Activa 7G : एकदम कम पिता है! एका लिटरमध्ये ही स्कूटर धावणार 100 किमी, एन्जॉय करा होंडाची सफर

Activa 7G : एका लिटरमध्ये, होंडाची सातव्या पिढीतील ही स्कूटर झक्कास परफॉर्मन्स देणार आहे.

Activa 7G : एकदम कम पिता है! एका लिटरमध्ये ही स्कूटर धावणार 100 किमी, एन्जॉय करा होंडाची सफर
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 10:03 PM

नवी दिल्ली : भारतात वाहनप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेली होंडाची अॅक्टिव्हा (Activa 7G) आता पुढच्या पिढीतील दमदार मॉडेल घेऊन येत आहे. हायब्रीड अॅक्टिव्हा (Hybrid Activa) हे आता तिचे नवीन रुपडे असणार आहे. त्यामुळे एका लिटरमध्ये ही स्कूटर तब्बल 100 किमीचे अंतर सहज पार करु शकेल. अॅक्टिव्हा स्कूटर (Activa Scooter) अनेक वर्षांपासून सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने अनेक मॉडेल्स बाजारात उतरविले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत स्कूटर आणण्याची तयारी कंपनीने केली आहे.

मोटारसायकल निर्मातीत अग्रेसर असलेली जपानी कंपनी Honda ने Kinetic सोबत भारतात पहिल्यांदा स्कूटर दाखल केली. Kinetic Honda स्कूटरचे उत्पादन आणि विक्री करण्यात आली. या दोघांनी बाजारात दबदबा निर्माण केला. आता तर हिरो कंपनीने स्वतःचे उत्पादन सुरु केले. कंपनीने विविध मॉडेल्स बाजारात दाखल केले आहे.

होंडाने 1984 मध्ये भारतात वाहन उत्पादन करण्यासाठी कायनेटिकसोबत भागीदारी केली. या दोन्ही कंपन्यांनी एकत्रित येत गिअरची स्कूटर बाजारात दाखल केली. बाजाराचा मोठा अनुभव कंपनीच्या पाठिशी होता. त्याआधारे कंपनीने भारतात मोठी प्रगती साधली.

हे सुद्धा वाचा

2000 मध्ये बाजारात पदार्पण केल्यापासून Activa ही भारतातील चौथी सर्वात यशस्वी स्कूटर आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्ससह अॅक्टिव्हाने बाजारात दमदार प्रवेश केला. आता या कंपनीची पुढच्या पिढीतील स्कूटर बाजारात येत आहे. ही हायब्रीड स्कूटर आहे. यामध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक असा दोन्हीचा वापर होणार आहे.

नवीन Activa 7G 100 किलोमीटरचे मायलेज देईल, असा दावा करण्यात येत आहे. अनेकांसाठी हा सूखद धक्का आहे, तर काहींसाठी हे आश्चर्य आहे. या स्कूटरने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या स्कूटरने बाजारात इतर वाहन उत्पादकांचेही लक्ष वेधले आहे.

Honda Motors ने नवीन Activa 7G लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. Activa 7G स्कूटर एका लिटरमध्ये 100 किमी धावेल, असा दावा करण्यात येत आहे. एका लिटरमध्ये स्कूटर एवढी धावेल का, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. पण कंपनीने हा दावा केला आहे. पण Activa 7G मध्ये वापरलेले तंत्रज्ञान पाहता हे शक्य आहे.

अहवालानुसार, यापूर्वीच हायब्रीड तंत्रज्ञानात इंजिन बनवणाऱ्या आणि वापरणाऱ्या होंडाने मात्र ही गोष्ट लिलया केली आहे. Activa 7G साठी होंडाने Enhanced Smart Power नावाचे नवीन तंत्रज्ञान वापरले आहे.म्हणजेच नवीन Activa 7G वेगळ्या बॅटरीसह इलेक्ट्रिक मोटरचाही सपोर्ट मिळणार आहे.

स्कूटर चालू असताना यातील बॅटरी आपोआप चार्ज होईल. स्कूटर सुरु करताना इलेक्ट्रिक मोटारचा वापर करता येतो. दहा ते पंधरा किलोमीटरचा पल्ला तुम्ही या आधारे गाठू शकता. पुढे 40 किलोमीटरपर्यंतचा प्रवासही तुम्ही बॅटरीआधारे करु शकता.

त्यापुढे तुम्हाला पेट्रोल इंजिनची मदत होईल. 40 किलोमीटरच्या पुढे तुम्हाला पेट्रोल इंजिनची मदत घेता येईल. हे इंजिन तुम्हाला लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरता येईल. एका लिटरमध्ये या स्कूटरवर तुम्हाला 100 किमीचे अंतर पार करता येईल. 23 जानेवारी रोजी ही स्कूटर बाजारात दाखल करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.