ट्विटरवरून ब्लू टिक काढून टाकणार? एलोन मस्क काय म्हणाले?
या डीलपूर्वी मस्कने सांगितले होते, ट्विटरवर मोठ्या प्रमाणात फेक अकाउंट आहेत. ट्विटरने सर्व योग्य माहिती दिल्यानंतरच ते कंपनी खरेदी करतील.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आहे. यानंतर मस्क यांनी एका ट्विटमध्ये विटरचे वर्णन ‘मुक्त पक्षी’ असे केले आहे. एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर युजर्सनी त्यांच्याकडे सर्व व्हेरिफाय युजर्सचे ब्लू टिक हटवण्याची मागणी केली आहे. #Remove_all_BlueTicks हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे. जे पात्र नाहीत त्यांनीही ओळखीतून ब्लू टिक मिळवले असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.
या डीलपूर्वी मस्कने सांगितले होते, ट्विटरवर मोठ्या प्रमाणात फेक अकाउंट आहेत. ट्विटरने सर्व योग्य माहिती दिल्यानंतरच ते कंपनी खरेदी करतील. आता मस्क ट्विटरचा नवीन बॉस बनल्याने युजर्सने त्यांना सर्व व्हेरिफायड वापरकर्त्यांकडून ब्लू टिक्स घेण्यास सांगितले आहे.
ब्लू टिक हटवण्यासाठी ट्विटरवर हॅशटॅग
#Remove_all_BlueTicks या हॅशटॅगने ट्विटरवर भरघोस प्रतिक्रिया येत आहेत. ट्विटर वापरकर्ते आता अशा लोकांचे प्रोफाइल शोधत आहेत आणि शेअर करत आहेत ज्यांच्या फॉलोअर्सचा दहाचा आकडाही ओलांडला नाही, परंतु त्यांचे खाते व्हेरिफाय झाले आहे.
ब्लू टिक व्हेरिफिकेशनचा धंदा बंद करावा
आम्ही अजूनही आमच्या 2019 च्या जुन्या भूमिकेवर उभे आहोत. पडताळणी धोरणात भेदभाव दूर झाला नाही. म्हणूनच सर्वांचे एका वेळी ब्लू टिक काढून टाकावे. आम्ही देशातील भेदभाव नष्ट करण्यासाठी आलो आहोत, ब्लू टिक्स घेण्यासाठी नाही.
ट्विटरचा नवा बॉस बनल्यानंतर मस्कने 4 अधिकाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यात भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल आणि सर्वोच्च कायदेशीर व्यवहार अधिकारी विजया गड्डे, सीएफओ नेड सेगल आणि जनरल काउंसिल सीन अगेट यांचा समावेश आहे. कंपनी आगामी काळात कर्मचारी कपात करण्याची घोषणाही करू शकते.