बुलेटपेक्षा स्वस्त दरात क्रूझर लूक असलेली Hunter 350… काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

रिपोर्ट्‌सनुसार ही बाइक 1.3-1.4  लाख रुपये (एक्सशोरुम) किंमतीसह रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाइक असणार आहे. हंटर 350 बाइक, मेटियर 350 आणि क्लासिक 350 बाइकच्या आर्किटेक्चरवर बेस्ड असणार आहे.

बुलेटपेक्षा स्वस्त दरात क्रूझर लूक असलेली Hunter 350... काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 3:26 PM

भारतातील दिग्गज दुचाकी निर्माता कंपनी असलेल्या रॉयल एनफील्डचे (Royal Enfield) पुढील मोठे लाँच हंटर 350 (Hunter 350) असणार आहे. रॉयल एनफील्ड हंटर 350 रोडस्टर जूनच्या शेवटापर्यंत देशभरातील सर्व शोरुममध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रिपोर्ट्‌सनुसार ही बाइक 1.3-1.4  लाख रुपये (Exshowroom) किंमतीसह रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाइक असणार आहे. हंटर 350 बाइक, मेटियर 350 आणि क्लासिक 350 (Classic 350) बाइकच्या आर्किटेक्चरवर बेस्ड असणार आहे. अपकमिंग बाइकला रेट्रो टचसोबत मॉडर्न क्लासिकल डिझाईनमध्ये सादर करण्यात येणार आहे. या लेखातून हंटर 350 च्या स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती घेणार आहोत.

दोन व्हेरिएंटमध्ये होणार उपलब्ध

नुकत्याच हाती आलेल्या एका रिपोर्टनुसार, रॉयल एनफील्ड हंटर 350 दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. युजर्सना बेस व्हेरिएंटमध्ये पुढे डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक मिळणार असून टॉप एंड व्हेरिएंटला दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक देण्यात येणार आहे. या शिवाय पाहिला व्हेरिएंट सिंगल चेनल एबीएससह उपलब्ध होणार असून दुसरा व्हेरिएंट ड्युअल चॅनल एबीएसने सज्ज असेल.

736322

हे सुद्धा वाचा

कमी वजन देईल चांगला परफॉर्मेंस

अपकमिंग बाइक अनेक कलर ऑप्शससह बाजारात दाखल होणार आहे. हंटर 350 नवीन जे-सिरीज आर्किटेक्चरवर आधारी असणार असून ती Meteor 350 आणि क्लासिक 350 रीबोर्नमध्ये दिसणार आहे. या दोन्ही बाइकच्या तुलनेमध्ये हंटरमध्ये हंटरचे वजन तुलनेत कमी असल्याने परफॉर्मेंसमध्येही ही बाइक पुढे राहणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

रेट्रो लूक आणि मॉडर्न क्लासिक डिझाईन

रॉयल एनफील्डच्या दुसर्या मॉडेल सारखे हंटर 350 देखील रेट्रो स्टाइलिंग एलिमेंट्‌ससह मॉडर्न क्लासिक डिझाईनसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. अपकमिंग बाइकमध्ये युजर्सना गोल हेडलँप, टियरड्रोपच्या आकारातील फ्यूअल टँक, गोल एलईडी टेललाइट, स्प्लिट पिलियन ग्रेब रेल, छोटे साइड स्लंग एग्जॉस्ट मफलर आणि एक लहान रियर सेक्शनसारखे फीचर्स मिळणार आहेत.

एनफिल्डची सर्वात बजेट बाइक

हंटर 350 मध्ये युजर्सना 349 सीसी सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन मिळणार आहे. ही बाइक 5 स्पीड गिअरबॉक्ससह उपलब्ध होणार आहे. लाँचच्या दरम्यान, या बाइकची किंमत सध्याच्या रायल एनफील्ड बुलेट 350 च्या तुलनेत कमी असू शकते. हंटर 350 1.3 लाखांपासून 1.4 लाखांपर्यंत (Exshowroom) उपलब्ध होऊ शकते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.