China-India : चीनला भारत दाखवणार आसमान! जागतिक आर्थिक मंचावर रघुराम राजन यांचा सूर काय

China-India : चीनला भारत लवकरच धोबीपछाड देऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे, तज्ज्ञांचे मत काय आहे ते ही समजून घेऊयात.

China-India : चीनला भारत दाखवणार आसमान! जागतिक आर्थिक मंचावर रघुराम राजन यांचा सूर काय
मात केव्हा देणार
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 9:28 AM

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेत भारत-चीन (India-China) कायम स्पर्धक आहेत. या दोन्ही देशात अनेक क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे. स्वस्त उत्पादनात चीन भारताच्या अनेक पटीने पुढे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने आता पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. कोरोनाची चाल उलटल्याने चीनची अवस्था बिकट आहे. त्यामुळे अनेक कंपन्या भारत, मलेशिया, सिंगापूरकडे मोर्चा वळवत आहे. अशातच अनेक तज्ज्ञ भारताकडे आशेने पाहत आहेत. चीनची जागा लवकरच भारत घेईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विश्व आर्थिक मंचावर (World Economic Forum) भारताचा डंका आहे. या मंचावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पूर्व गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी या विषयीवर स्पष्ट मत मांडले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत मंगळवारी रघुराम राजन यांनी त्यांची स्पष्ट मते मांडली. राजन हे स्पष्ट वक्ते म्हणून सर्वपरिचीत आहेत. भारत लागलीच चीनची जागा घेईल, असे सध्यस्थिती म्हणणे घाईगडबडीचे होईल. पण पुढे ही परिस्थिती बदलेल, असे राजन यांनी स्पष्ट केले.

रघुराम राजन यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली. त्याचा चीनला फायदा होईल. जागतिक अर्थव्यवस्थेचा त्यामुळे बदल पहायला मिळतील. तसेच जागतिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. सध्या अजून 12 महिन्यांचा अवकाश आहे. या काळात चीनने सुधारणा केल्या तर चीनची अर्थव्यवस्था चांगली वृद्धी करु शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

चीन सध्या कोविडच्या आणखी एका लाटेचा सामना करत आहे. तरीही चीनच्या अर्थव्यवस्थेत मार्च-एप्रिल दरम्यान आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. उत्पादन क्षेत्रात चीनने पुन्हा झेप घेतली तर जगातील अनेक देशातील वस्तूंच्या किंमतीत पूर्ववत होतील वा स्वस्त होतील, असा राजन यांचा अंदाज आहे.

राजन यांच्या दाव्यानुसार, चीनची अर्थव्यवस्था सुधारली तर जागतिक समुदायाला त्याचा मोठा फायदा होईल. जगातील अनेक देशात महागाई कमी होईल, असे स्पष्ट संकेत रघुराम राजन यांनी दिले. चीनमधील उत्पादनावर परिणाम झाल्यानेच जागतिक महागाईत भर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अशीच परिस्थिती राहिल्यास, भारत चीनची जागा घेईल, अशा शक्यतेवर, त्यांनी मत मांडले. आताच असे म्हणणे हे अपरिपक्वतेचे लक्षण म्हणता येईल. भारत चीनची जागा घेईल, पण त्यासाठी अजून वेळ असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी किती अवधी लागेल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

भारतीय अर्थव्यवस्था अजूनही मोठी नाही. ती छोटी आहे. काही वेळानंतर ज्या वेगाने भारत पुढे जात आहे, त्यावरुन हे चित्र बदलले असे ते म्हणाले. भारत आता जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि भारताची घोडदौड सुरु असल्याचे ते म्हणाले.

राजन यांच्या विधानाला देशातील तज्ज्ञांनी महत्व दिले आहे. त्यांच्या मते, लेबर मार्केटसह आता रिअल इस्टेट, निवासी क्षेत्र याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या क्षेत्रात भारताला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

घरांच्या विक्रीला ब्रेक लागल्याने बाजारात चिंतेचे वातावरण आहे. मालमत्तेचे दर घसरत असले तरी सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्याने या क्षेत्रात निराशेचे वातावरण आहे. रशिया-युक्रेन युद्ध समाप्त झाल्यास त्याचा मोठा अनुकूल परिणाम या क्षेत्रावर होईल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.