Elon Musk : एलॉन मस्क याला अब्जावधीचा फटका! इतक्या डॉलरमध्ये तर त्याने खरेदी केले होते ट्विटर

Elon Musk : गेल्या एका महिन्यात एलॉन मस्क याच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. ही घसरण इतकी मोठी आहे की, इतक्याच डॉलरमध्ये त्याने ट्विटरची खरेदी केली होती. यावरुन मस्क याला किती फटका बसला याचा अंदाज बांधता येतो.

Elon Musk : एलॉन मस्क याला अब्जावधीचा फटका! इतक्या डॉलरमध्ये तर त्याने खरेदी केले होते ट्विटर
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 8:53 AM

नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : जगातील अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत (Loss Assets) मोठी घट झाली. त्याला मोठा आर्थिक फटका बसला. 10 ऑगस्टपासून त्याच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे जगातील अब्जाधीशाच्या संपत्तीत 14 अब्ज डॉलरने घटली आहे. एका महिन्याच्या आकडेवारीनुसार तर मस्क याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ही घसरण खूप मोठी आहे. कारण मस्क याने एका महिन्यात जितकी रक्कम गमावली. तेव्हढ्या डॉलरमध्ये तर त्याने एका वर्षापूर्वी ट्विटरची खरेदी केली होती. टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये (Tesla Share) सध्या धडामधूम सुरु आहे. त्याचा फटका एलॉन मस्क याला बसला आहे. त्याची संपत्ती झपाट्याने खाली आली आहे. टेस्ला आता अमेरिका आणि युरोप बाहेर मार्केट शोधत आहे. त्यासाठी टेस्लाचे नवीन डेस्टिनेशन अर्थातच भारत आहे. भारतीय बाजार आपल्याला तारेल अशी आशा मस्क याला आहे.

एका महिन्यात 44 अब्ज डॉलर स्वाहा

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकड्यांनुसार, 18 जुलै रोजी एलॉन मस्क याच्याकडे 256 अब्ज डॉलरची संपत्ती होती. त्यानंतर त्याच्या नेटवर्थमध्ये, संपत्तीत सातत्याने घसरण सुरु आहे. 16 ऑगस्ट रोजी अमेरिकन शेअर बाजार बंद झाला, तेव्हा मस्क याची संपत्ती 212 अब्ज डॉलरपर्यंत घसरली. म्हणजे केवळ एका महिन्यात मस्क याच्या नेटवर्थमध्ये 44 अब्ज डॉलरची घट झाली. यावर्षात मस्क याच्या एकूण संपत्तीत 75.1 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 16 ऑगस्ट रोजी मस्क याला 5.26 अब्ज रुपयांचा फटका बसला.

हे सुद्धा वाचा

किती बसला फटका

हे आर्थिक नुकसान भारतीय रुपयांत मोजले तर ते 36,58,18,86,00,000 रुपये म्हणजे 3.66 लाख कोटी रुपये इतके आहे. संपत्तीत घट येण्याचे मुख्य कारण टेस्लाचे शेअरमधील धडामधूम आहे. टेस्लाचा शेअर 22 टक्क्यांनी घसरला आहे. चीनमधून जोरदार प्रतिसाद मिळत नसल्याचा फटका पण टेस्ला कंपनीला बसला आहे. चीनमध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री वाढावी यासाठी कंपनीने किंमती कमी केल्या आहेत. तरीही त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेअरमध्ये घसरण सुरुच आहे.

टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी घसरण

एलॉन मस्क याच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. त्यामागे टेस्लाच्या शेअरमधील घसरण हे मुख्य कारण आहे. एका महिन्यात टेस्लाच्या शेअरमध्ये 23 टक्क्यांची घट आली आहे. 18 जुलै रोजी कंपनीचा शेअर 293.34 डॉलरवर होता. 16 ऑगस्ट रोजी हा शेअर 225.60 डॉलरपर्यंत घसरला. हा शेअर 67.74 डॉलर घसरला. इलेक्ट्रिक कारच्या किंमती कमी केल्याने गुंतवणूकदारांनी शेअर विक्रीचा सपाटा लावला आहे. चीनमध्ये इलेक्ट्रिक कारच्या विक्रीसाठी किंमती घटविण्याच्या निर्णयावर मस्क ठाम आहे. या निर्णयाचा उलट फटका बसत आहे.

इतक्या खरेदी केले होते ट्विटर

एका महिन्यात मस्क याने जितकी संपत्ती गमावली, तेवढ्यात त्याने गेल्यावर्षी ट्विटरची खरेदी केली होती. यावरुन त्याने किती मोठी संपत्ती गमावली, हे समोर आले आहे. गेल्या वर्षी मस्क याने ट्विटर खरेदीसाठी 44 अब्ज डॉलर चुकते केले होते. तितकी रक्कम त्याने हे सोशल मीडिया एप खरेदीसाठी मोजली होती. एका महिन्यात त्याने ही रक्कम गमावली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.