Masterdating काय आहे? सोशल मीडियावर का ट्रेंड होतंय?
मास्टरडेटिंग ही एक वेगळी व्याख्या आहे. सोशल मीडियावर सध्या हे खूप व्हायरल होतंय. डेटिंगचे अनेक प्रकार असतात. हा एक नवा प्रकार आहे. सोशल मीडियाच्या जगात तुम्ही मागे पडू नये म्हणून तुम्हाला हे नवे ट्रेंड्स माहिती असायलाच हवेत. जाणून घ्या काय आहे मास्टर डेटिंग!
मुंबई: डेटिंग, रिलेशनशिप यासारख्या गोष्टींची व्याख्या आपल्याला माहीतच आहे. सोशल मीडियावर सुद्धा वेगवेगळे ट्रेंड सुरु असतात. हे ट्रेंड सगळेच लोक फॉलो करतीलच असं नाही पण हे ट्रेंड सगळ्यांना माहित असतात. जगात काय सुरु आहे याची माहिती लोक आवर्जून ठेवतात. सध्या सोशल मीडियावर मास्टरडेटिंग नावाची एक टर्म व्हायरल होतीय. डेटिंग ऐकलं, फ्रेंड्स विथ बेनेफिट्स ऐकलं, रिलेशनशिप ऐकलं हे मास्टरडेटिंग काय असतं? तुम्हाला हे काय असतं याची माहिती असायलाच हवी जगासोबत असायला नको?
मास्टरडेटिंग! दुसरा कोणताही विचार मनात आणण्याआधी थांबा! मास्टरडेटिंग म्हणजे स्वतःला डेट करणे. होय! स्वतःसोबत वेळ घालवणे, चांगल्या हॉटेलमध्ये जाणे, हवं ते खाणे म्हणजे मास्टर डेटिंग. आपण कधी स्वतःवर पैसे खर्च करत नाही, केले तरी क्वचितच! स्वतःचा विचार करायला आपल्याला फारसं जमत नाही. मास्टरडेटिंग आपल्याला स्वतःला प्राधान्य द्यायला शिकवते. मास्टर डेटिंग एकटेपणा एन्जॉय करायला शिकवते.
आलिशान रेस्टॉरंट्स, बार, म्युझियम किंवा पार्कमध्ये मास्टरडेटिंग मध्ये स्वत:ला घेऊन जातात. स्वतःला खास भेटवस्तू आणि ट्रीट्स देऊन स्वतःचे लाड करणे या ट्रेंडमध्ये आहे. आपण खरोखर कोण आहात हे जाणून घेणे, आपले छंद जोपासणे आणि धैर्याने आपल्या एकाकीपणाला सामोरे जाणे यासाठी हे केलं जातं. ‘डेटवर स्वत:ला छान तयार करणं, आपल्याला काय हवं ते करणं, आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींना प्राधान्य देणं हे मास्टरडेटिंग मध्ये येतं.
2010 मध्ये, अर्बन डिक्शनरीने या शब्दाची व्याख्या अशी केली: “जेव्हा एखादी व्यक्ती चित्रपट पाहण्यासाठी बाहेर जाते, किंवा थीम पार्कला भेट देते किंवा इतरत्र जिथे जोडपी किंवा मित्र जातात अशा ठिकाणी जाते, परंतु हे एकटं करते.”