Income Tax Refund : इनकम टॅक्स रिटर्न भरुन नाही आला रिफंड? ही असू शकतील कारणे

Income Tax Refund : इनकम टॅक्स रिटर्न भरुनही अद्याप रिफंड मिळाला नाही का, तर ही कारणं असतील. तुम्हाला रिफंड मिळण्यात उशीर होत असल्याचे वाटल्यास तक्रार ही दाखल करता येऊ शकते.

Income Tax Refund : इनकम टॅक्स रिटर्न भरुन नाही आला रिफंड? ही असू शकतील कारणे
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 7:50 PM

नवी दिल्ली | 04 ऑगस्ट 2023 : प्राप्तिकर रिटर्न फाईल करण्याची डेडलाईन संपली आहे. आयकर खात्यानुसार, जवळपास 7 कोटी करदात्यांनी आयकर फाईल केला आहे. यामधील 3.44 कोटी आयटीआरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. म्हणजे यांना रिफंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुम्ही आयटी रिटर्न भरुन अनेक दिवस झाले असतील आणि अजूनही रिफंड मिळाला नसेल तर त्यामागे काही कारणे असतील. त्यामुळे तुमचा परतावा थांबवून ठेवला असेल. तसेच रिफंडच्या (Income Tax Refund) नावाखाली अनेकांची फसवणूक सुरु आहे. तेव्हा करदात्यांनी वेळीच सावध असणे गरजेचे आहे.

रिफंड मिळतो झटपट

आधुनिक तंत्रज्ञाना आधारे ऑनलाईन रिफंड एव्हरेज प्रोसेसिंग टाईम आता कमी झाला आहे. करदात्यांना झटपट परतावा मिळतो. साधारणपणे टॅक्स रिटर्नचा रिफंड 7 दिवसांत मिळतो. तर काही प्रकरणात त्याला 120 दिवस पण लागतात.

हे सुद्धा वाचा

रिफंड न मिळण्याची कारणं काय

जर तुम्हाला पण अजून रिफंड मिळाला नसेल तर याची 5 कारणं असू शकतात. यामध्ये पहिले कारण, तुमच्या बँकेचा तपशील चुकीचा अथवा अर्धवट असू शकतो. कागदपत्रे पूर्ण नसतील. रिफंडसाठी काही चुकीची माहिती दिली असेल. TDS/TCS यांचा तपशील जुळत नसेल. रिफंडची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल. अशा अनेक कारणांमुळे तुमचा रिफंड अटकतो. अशावेळी तुम्ही आयकर विभागाशी संपर्क साधू शकता.

रिफंड न मिळाल्यास काय कराल

जर तुम्हाला आयटीआर फाईल करुन अनेक दिवस झाले असतील आणि रिफंड मिळाला नसेल तर अगोदर तुमचा मेल चेक करा. आयटीआर विभागाने अतिरिक्त तपशीलासंबंधी तुम्हाला मेल पाठवला असेल. याविषयीचा ईमेल चेक करा. जी माहिती मागवली त्याचे उत्तर द्या. आयटीआर स्टेट्सवरुन रिफंड एक्सपायर तर झाले नाही ना, याची माहिती मिळते. तुम्ही रिफंड री-इश्यू करण्याची विनंती करु शकता.

ही चूक करु नका

ITR फायलिंग वेळी करदाते अनेकवेळा छोट्या-मोठ्या चुका करतात. त्यामुळे अनेकदा रिफंड मिळण्यास उशीर होतो. पहिल्यांदा इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणार असाल तर तुम्ही या चुका करु नका. ई-फायलिंग पोर्टलवर ITR भरताना चुका टाळणे आवश्यक आहे. योग्य माहिती आणि तपशील देणे आवश्यक आहे.

अडचणीसाठी हेल्पलाईन

आयकर विभागाने ट्विट आणि ई-मेलच्या माध्यमातून करदात्यांसाठी हेल्पलाईन क्रमांकाची माहिती दिली. करदात्यांना समस्या अडचण असेल तर ते या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करु शकतात. आयकर विभाग 24 तासांत हेल्पलाईन क्रमांक, चॅटबॉट अथवा ईमेल्सच्या सहायाने या अडचणी सोडवणार आहे.

करदात्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक

1800 103 0025 1800 419 0025 +91-80-46122000 +91-80-61464700

या ई-मेलवर करा तक्रार

करदात्यांना पॅन आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे orm@cpc.incometax.gov.in वर तक्रार दाखल करता येईल.

याठिकाणी करा संपर्क

एआयएस, टीआयएस, एसएफटीसाठी सुरुवातीला प्रतिक्रिया, ई-अभियान वा ई-पडताळणी विषयीची अडचण, समस्येसाठी 1800 103 4215 या क्रमांकावर कॉल करता येईल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.