HDFC and HDFC Bank Merger | या विलीनीकरणाकडे मार्केटचं लक्ष, पण तुम्हाला काय होणार फायदा?

HDFC and HDFC Bank Merger | एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाकडे मार्केटचं लक्ष लागलं आहे. पण त्यापासून सर्वसामान्य ग्राहकांना काय फायदा होणार?

HDFC and HDFC Bank Merger | या विलीनीकरणाकडे मार्केटचं लक्ष, पण तुम्हाला काय होणार फायदा?
विलीनीकरणाचा फायदाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 7:12 AM

HDFC And HDFC Bank Merger: एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी लिमिटेड (Hdfc Ltd) यांच्या विलीनीकरणाकडे मार्केटचं लक्ष लागलं आहे. या विलीनीकरणातून शेअर बाजारात आणि बँकिंग क्षेत्रात एचडीएफसी बँक मजबूत होणार, हे पक्कं आहे. त्याच्यासाठीची प्रक्रिया आणि सोपास्कार ही पार पाडण्यात येत आहेत. बाजार नियामक SEBI ने HDFC लि.ची उपकंपनी असलेल्या HDFC प्रॉपर्टी व्हेंचर्स लिमिटेडच्या नियंत्रणात बदल करण्यास मान्यता दिली आहे. एचडीएफसी बँकेत एचडीएफसी लिमिटेडचे ​​विलीनीकरण (Merger)झाल्यानंतर नियंत्रणात बदल होणार आहे. पण एक प्रश्न कायम विचारल्या जात आहे, तो म्हणजे याचा सर्वसामान्य ग्राहकांना काय फायदा होईल. ग्राहकांना फायदाच होणार नाही, असे तर नाही. कारण या विलीनीकरणातून एचडीएफसीची मालमत्ता वाढेल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकांना मिळेल. तसेच गुंतवणूकदारांनाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. येत्या काळात या विलीनीकरणाचे परिणाम दिसून येतील.

एप्रिलमध्ये संचालक मंडळाकडून मंजुरी

एचडीएफसी बँक आणि तिची मूळ कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC Ltd) यांच्या विलीनीकरणाचे गुऱ्हाळ पार एप्रिलपासून सुरु आहे. संचालक मंडळाने त्यावेळी प्रस्तावित विलीनीकरणासाठी मंजुरी दिली होती. एचडीएफसी लिमिटेडने स्टॉक एक्स्चेंजला याविषयीची नोटीस नुकतीच दिली आहे. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) ने एचडीएफसी लि.ची उपकंपनी असलेल्या एचडीएफसी प्रॉपर्टी व्हेंचर्स लिमिटेडचे ​​नियंत्रण बदलण्यास मान्यता दिल्याचे त्यांनी या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

आर्थिक सेवा क्षेत्रातील मोठी कंपनी

4 एप्रिल रोजी देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे ​​खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेत विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 40 अब्ज डॉलरच्या अधिग्रहण करारामुळे वित्तीय सेवा क्षेत्रात ही मोठी कंपनी अस्तित्वात येणार आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणामुळे ही कंपनी नव्याने अस्तित्वात येईल. प्रस्तावित विलीनीकरणासाठी HDFC बँकेला यापूर्वी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून मंजुरी मिळाली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) 16 जुलै रोजी दोन्ही वित्तीय संस्थांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

दोन वर्षात एकत्रिकरण

नवीन युनिटची एकत्रित मालमत्ता 18 लाख कोटी रुपये असेल. नियामक मंजुरीच्या अधीन राहून विलीनीकरण आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. एकदा या कराराची अंमलबजावणी झाली की, HDFC बँक 100 टक्के सार्वजनिक भागधारकांच्या मालकीची असेल, या विलीनीकरणाचा सर्वसामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांनाही फायदा होईल. प्रत्येक HDFC शेअरधारकाला प्रत्येक 25 शेअर्समागे HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.