Police Recruitment: पोलीस भरतीसंदर्भात मोठी बातमी! गृहमंत्र्यांकडून ‘तारीख’ जाहीर, पोरं खुश

पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी देणारी ही भरती असणार आहे. विविध कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती ही झाली नव्हती. त्यामुळे अनेकांना या संधीची प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

Police Recruitment: पोलीस भरतीसंदर्भात मोठी बातमी! गृहमंत्र्यांकडून 'तारीख' जाहीर, पोरं खुश
गृहमंत्र्यांकडून ‘तारीख’ जाहीर, पोरं खुश Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 2:04 PM

मुंबई : राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची पोलीस भरती (Police Recruitment) निघणार अशी बातमी होती. राज्यातील अनेक तरुण तरुणी पोलीस भरतीची वाट पाहतायत. भरती जाहीर तर होतीये, पदं देखील रिक्त आहेत परंतु राज्य सरकारकडून तारखा मात्र जाहीर (Dates For The Recruitment Process) करण्यात येत नव्हत्या. कधीपासून भरती प्रक्रिया राबविली जाणार याबाबत कुणालाच कल्पना नव्हती आणि वाट बघून देखील उमेदवार वैतागले होते. परंतु आता या सगळ्याला गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटलांनी पूर्णविराम लावलाय. जूनच्या 15 तारखेपासून पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. इतकंच काय तर यानंतर सुद्धा राज्य मंत्रिमंडळासमोर 15 हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे असंही वळसे पाटील म्हणालेत. पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

राज्यात 50,000 पोलीस पदे रिक्त

राज्यात 50,000 पोलीस पदे रिक्त आहेत. साडेपाच हजार उमेदवारांची भरती पूर्ण झालीये.सात हजार पदांची भरती काढली गेलीये, 15 हजार पदे अधिक भरण्यासाठी प्रस्ताव देण्यात आलाय आणि भरती प्रक्रिया 15 जून पासून सुरु करण्यात येणार आहे. गृह विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग आखेर मोकळा झाल्याने युवकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. तसेच पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी देणारी ही भरती असणार आहे. विविध कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती ही झाली नव्हती. त्यामुळे अनेकांना या संधीची प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

हे सुद्धा वाचा

बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा

गेल्या दोन वर्षा कोरोनामुळे भरती प्रक्रिया ही मंदावली होती. कोरोनाचा कहर वाढल्याने अनेकदा पोलीस भरतीच्या तारखा पुढेही ढकलण्यात आल्या होत्या. तसेच कोरोनात अनेक कंपन्या बंद पडल्या. अनेक उद्योगधंदे देशोधडीला लागल्याने अनेक तरुणांवर बेरोजगारीची वेळ आलीय. हाताला काम नसणाऱ्या तरुणांची सख्या राज्यात सध्या मोठी आहे. त्यामुळे अनेकांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली होती. त्या तरुणांना आता ही बातमी सुखावणारी आहे. त्यांचे भरती होण्याच स्वप्न सत्यात उतरण्यास या भरतीने मोठी मदत होणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.