Retail Shop : रिलायन्सला जबरदस्त टक्कर! छोट्या शहरात या कंपनीचा ‘बिग बाजार’, असा आहे खास प्लॅन

Retail Shop : रिलायन्सला टक्कर फाईट देण्यासाठी बाजारात अजून एक ब्रँड उतरला आहे. ग्राहकांना काय होईल फायदा..

Retail Shop : रिलायन्सला जबरदस्त टक्कर! छोट्या शहरात या कंपनीचा 'बिग बाजार', असा आहे खास प्लॅन
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 10:58 PM

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांचा रिलायन्स रिटेल समूह (Reliance Retail) किरकोळ किराणा सामान आणि दैनंदिन वस्तूंच्या विक्रीत उतरला आहे. आता गल्ली-बोळात रिलायन्स स्टोअर (Reliance Store) सुरु करण्यासाठी कंपनीने कंबर कसली आहे. रिटेल बाजारात टाटा समूहासह इतर अनेक ग्रुप उतरले आहेत. फूड आणि ग्रोसरीमध्ये सध्या जोरदार कामगिरी करणारी कंपनीही रिलायन्स समूहाला टक्कर देण्यासाठी नियोजन करत आहे. ही कंपनी गल्लीबोळात व्हॅल्यू स्टोअर (Value Store) उघडणार आहेत. या स्टोअरमध्ये ग्राहकांना स्वस्तात सामान मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

आरपी-संजीव गोयनका या समूहाची कंपनी स्पेन्सर रिटेल ( Spencer’s Retail) आता नवीन पद्धतीचे हायपरमार्केट सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनी छोट्या शहरात स्पेन्सर व्हॅल्यू मार्केट (Spencer’s Value Market) स्टोअर उघडणार आहे.

आरपी-संजीव गोयनका ग्रुपचे हेड ऑफ रिटेल अँड एफएमसीजी, शाश्वत गोयनका यांनी या विस्ताराची माहिती दिली. हे स्टोअर खास करुन टियर-2 शहरात सुरु करण्यात येणार आहेत. या स्टोअरमध्ये ग्राहकांना स्वस्तात सामान मिळेल. विशेष म्हणजे कमी किंमतीत वस्तू मिळण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.

हे सुद्धा वाचा

स्पेन्सर व्हॅल्यू मार्केटमध्ये व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट्स यांची रेलचेल असणार आहे. ज्यामुळे या स्टोअरमध्ये ग्राहकांना मोठा फायदा होईल. या स्टोअरमध्ये स्पेन्सरपेक्षा इतर खासगी ब्रँडच्या उत्पादनांची संख्या अधिक असेल. यामध्येही स्वस्त वस्तू ठेवण्यात येणार आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सध्या स्पेन्सर 10 स्टोअरचे रुपांतर या नवीन फॉरमॅटनुसार रुपांतरीत करणार आहे. तर नवीन आर्थिक वर्षात कंपनी अधिकहून अधिक स्टोअर या फॉरमॅटमध्ये सुरु करणार आहे. गोयनका यांच्या अंदाजनुसार, येत्या पाच वर्षांत भारतभर हे स्टोअर सुरु होतील. यामध्ये स्पेन्सरचा अर्धा हिस्सा असेल. पुढील 12 ते 18 महिन्यात स्टोअर फायदा कमावतील.

ईटीच्या वृत्तानुसार, कंपनी त्यांचे Nature’s Basket या ब्रँडची उत्पादनेही या स्टोअरमध्ये प्रामुख्याने असतील. तसेच स्पेन्सर नावाने ही इतर उत्पादने असतील. या स्टोअरमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असेल.

रिलायन्स रिटेलने बाजारात दबदबा तयार करण्यासाठी बिग बाजार स्टोअर्सच्या जागी स्मार्ट बाजार सुरु केले आहेत. तर गल्लीबोळात स्थानिक किराणा दुकानदाराशी त्यांनी भागीदारीत Jio Store सुरु केले आहेत. छोट्या शहरात KB’s Fair Price Store सुरु केले आहेत. या समूहाला आता स्पेन्सरचे तगडे आव्हान मिळेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.