण लग्नासाठी जायला निघाले होते. मात्र लग्नाच्या पोहोचण्याआधीच चौघांवर काळानं घाला घातल्यानं दुःख व्यक्त केलं जातंय. 55 वर्षांच्या छाया आदगोंडा पाटील, 55 वर्षांचे आदगोंडा बाबू पाटील, 23 वर्षांचा महेश देवगोंडा पाटील आणि 80 वर्षांच्या चंपाताई मगदूम पाटील अशा चौघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

नवरीच्या भावासह चुलते, चुलते आणि आजीचा मृत्यू झाल्यानं लग्नकार्य असलेल्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

अपघातातील मृतांची नावं :

छाया आदगोंडा पाटील, वय 55 आदगोंडा बाबू पाटील, वय 55 महेश देवगोंडा पाटील, वय 23 चंपाताई मगदूम पाटील, वय 80

हे सुद्धा वाचा

वाहनांचा चक्काचूर!

स्तवनिधी नाव्याच्य हॉलवर लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. लग्नकार्यासाठी पाटील कुटुंबीय निघाले होते. हे सर्वजण बोरगावाडी या निपाणी तालुक्यात राहायला होते. मात्र हॉटेल अमर जवळ कंटेनर-कारची जोरदार धडक झाली आणि कारमधील चौघांना गंभीर जखमा होऊन जागीच जीव गेला. कंटेनरच्या धडकेत झालेल्या या अपघातानंतर कारमधील प्रवाशांचे मृतदेह गाडीतच अडकून पडले होते. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केलंय.

सोलापुरात भीषण अपघात : पाहा VIDEO

धारवाडमध्येही सहा दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये सहा सात जणांचा मृत्यू झाला होता. लग्नकार्य उरकून परतत असलेली भरधाव क्रूझर झाडाला आदळून हा अपघात झाला होता. 21 मे रोजीच्या या अपघातानंतर आता आणखी एका अपघातानं काळजाचा ठोका चुकवलाय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.