Home Loan: गृह कर्ज घ्यायचे आहे का? जाणून घ्या कोणत्या बँकेत किती व्याजदर आहे
तुम्ही जर गृहकर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर नक्कीच कुठली बँक कमी व्याजदरावर कर्ज देते हे शोधत असाल. त्याची यादी खाली दिलेली आहे.
मुंबई, 30 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Reserve Bank repo rate) वाढ केली. यामुळे कर्ज आणि त्याचे हप्ते दोनीही महागले आहे. एका झटक्यात, दर 50 बेसिस पॉइंट्सने वाढला आहे. या वर्षी मे महिन्यानंतर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याची ही चौथी वेळ आहे. या वर्षी मे ते सप्टेंबरपर्यंत रेपो दरात 190 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. आता रेपो दर 5.9% या तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. रेपो दर वाढवण्याचा सर्वात मोठा परिणाम गृहकर्जाच्या (Home loan) व्याजदरावर झाला आहे. 30 सप्टेंबरपासून अनेक बँकांनी गृहकर्ज किंवा उर्वरित कर्ज महाग केले आहे. रेपो रेटशी जोडलेल्या कर्जावर याचा त्वरित परिणाम होतो. अशा परिस्थितीत कोणती बँक ग्राहकांना सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 10 बँकांच्या व्याजदरही माहिती जाणून घेऊया.
- कोटक महिंद्रा बँक – कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना किमान 7.50 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. कर्जाच्या 0.50 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागेल.
- सिटी बँक – सिटी बँक ग्राहकांना किमान 6.55 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. प्रक्रिया शुल्क म्हणून 10,000 भरावे लागतील.
- युनियन बँक ऑफ इंडिया – युनियन बँक ऑफ इंडिया 7.90 टक्के प्रास्ताविक दराने गृहकर्ज देत आहे. प्रोसेसिंग फीची माहिती बँकेच्या शाखेत घ्यावी लागेल.
- बँक ऑफ बडोदा – बँक ऑफ बडोदा 7.45% च्या प्रास्ताविक दराने गृहकर्ज प्रदान करत आहे. प्रोसेसिंग फीची माहिती मिळवण्यासाठी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल.
- सेंट्रल बँड ऑफ इंडिया – सेंट्रल बँक ऑफ इंडिया 7.20 टक्के ते 7.65 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. 20,000 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
- बँक ऑफ इंडिया – गृहकर्जाचा व्याजदर 7.30 टक्क्यांपासून सुरू होत आहे. हा सर्वात कमी दर आहे. प्रक्रिया शुल्काची माहिती बँकेच्या शाखेत उपलब्ध असेल.
- स्टेट बँक ऑफ इंडिया – स्टेट बँक आपल्या ग्राहकांना सुरुवातीच्या 8.05 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. कर्जाच्या रकमेच्या किमान 0.35 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्कासाठी भरावी लागेल.
- एचडीएफसी होम – एचडीएफसी होम लोन आपल्या ग्राहकांना 8.10 टक्के प्रास्ताविक दराने कर्ज देत आहे. कर्जाच्या रकमेच्या 0.5% किंवा रु. 3,000 यापैकी जे जास्त असेल ते प्रक्रिया शुल्क म्हणून आकारले जाईल.
- एलआयसी हाऊसिंग फायनान्स – एलआयसी हाऊसिंग फायनान्स 7.55 टक्के प्रारंभिक दराने गृहकर्ज देत आहे. प्रक्रिया शुल्कासाठी 10,000 ते 15,000 रुपये भरावे लागतील.
- ॲक्सिस बँक – ॲक्सिस बँक त्यांच्या ग्राहकांना 7.60% च्या प्रास्ताविक दराने गृहकर्ज देत आहे. 10,000 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update