GST | दुधावर जीएसटी नाही, पण फ्लेवर्ड मिल्कचे काय? जीएसटी द्यावा लागेल का?
GST | जुलै 2017 पासून जीएसटी लागू झाला. दूध आणि त्यापासून तयार होणारे दही, लस्सी यावर जीएसटी लागू होत नहाी. पण फ्लेवर्ड दुधावर कर द्यावा लागतो. फ्लेवर्ड लस्सीवर मात्र कर लागत नाही.
GST | या जुलै महिन्यात सरकारने स्पष्ट केले होते की, ताजे दूध आणि Pasteurized दूध वस्तू आणि आणि सेवा कराच्या(GST) परिघात येत नाही. परंतु, पूर्वीच पॅक आणि लेबल लावून विक्री होणारे दही, लस्सी आणि पनीरवर 5 टक्के जीएसटी लागू होतो. मग फ्लेवर्ड मिल्कचे (Flavored Milk) काय होते? हे फक्त दूध आहे की पेय (Beverages) आहे. जर हे पॅकबंद केलेले असेल तर तुम्हाला फ्लेवर्ड दुधासाठी 5 टक्के जीएसटी द्यावा लागेल.
हे दूध नाही, तर पेय
याप्रकरणात एका प्राधिकरणाने (AAAR) यापूर्वीच फ्लेवर्ड दूध हे दूध नसून पेय (Beverages) असल्याचा निकाल दिला होता.
किती द्यावा लागेल जीएसटी?
तर फ्लेवर्ड मिल्कवर किती जीएसटी (Tax on Flavored Milk) द्यावा लागेल, असा प्रश्न पडतो. आईसक्रीम निर्माता वाडीलाल (Vadilal) यांनी याविषयी प्राधिकरणाकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यावेळी प्राधिकरणाने फ्लेवर्ड दुधावर 12 टक्के जीएसटी द्यावा लागेल असे स्पष्ट केले. पॅक दुधापेक्षा फ्लेवर्ड दुधावर आकारण्यात येणारा जीएसटी जास्त आहे.
वाडीलालने ठोठावला दरवाजा
वाडीलालने एएएआरचा (AAR) दरवाजा ठोठावला होता. फ्लेवर्ड दुधावर जीएसटी लागू होईल की नाही, याची विचारणा वाडीलालने केली होती.
हे तर पेय
त्यावेळी फ्लेवर्ड मिल्क हे दूध नसून पेय असल्याचा निकाल प्राधिकरणाने दिला होता. त्यानुसार पेयावर 12 टक्के जीएसटी द्यावा लागेल असे गुजरात अॅथॉरिटी फॉर एडवांस रुलिंग यांनी स्पष्ट केले. एप्रिल 2021 मध्ये हा निकाल देण्यात आला होता.
दूध नैसर्गिक नाही
फ्लेवर्ड दूध हे नैसर्गिक नाही तर ते एक शीतपेय असल्याचा निकाल देण्यात आला. त्यामुळे त्यावर अधिक जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती.