Vastu Tips: वास्तू शास्त्रातल्या ‘या’ सोप्या उपायांनी प्रगतीतले अडथळे होतील दूर
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वास्तुशी संबंधित कोणत्याही प्रकारचे दोष असल्यास व्यक्तीच्या जीवनात अडथळे येतात आणि धनहानी होते. अशा वेळी वास्तू दोष दूर करण्यासाठी काही खास उपाय सुचविण्यात आलेले आहे.
Vastu Tips: अनेकदा आपण पाहतो की, आयुष्यात खूप कष्ट करूनही यश मिळत नाही. परिणामी आपण आपल्या नशिबाला दोष देतो. मात्र काही वेळा यामागे वास्तुदोष (Vastu Dosh) देखील असतो. घरात सकारात्मक उर्जा राहिल्याने कुटुंबात आर्थिक समृद्धी, सुख, संपत्ती आणि चांगले आरोग्य लाभते. दुसरीकडे, घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास, व्यक्तीला आर्थिक नुकसान, कामात अडथळे, रोग आणि कुटुंबात मतभेद होतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वास्तुशी संबंधित कोणत्याही प्रकारचे दोष असल्यास व्यक्तीच्या जीवनात अडथळे येतात आणि धनहानी होते. अशा वेळी वास्तू दोष दूर करण्यासाठी काही खास उपाय सुचविण्यात आलेले आहे. ज्याद्वारे आपण अनेक संकटांना दूर सारू शकतो. चला जाणून घेऊया असे काही खास उपाय ज्यामुळे प्रगतीतील अडथळे दूर होतील.
घरात गंगाजल शिंपडा
ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी पूजा करण्यापूर्वी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. गंगेचे पाणी मोक्ष प्रदान करते आणि त्यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. तसेच, ते शिंपडल्याने संपूर्ण घरात सकारात्मक वातावरण राहते. अशा वातावरणात पूजा केल्याने देवाची कृपा होऊन मन शांत राहते. घरात एखादा वास्तुदोष असल्यास दूर होतो.
गाईला पोळी घाला
नेहमी लक्षात ठेवा की पोळ्या बनवताना, पहिली गाईसाठी आणि शेवटची कुत्र्यासाठी काढून ठेवा. असे केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते आणि धनाशी संबंधित त्रास दूर होतात. गायीला पोळी खाऊ घातल्याने पितृदोष दूर होतो आणि आपल्या कुटुंबावर नेहमी आशीर्वाद असतो असे म्हणतात. दुसरीकडे कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने शत्रूपासून संरक्षण होते आणि जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात.
झोपण्याची दिशा देखील महत्त्वाची
सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. नेहमी लक्षात ठेवा की ऊर्जेच्या विरुद्ध प्रवाहात कधीही झोपू नका. म्हणजेच पूर्वेकडे पाय करून झोपू नका. नेहमी दक्षिणेकडे डोके करून झोपणे चांगले मानले जाते. अशा स्थितीत तुमचे पाय उत्तरेकडे असतील. शास्त्रांमध्ये तसेच इतर अनेक चरित्रांमध्ये या दिशेला झोपण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे केल्याने जीवनात नेहमी शांती आणि समृद्धी राहते. सकारत्मक ऊर्जा वाढल्याने विचारांमध्ये पारदर्शकता येते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)