Twitter Stock Trading : तर आता ट्विटरवर होणार शेअरची खरेदी-विक्री? एलॉन मस्क याने तर स्पष्टच सांगितले

Twitter Stock Trading : एलॉन मस्क हा अफलातून व्यावसायिक आहे. तो काय आयडियाची कल्पना लढवेल हे सांगता येत नाही. आता त्याने ट्विटरवरच शेअर खरेदी विक्रीचा डाव आखला आहे. काय आहे हा प्लॅन

Twitter Stock Trading : तर आता ट्विटरवर होणार शेअरची खरेदी-विक्री? एलॉन मस्क याने तर स्पष्टच सांगितले
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 5:07 PM

नवी दिल्ली | 04 ऑगस्ट 2023 : जगातील गर्भश्रीमंत आणि अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) आणखी एक पराक्रम करण्याच्या तयारीत आहे. तो अफलातून व्यक्ती आहे, हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. तो काय आयडियाची कल्पना लढवेल हे कोणालाच सांगता येत नाही. त्याने गेल्यावर्षी ट्विटरचे धनुष्य उचलले. त्यात त्याला चांगलेच टोणपे खावे लागले. एलॉन मस्कने नुकतीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे रिब्रांडिंग केले. त्याने ट्विटरचे (Twitter) नाव बदलून ते एक्स ठेवले. पारंपारिक चिमणी गायब केली. त्याऐवजी एक्स हा लोगो ठेवला. मस्क X हा प्लॅटफॉर्म संपूर्णपणे विकसीत करण्याच्या तयारीत आहे. त्याआधारे या नवीन ट्विटरवरुन युझर्सला शेअरची खरेदी-विक्री (Twitter Stock Trading) करता येऊ शकते. यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण याविषयीची जोरदार चर्चा रंगली आहे.

ट्रेडिंग हब सुरु करण्याची तयारी

Semafor ने याविषयी एक दिवसापूर्वी माहिती जाहीर केली. यामध्ये हा दावा करण्यात आला. मस्क लवकरच एक्स प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग हबची सुरुवात करु शकतो असा दावा करण्यात येत आहे. मस्क एक्स प्लॅटफॉर्मला फायनेन्शिअल डेटा पॉवरहाऊसच्या रुपात तयार करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे योजना

रिपोर्टनुसार, एक्स प्लॅटफॉर्मने नवीन संकल्पनेवर काम करण्यासाठी बाजारातील अनेक तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे. एक्सच्या योजनेनुसार सविस्तर फायनेन्शिअल कंटेंट, रिअल टाईम स्टॉक फीड आणि इतर अन्य सेवांचा लाभ युझर्सला देण्यात येईल. त्यासाठी एक्स काही दिवसांपासून सेवा पुरवठादारांच्या संपर्कात आहे. या वृत्तामुळे जगभर एकच खळबळ उडाली आहे. अनेकांन तर या योजनेने सुखद धक्का बसला आहे.

एलॉन मस्कचे मात्र कानावर हात

स्टॉक मार्केट, क्रिप्टो मार्केट आणि ऑप्शन्स ट्रेडिंगसंबंधी वृत्त देणाऱ्या @unusual_whales या हँडलवरुन याविषयीची बातमी समोर आली. त्यावर एलॉन मस्कने प्रतिक्रिया दिली. त्याने कानावर हात ठेवले. त्याने या वृत्ताचे खंडन केले. अशा कोणत्याही योजनेवर सध्या काम सुरु नसल्याचा दावा त्याने केला.

मस्कने केले अनेक बदल

एलॉन मस्कने ट्विटरच्या खरेदीनंतर त्यामध्ये अनेक बदल केले. बदलाची प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. ब्लू सब्सक्रिप्शनच्या नावे त्याने पेड सर्व्हिस सुरु केली. व्हेरिफाईड अकाऊंटची व्यवस्था संपवली. ब्लू सब्सक्राईबर्सला एक्स प्लॅटफॉर्मवर इतर अनेक सुविधा देण्यात येत आहे. त्याने अनेक कर्मचाऱ्यांना, वरिष्ठांना सरळ घरचा रस्ता दाखवला. तर काहींनी स्वतः राजीनामा दिला होता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.