Health insurance : आजच आपल्या बाळाचा आरोग्य विमा काढा आणि निश्चिंत व्हा; जाणून घ्या विम्याची संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

लहान मुलांना प्रौढ व्यक्तीच्या तुलनेत आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. अशा वेळी आरोग्य विमा हा फायदेशीर ठरतो. जर तुम्ही तुमच्या पाल्यांना विम्याचे सुरक्षा कवच दिले नसेल तर त्यांचा आरोग्य विमा आजच काढून घ्या आणि निश्चिंत व्हा.

Health insurance : आजच आपल्या बाळाचा आरोग्य विमा काढा आणि निश्चिंत व्हा; जाणून घ्या विम्याची संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 5:30 AM

मुंबई : मुलीचा पहिला वाढदिवस जोरदार करण्यासाठी मोहनने भरपूर पैशांची (money) बचत केली होती. अचानक त्याची मुलगी आजारी पडली, वाढदिवसाऐवजी (Birthday) त्याची सर्व बचत उपचारावर खर्च झाली. मोहननं आरोग्य विम्यात (Health insurance) मुलीचा समावेश केला असता तर त्याला उपचारासाठी एवढा खर्च करावा लागला नसता. लग्नानंतर कुटुंब वाढतं, बाळाच्या जन्मानंतर जबाबदारी वाढते. आपला मुलगा आयुष्यात यशस्वी व्हावा यासाठी पालक जीवाचे रान करतात, पण याही पेक्षा महत्वाचं आहे बाळाचं आरोग्य आहे. मुलं सुदृढ आणि सक्षम असल्यानंतरच जीवनात यशस्वी होतात. त्यामुळे आरोग्य विमा घेणं अत्यंत गरजेचं आहे. अडचणीच्या वेळी आरोग्य विमा खूप फायदेशीर ठरतो. म्हणूनच बहुतेक विमा कंपन्या सुरुवातीच्या पहिल्या 90 दिवसांनंतर बाळाला विमा संरक्षण देतात. काही कंपन्या अशा आहेत ज्या बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून विमा संरक्षण देतात. अशावेळी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे जो पर्याय तुम्हाला चांगला वाटतो तो निवडा. मात्र, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व कंपन्यांच्या योजनांचा तुलनात्मक अभ्यास करा.

वेगळ्या विम्याची सुविधा नाही

आजकाल बहुतांश लोकांकडे आरोग्य विमा आहे. ठराविक कालावधीनंतर हप्ता भरल्यावर विमा पॉलिसीचं नूतनीकरण होतं. नवजात बाळाच्या जन्मानंतर आरोग्य विमा पॉलिसीचं नूतनीकरण करताना बाळाच्या आरोग्य विम्याचा देखील समावेश करा. ही अत्यंत साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. बाळाचा विमा काढण्यासाठी कंपनीच्या अर्जात बाळाच्या तपशीलाची माहिती द्यावी लागते. यासोबतच मुलाशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रेही सादर करावी लागतात. सध्या नवजात बालकांसाठी वेगळे आरोग्य विमा संरक्षण नाही. तुम्ही हे कव्हर तुमच्या सध्याच्या फ्लोटर किंवा ग्रुप इन्शुरन्स प्लॅनमध्ये जोडू शकता. दरम्यान, या कव्हरमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा हे निश्चित करा. असे आर्थिक सल्लागार जितेंद्र सोलंकी म्हणतात. काही कंपन्या बालकांसाठी आवश्यक असलेल्या लशींच्या खर्चाचाही या विम्यात समावेश करतात. सध्या तुमच्याकडे एखाद्या कंपनीची पॉलिसी असल्यास त्यांच्यांशी संपर्क करणं हे कधीही चांगलं.

विम्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

जोखीम टाळण्यासाठी विमा कंपन्या विमा घेतलेल्या व्यक्तीच्या आरोग्याची संपूर्ण माहिती घेतात. बाळाला विमा संरक्षण देतानाही त्याच्या आरोग्याचा तपशील मागवला जातो. जन्मानंतर बाळाला विमा संरक्षण देताना जन्माचा दाखला, हॉस्पिटल डिस्चार्च कार्ड आणि आरोग्याशी निगडीत इतर रिपोर्ट विमा कंपन्यांना सादर करावे लागतात. या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर विमा कंपनी प्रीमियम ठरवते. सध्याच्या प्रीमियमध्ये वाढ होते. नवीन प्रीमियम भरल्यानंतर बाळाला विम्याचे कवच मिळते. लहान मुलाचा आरोग्याशी संबंधित खर्च खूप जास्त असतो, काही समस्या उद्भवल्यास हातातील सर्व पैसा खर्च होतो. त्यामुळे अशी स्थिती टाळण्यासाठी वेळीच आपल्या बाळाला विम्याचे कवच अलब्ध करून द्या.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.