Insurance Claim : विमा क्लेमसाठी कारच्या दोन्ही Key ठेवायच्या का सोबत, काय सांगतो नियम

Insurance Claim : विम्याचा दावा दाखल करताना कारच्या दोन्ही चावी सोबत ठेवाव्या लागतात का? याविषयीची चर्चा आता देशभर का होत आहे. इन्शुरन्स क्लेमसाठी काय नियम आहे. कारची केवळ एकच चावी असेल तर अडचण येऊ शकते का?

Insurance Claim : विमा क्लेमसाठी कारच्या दोन्ही Key ठेवायच्या का सोबत, काय सांगतो नियम
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 6:50 PM

नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : देशातील अनेक शहरात कार चोरीच्या (Car Theft) घटना वाढल्या आहेत. मेट्रो शहरातच नाही तर ग्रामीण भागात पण कार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी सोबत चारचाकी चोरीला जात असल्याने सर्वसामान्य चिंतेत आहे. ते विम्याचा आधार घेत आहे. त्यामुळे कार चोरीच्या प्रकरणात मोठे नुकसान त्यांना झेलावे लागत नाही. पण विम्याचा दावा (Insurance Claim) करताना आता आणखी एक अडचण उभी राहू शकते. जर तुमच्याकडे कारची केवळ एकच चावी, किल्ली असेल तर समस्या होऊ शकते. दावा मंजूर करताना अडचण येऊ शकते. याविषयीची चर्चा देशभरात सुरु आहे. याविषयी नियमात काही बदल झाला आहे का?

दिल्लीतील प्रकरण गाजले

दिल्लीतील असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील मयुर विहार भागात एक व्यक्ती मित्राकडे आली होती. केवळ एका तासात त्यांची कार चोरीला गेली. त्यांनी चार महिन्यांपूर्वीच ही ब्रीझा कार खरेदी केली होती. त्यांच्याकडे विमा होता. तसेच Return To Invoice आणि इतर कागदपत्रे होती. त्यामुळे त्यांना कारची सध्याची किंमत नुकसान भरपाई म्हणून मिळणे आवश्यक होते. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली.

हे सुद्धा वाचा

एका चावीने क्लेमच रिजेक्ट

विम्याचा दावा दाखल करण्यात आला. विमा कंपनीने विमा दावा दाखल करण्यापूर्वी कार मालकाकडे दोन चाव्या मागितल्या. कार खरेदी करताना या दोन्ही Keys कार कंपनी देत असते. पण मालकाकडून एक चाबी हरवली होती. त्याच्याकडे एकच चावी होती. विमा कंपनीने हा दावा फेटाळला. हरवलेल्या चावीच्या आधारे कार चोरीला गेली. हा मालकाचा निष्काळजीपणा असल्याचा दावा कंपनीने केला आणि दावा फेटाळला.

चावी नसेल तर काय करणार?

जर तुमच्या कारची अथवा बाईकची चावी हरवली असेल तर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करा. तसेच चावी रस्त्यावरील कोणत्याही डुप्लिकेट चावी तयार करणाऱ्याकडून तयार करु नका. त्याऐवजी कंपनीच्या शोरुमकडून तयार करुन घ्या. एफआयरची कॉपी, दुसरी चावी तयार करण्याच्या खर्चाची पावती सोबत असू द्या.

काय म्हणतात तज्ज्ञ

काही तज्ज्ञांच्या मते, विम्यात Key Replacement चे रायडर जरुर घ्या. महागड्या कारच्या ऑटोमॅटिक चावी अत्यंत महागडी असते. कारची चावी हरवल्यानंतर रायडर हा पर्याय निवडला असेल तर डुप्लिकेट चावी तयार करण्याचा अर्धा खर्च मिळतो. तसेच कार चोरीला गेली तर दुसऱ्या चावी संबंधीचा खटाटोप आणि त्याची बिलं सादर करता येतात. त्यामुळे कार चोरीवेळी विम्याचा दावा दाखल करताना मदत होते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.