High Speed Wheel | झूकझूक आगिनगाडी नव्हे हायस्पीड रेल्वे..सरकारने काय घेतला निर्णय
High Speed Wheel | रेल्वेसंबंधीचे अनेक महत्वाचे सामान 1960 पासून भारत युरोपातून आयात करतो. मात्र आता हायस्पीड रेल्वेचे व्हील आणि ट्रॅक सुद्धा भारतातच तयार करण्यात येणार आहे.
High Speed Wheel | आता देशातच आता हाय स्पीड रेल्वेसाठीचा (High Speed Railway) रेल्वे रुळ (Rail Track) आणि चाकं (Wheel) तयार होणार आहेत. आतापर्यंत हे सर्व साहित्य भारताला युरोपमधून (Europe) आयात करावे लागत होते. 1960 पासून हा माल भारत बाहेरुन आयात करत होता. परंतु, आता याही क्षेत्रात भारताने आत्मनिर्भरतेचे पाऊल टाकले आहे.
हाकेच्या अंतरावर शहरे
भारतातही लवकरच बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वेचे युग येणार आहे. नागरिकांना लवकरच मुंबई ते कोलकत्ता आणि दिल्ली ते मुंबई, मुंबई ते चेन्नई ही शहरे अगदी हाकेच्या अंतरावर गाठता येतील.
वंदे भारत योजना
वंदे भारत योजनेतंर्गत 400 रेल्वे गाड्यांसाटी चाकं तयार करावी लागणार आहे. त्यासाठी दोन लाख चाकांची गरज पडणार आहे. हे काम पूर्वी युरोपमधील कंपन्यांना दिले जात होते. आता हे काम भारतात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया ही सुरु करण्यात आली आहे. दर वर्षी दोन लाख चाकं तयार करण्याची क्षमता भारतातच तयार करण्यात येत आहे.
हायस्पीड रेल्वेही तयार होणार
रेलमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयीची घोषणा केली आहे. त्यानुसार, भारत आता High Speed Wheel आणि High speed Railway देशातच तयार करणार आहे. आतापर्यंत भारत हे सर्व आयात करत होता. आता भारत त्याची निर्यात करणार आहे.
Make in India Wheel Agreement
भारताने या प्रकल्पाचे नाव Make in India Wheel Agreement असे ठेवले आहे. 120kmph प्रति वेगाने धावणाऱ्या रेल्वेसाठी चाकं आणि रुळ तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांची निर्यात ही करण्यात येणार आहे.
नवीन कारखाना लवकरच
चाकं आणि रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी नवीन कारखान्याची उभारणी करण्यात येत आहे. येत्या 18 महिन्यात हे काम पूर्ण होईल.
600 कोटींची उलाढाल
एका कंपनीला चाकं आणि रेल्वे रुळाचे कंत्राट देण्यात आले आहे ही कंपनी 2 लाख चाकांपैकी 80 हजार चाकंचं उत्पादन करेल. त्याची किंमत जवळपास 600 कोटी रुपये असेल.