Air India Offer : Tata ची बंपर ऑफर! रेल्वेच्या किरायात करा विमानाचा प्रवास

Air India Offer : टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने बाजारात मांड ठोकण्यासाठी बंपर ऑफर आणली आहे. कंपनी रेल्वेच्या भाड्यामध्ये विमानाचा प्रवास करण्याची संधी देणार आहे. काय आहे ही बंपर ऑफर..

Air India Offer : Tata ची बंपर ऑफर! रेल्वेच्या किरायात करा विमानाचा प्रवास
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 4:37 PM

नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने (Air India) धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, ट्रेनच्या किरायात प्रवाशांना विमानाचा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी एअर इंडियाने तिकीट विक्री (Ticket) सुरु केली आहे. ही ऑफर अगदी काही दिवसांसाठी आहे. बाजारात मांड ठोकण्यासाठी एअर इंडियाने ही बंपर ऑफर आणली आहे. अगदी काही हजार रुपयांत प्रवाशांना आकाशात झेप घेता येईल. त्यांना स्वस्तात तिकीट मिळेल. ही ऑफर (Bumper Offer) केवळ देशांतर्गत प्रवासासाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पण प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

केवळ 96 तासांसाठी विक्री

एअर इंडियाने 17 ऑगस्ट रोजी या ऑफरविषयी माहिती दिली. त्यानुसार, या खास सेलमध्ये देशातंर्गत विमान प्रवास केवळ 1,470 रुपयांनी सुरु होईल. कंपनीच्या या सेलमध्ये देशातील हवाई प्रवासासोबतच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुद्धा स्वस्त होईल. ही ऑफर केवळ 96 तासांसाठी असेल.

हे सुद्धा वाचा

भाडे इतके स्वस्त

टाटा समूहाची विमान कंपनीने या खास ऑफरमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट 1,470 रुपयात मिळेल. तर बिझनेस क्लाससाठी 10,130 रुपये मोजावे लागतील. कंपनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी सुद्धा ही आकर्षक ऑफर सुरु केली आहे. त्यामुळे देशाबाहेर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पण मोठा फायदा होईल.

असे करा बुकिंग

एअर इंडियाच्या या खास विक्रीचा तुम्हाला फायदा घेता येईल. तुम्ही भविष्यातील प्रवासाचा प्लॅन आताच करु शकता. एअर इंडियाची वेबसाईट आणि मोबाईल एपवरुन तिकीट बुक करु शकता. त्यासाठी आगाऊ शुल्क देण्याची गरज नाही. एअर इंडियाच्या फ्लाईंग रिटर्नसाठी डबल लॉयल्टी बोनसचा फायदा मिळेल.

लूक बदलला

टाटा समूहाने एअर इंडिया खरेदी केली. एअर इंडियाला नवीन उभारी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. टाटा समूहाने एअर इंडियाचे रुपडे पालटले आहे. टाटा समूहाने एअर इंडियाचे रिब्रँडिग केले आहे. एअर इंडियाच्या नवीन लोगोने अनेकांना मोहिनी घातली आहे. आधुनिक रुप, स्टाईलिश डिझाईन, लाल, पांढरा आणि नारंगी रंगाच्या सरमिसळीने हा नवा लोगो डोळ्याचे पारणे फेडतो. हा लोगो अपिल झाला आहे. तो मनाला भुरळ घालतो.

टाटा सन्सने केली खरेदी

एअर इंडियाची टाटा सन्सने खरेदी केली. जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यात आले. सहायक कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ही खरेदी करण्यात आली. एअर इंडिया आणि टाटा सन्सची आणखी एक सहायक कंपनी विस्ताराचे विलिनीकरण करण्यात मार्च 2024 पर्यंत करण्यात येईल, असा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.