IAS Officer: वडिलांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी पैसे नव्हते इतकी गरिबी, आईसोबत बांगड्या देखील विकल्या! असा बनला अधिकारी

UPSC CSE परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार नागरी सेवा परीक्षेत भाग घेतात, परंतु त्यापैकी मोजकेच आपले स्वप्न पूर्ण करतात. आज आपण अशाच एका IAS अधिकारी रमेश घोलप यांची कहाणी सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या अडचणी मागे टाकून मेहनत घेतली आणि यश मिळवले. तुमचा हेतू प्रबळ असेल तर जगातील कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही.

IAS Officer: वडिलांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी पैसे नव्हते इतकी गरिबी, आईसोबत बांगड्या देखील विकल्या! असा बनला अधिकारी
IAS Ramesh gholap with his mother upsc exam
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 11:05 AM

मुंबई: UPSC परीक्षेत यश मिळवणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्या गोष्टी ऐकल्या तर एकसे बढकर एक असतात. कुठल्याही गोष्टीत यश मिळवणारे लोकं अर्थातच खूप कष्ट करून यश मिळवतात. यातही काहींची परिस्थिती अत्यंत वाईट असते तरीही जिद्द आणि चिकाटीने ही लोकं त्या परिस्थितीवर देखील मात करतात. UPSC CSE परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार नागरी सेवा परीक्षेत भाग घेतात, परंतु त्यापैकी मोजकेच आपले स्वप्न पूर्ण करतात. आज आपण अशाच एका IAS अधिकारी रमेश घोलप यांची कहाणी सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या अडचणी मागे टाकून मेहनत घेतली आणि यश मिळवले. तुमचा हेतू प्रबळ असेल तर जगातील कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही.

लहानपणी पोलिओची लागण झाली

IAS अधिकारी रमेश घोलप हे लहानपणी पोलिओचे बळी ठरले होते. रमेशला लहानपणी डाव्या पायाला पोलिओ झाला होता आणि घरातील आर्थिक अडचणींमुळे तो आई सोबत रस्त्यावर बांगड्या विकायचा. इतक्या अडचणी असून देखील रमेशने आपली स्वप्न सोडली नाहीत आणि अखेर आपले स्वप्न साकार केले.

IAS रमेश घोलप यांचे कुटुंब खूप छोटे होते, त्यांच्या कुटुंबात फक्त 4 लोक होते. रमेशच्या वडिलांचे सायकलचे छोटेसे दुकान होते, वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे हे कुटुंब रस्त्यावर आले. एके दिवशी अतिमद्यपानामुळे वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. अशा तऱ्हेने आता घराचा आणि कुटुंबाचा सगळा भार रमेशच्या आईवर पडला. डाव्या पायाला पोलिओ असूनही रमेश आई आणि भावासोबत बांगड्या विकायचा.

IAS ramesh gholap upsc rank

वडिलांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी भाडे नव्हते

IAS रमेश घोलप यांनी प्राथमिक शिक्षण गावातून पूर्ण केले. यानंतर पुढील शिक्षणासाठी तो बार्शीमध्ये काकांच्या घरी गेला. वडिलांचे निधन झाले तेव्हा रमेश बारावीत शिकत होता. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच रमेशला घरी पोहोचणं खूप गरजेचं होतं. काकांच्या घरापासून त्यांच्या घरापर्यंतचे भाडे फक्त 7 रुपये होते आणि रमेश अपंग होता, त्यामुळे त्याचे भाडे फक्त 2 रुपये होते. पण आर्थिक परिस्थिती अशी होती की, त्यांच्याकडे भाडे भरण्यासाठी 2 रुपयेही नव्हते.

बारावी पूर्ण केल्यानंतर घराच्या जबाबदारीत मदत करण्यासाठी डिप्लोमा केला आणि गावातच शिक्षक म्हणून शिकवायला सुरुवात केली. अध्यापनाबरोबरच त्यांनी बीएची पदवीही पूर्ण केली. यूपीएससीची तयारी करण्यासाठी रमेशने ही ६ महिन्यांची नोकरी सोडून जोरदार तयारी सुरू केली. 2010 मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससी ची परीक्षा दिली पण त्यात त्यांना यश आले नाही. यानंतर त्याच्या आईने गावकऱ्यांकडून काही पैसे उधार घेऊन रमेशला शिक्षणासाठी पुण्याला पाठवले.

पुण्याला गेल्यानंतर रमेशने कोचिंग न घेता यूपीएससीची तयारी सुरू केली. कठोर परिश्रम, समर्पण आणि मेहनतीनंतर अखेर 2012 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. रमेश घोलप 287 पदे मिळवून अपंग कोट्यातून आयएएस अधिकारी झाले

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.