मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. गुजरात निवडणुकीवरून त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिंदे, भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या 11 कोटींच्या संपत्तीवर ईडी टाच आणणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने केलेला दावा दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावला आहे.
बच्चू कडू आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रवी राणा फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.
आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याणं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
वेदांतावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना दिसत आहे. वेंदाता राज्याबाहेर जाण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे.
काँग्रेसकडून पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. तपासयंत्रणांचा गैरवापर करून राज्यात सरकार अस्तित्वात असल्याची टीका करण्यात आली आहे.
खवय्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच सर्वसामान्यांचा वडापाव आता आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. हेमंत सोरेन यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे.