Property transfer : घर खरेदी करताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या मालमत्ता हस्तांतरणाचे विविध प्रकार

घर (House) खरेदी हा सर्वात मोठा आर्थिक निर्णय आहे. मालमत्ता (Property) खरेदी करताना खूप काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असतं. प्रॉपर्टी हस्तांतरित होत असताना मालकीहक्क (Ownership rights) मिळणंही गरजेचं आहे.

Property transfer : घर खरेदी करताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या मालमत्ता हस्तांतरणाचे विविध प्रकार
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 2:20 AM

घर (House) खरेदी हा सर्वात मोठा आर्थिक निर्णय आहे. मालमत्ता (Property) खरेदी करताना खूप काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असतं. प्रॉपर्टी हस्तांतरित होत असताना मालकीहक्क (Ownership rights) मिळणंही गरजेचं आहे. मालमत्ता हस्तांतरित करण्याचे विविध प्रकार आहेत. त्यात सेल डीड, गिफ्ट डीड, मृत्यूपत्र आणि पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजेच मुख्त्यार पत्र यांचा समावेश आहे. मालमत्ता हस्तांतरण झाल्यानंतर मालकी हक्क मिळवण्याची पद्धत कोणती आहे हे जाणून घेऊयात. सेल डीड म्हणजे विक्रीचा करार हा मालमत्ता हस्तांतरित करण्याची सामान्य पद्धत आहे. याला ट्रान्सफर डिड किंवा रजिस्ट्री म्हणजेच बैनामा देखील म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मालमत्ता विकते तेव्हा दोघांमध्ये सेल डिड होतो. सर्व सेल डिडची रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंदणी करावी लागते. तसेच सामान्य स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागते. सेल डिड झाल्यानंतर मालमत्तेचे मालकी हक्क नव्या मालकाच्या नावे हस्तांतरित होतात.

गिफ्ट डीड

सहसा मालमत्ता भेट स्वरुपात किंवा दान म्हणून देण्यासाठी गिफ्ट डीडचा वापर करण्यात येतो. गिफ्ट डिडमध्ये पैशाचे व्यवहार होत नाहीत. केवळ स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते आणि रजिस्टरी झाल्यानंतर मालकीहक्क हस्तांतरित करण्यात येतो. महाराष्ट्रात गिफ्ट डीडवर तीन टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. कोणतीही व्यक्ती आपल्या मर्जीने आपली स्थावर किंवा जंगम मालमत्ता मृत्यूपत्र तयार करून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करू शकतो. सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्रात नाव असलेली व्यक्ती संपत्तीचा मालक होतो. मृत्यूपत्राच्या माध्यमातून मिळालेल्या संपत्तीवर स्टॅम्प ड्यूटी भरावी लागत नाही.

जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी

काही वेळा जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून मालमत्तेची खरेदी विक्री होते. पॉवर ऑफ अटर्नी ही मालमत्तेच्या देखरेखीसाठी, काही वाद-विवाद असतील तर, भाडे वसूल करण्यासाठी आणि काही विशेष परिस्थितीमध्ये मालमत्तेच्या विक्रीचा अधिकार देण्यासाठी करण्यात आलेली असते. अनेक वेळा लोकं पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर करुन मालमत्ता खरेदी करतात. परंतु पॉवर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केल्यास मालकीहक्क प्राप्त् होत नाही. पॉवर ऑफ अटॉर्नी ही मालमत्तेचा मालक जीवित असेपर्यंतच वैध असते. 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं पॉवर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून स्थावर मालमत्तेची विक्री बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. स्थावर मालमत्ता फक्त रजिस्टर्ड डीडच्या माध्यमातूनच विकता येते.

हे सुद्धा वाचा

मालमत्ता नावावर करून घेणे महत्त्वाचे

मालमत्ता हस्तांतरित झाल्यानंतर आपल्या नावावर होणेदेखील महत्त्वाचे असते. जेव्हा एखाद्या मालमत्तेची विक्री होते , तेव्हा सरकारी नोंदीमध्ये आधीच्या मालकाचे नाव काढून दुसऱ्या मालकाचे नाव चढवावे लागते. भाडेकरारावर असलेली मालमत्तेचा यात समावेश होत नाही. भरपाईच्या वेळेस मालमत्ता आपल्या नावावर असणं महत्वाचं आहे. आपल्या नावावर संपत्ती नसल्यास मूळ मालकालाच नुकसान भरापाई मिळते. याशिवाय कर्ज मिळण्यामध्ये देखील अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मालमत्ता खरेदी करताना सर्व कागदपत्रं नीटपणे तपासून घ्या. सर्वात आधी अॅग्रीमेंट टू सेल केली पाहिजे. त्यानंतर रजिस्ट्री किंवा सेल डीड करून घ्यावी. जर कोणत्या प्राधिकरणाकडून फ्लॅट किंवा जमीन खरेदी करत असाल तरीही ती संपत्ती आपल्या नावावर करणं गरजेचे आहे, असं वकील सचिन सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.