iPhone | काय Tata Group आता बनवणार मेड इन इंडिया iPhone? पाहा कोणत्या डीलची तयारी सुरु आहे?
iPhone | Reuters या वृत्तसंस्थेनुसार टाटा समूह विस्ट्रॉन इंडिया सोबत मिळून लवकरच अॅप्पलचं उत्पादन करणार आहे. ही डील झाल्यास टाटा समूह अॅपलच्या आयफोनचं उत्पादन करेल. 2017 पासून iPhone चं भारतात उत्पादन होत आहे.
iPhone | जर डील यशस्वी झाली तर लवकरच टाटा समूह (Tata Group) लवकरच तुमचा ड्रीम फोन आयफोनचं उत्पादन करेल. Reuters या वृत्तसंस्थेनुसार टाटा समूह विस्ट्रॉन इंडिया सोबत मिळून लवकरच अॅपलचं (Apple) उत्पादन करणार आहे. ही डील झाल्यास टाटा समूह अॅपलच्या आयफोनचं उत्पादन करेल. 2017 पासून iPhone चं भारतात उत्पादन होत आहे.
Assemble Unit
टाटा समूह तायवानचा पुरवठादार विस्ट्रॉन कॉर्प सोबत संयुक्त उपक्रमातंर्गत (Joint Venture) देशात अॅपलसाठी असेंबल युनिट सुरु करु शकते. विस्ट्रॉन हा तंत्रज्ञानआधारीत उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे. टाटा समूह त्यांच्यासोबत उत्पादन, श्रृंखला वितरण आणि असेंबलिंग या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणार आहे.
2017 पासून आयफोनचे उत्पादन
देशात 2017 पासून आयफोनचे उत्पादन सुरु आहे. पहिल्यांदा विस्ट्रॉन आणि नंतर फॉक्सकॉन यांनी भारतात असेंबलिंग युनिट सुरु केले होते. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. याविषयीच्या अहवालात, विस्ट्रॉन आणि टाटा समुहात अॅपलच्या उत्पादनावरुन कुठलीही चर्चा सुरु नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेक पर्यांयावर विचार सुरु
विस्ट्रॉन आणि टाटा समुहातील करारासाठी अन्य अनेक पर्यायही डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. टाटा समूह विस्ट्रॉन समुहातील काही हिस्सेदारी खरेदी करणार आहे. दोन्ही समूह मिळून असेंबलिंग युनीट सुरु करण्याची तयारी करत आहे. या दोन पर्यायांवर सध्या काम सुरु आहे.
विस्ट्रॉनमध्ये गुंतवणुकीचा पर्याय
सध्या यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूह विस्ट्रॉनच्या उत्पादनाचा एक हिस्सा खरेदी करेल. कंपनीच्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचा विचारही टाटा समूह करु शकतो. केवळ स्मार्टफोन उत्पादनावरच नाही तर अन्य उत्पादनांवरही लक्ष्य केंद्रीत करण्यातय येऊ शकते. या दोन्ही समुहांनी यावर अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही.
iPhone 14 उत्पादन लवकरच
चीनमधील उत्पादनानंतर अवघ्या सहा आठवड्यात भारतातही iPhone 14 चे उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. देशातील युनिटमध्ये सध्या iPhone 11, iPhone 12 आणि iPhone 13 चं उत्पादन करण्यात येते.
असेंबलिंगही भारतात
iPhone SE आणि iPhone 12 या फोनची असेंबलिंग भारतातील विस्ट्रॉन फॅक्टरीत होते. चीन पाठोपाठ पुढील सहा आठवड्यात भारतातही iPhone 14 चं उत्पादन सुरु होणार आहे.