Income Tax Return | ‘नकटीच्या लग्नाला विघ्न फार’ तारीख हाकेच्या अंतरावर, करदात्यांचा ना ना चा पाढाच फार

Income Tax Return | प्राप्ती कर रिटर्न भरण्याची तारखी जवळ येत असताना करदाते मात्र सबब सांगत आहेत. त्यामुळे यावेळी ही बरेच करदाते कर वेळेत जमा करणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे

Income Tax Return | 'नकटीच्या लग्नाला विघ्न फार' तारीख हाकेच्या अंतरावर, करदात्यांचा ना ना चा पाढाच फार
कारणे जाहली उदंडImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 5:06 PM

Income Tax Return | प्राप्ती कर रिटर्न(Income Tax Return) भरण्याची तारखी (Last Date) जवळ येत असताना करदाते मात्र सबब सांगत आहेत. त्यामुळे यावेळी ही बरेच करदाते (Tax Payers) कर वेळेत जमा करणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. रिटर्न भरण्यास पात्र ठरलेल्या 41 टक्के भारतीयांनी आर्थिक वर्ष (Fiscal Year) 2021-22 साठी अद्याप कागदपत्रे दाखल केलेली नाहीत, तर 22 टक्के करदात्यांना 31 जुलैचा डोंगर पार करणे कठीण असल्याचे भासत आहे. त्यांनी या मुदतीत कर भरण्यास जमणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर बिचाऱ्या 10 टक्के करदात्यांनी आवडीचं तांत्रिक कारण (Technical Reason)त्यासाठी पुढं केलं आहे. याविषयीचा एक अहवाल (Report) नुकताच समोर आला आहे, त्यात हे दावे करण्यात आले आहेत. करदाते कर भरण्यास राजी नाहीत, अशी गोष्ट नाही. परंतु, त्यांना त्यांच्या फुरसतीनुसार कर भरायचा आहे हे यातून स्पष्ट होते. मराठीत त्यासाठी म्हण आहे, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न, तसे हे विघ्न आयकर रिटर्न भरताना समोर येत आहेत.

काय म्हणतो अहवाल

लोकलसर्कल्स या समाज माध्यमांसह इतर ठिकाणी छाप असणाऱ्या वेबसाईटने याविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, 59 टक्के करदात्यांनी आधीच त्यांचे कर विवरणपत्र दाखल केले आहे. एक आठवड्यापूर्वी 20 जुलै रोजीच्या निष्कर्षांवर हे विवरण पत्र सुसंगत आहे. तसेच यापूर्वीच्या सर्वेक्षणात मात्र लोकल सर्कल्सने जमा केलेल्या आकडेवारीनुसार, 54 टक्के करदात्यांनी आयकर विभागाच्या तारखांचे पालन केले नव्हते. या महिन्याच्या अखेरीस कर परतावा भरण्याची आवश्यकता आहे. त्यापैकी 37 टक्के लोक अंतिम मुदतीपूर्वी कर भरतील असा विश्वास वाटत आहे. तर नवीन सर्वेक्षणात 13 टक्के करदाते ही तारखी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. तर 9 टक्के लोकांना ही तारीख लादल्यासारखी वाटते. त्यामुळे ही मंडळी, कर भरतील पण आताच कर भरतील याची शाश्वती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 10 टक्के करदात्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असूनही ते कर भरु शकत नसल्याचे समोर आले आहे. कर भरण्यासाठी त्यांना तांत्रिक अडचणी समोर येत आहेत.

हे सुद्धा वाचा

इतके आयटीआर दाखल ?

कर जमा करण्याची तारीख वाढवण्यात येणार नसल्याचे अगोदरच सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या करदात्यांना दंड भरावा लागणार हे स्पष्ट आहे. आयकर खात्याने याविषयी एक ट्विट केले आहे. त्यानुसार, 26 जुलै 2022 पर्यंत ई-फायलिंग पोर्टलवर या आर्थिक वर्षात (Fiscal Year) 2022-23 साठी 3.4 कोटीपेक्षा जास्त आयटीआरएस दाखल करण्यात आले आहेत. आयटीआर दाखल करण्याची तारीख 31 जुलै 2022 आहे, हे विभागाने अगोदरच स्पष्ट केले आहे. ज्या करदात्यांनी अजूनही आयटीआर दाखल केले नसेल, त्यांनी लवकरात लवकर आपला आयटीआर दाखल करावा असे आवाहन ही प्राप्तीकर खात्याने केले आहे.

तर दंड भरावाच लागणार

साथ रोग काळात, करदात्यांना सरकारने दोन आर्थिक वर्षांसाठी आयटीआर भरण्यासाठी दोनदा मुदत वाढ दिली होती. आता जे करदाते 31 जुलै या अंतिम मुदतीचे पालन करणार नाहीत. त्यांना दंड भरावे लागतील. ज्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना 5,000 रुपये दंड, विलंब शुल्क भरावे लागेल आणि करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर 1,000 रुपये दंड, विलंब शुल्क भरावे लागेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.