भाऊंचं पाकीट शोधून द्या की तेवढं, त्यांना बिल भरायचंय!
एक कपल रेस्टॉरंटमध्ये जेवत आहे. पण बिल भरताना त्या व्यक्तीला आपलं पाकीट कुठेतरी हरवल्याचं लक्षात आलंय.
एखादे चित्र पाहून तुमचे डोळे फसले आहेत का? किंवा ते पाहून तुम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की डोळे चोळून पुन्हा ते पाहावं लागतं. मग कदाचित तुम्ही ऑप्टिकल भ्रम असलेल्या फोटोकडे पहात आहात. ही ती चित्रे आहेत जी आपण प्रत्यक्षात त्यांना वेगळ्या प्रकारे पाहतो पण ते असतं काहीतरी वेगळंच. मेंदूचा चांगला व्यायाम होतो ही चित्रं पाहिली की. अशा प्रतिमांना, चित्रांना ऑप्टिकल भ्रम असे म्हणतात.
ऑप्टिकल भ्रम असलेली छायाचित्रे मनोविश्लेषण क्षेत्राचा एक भाग आहेत, आपण गोष्टींकडे कसे पाहता हे आपल्याला यातून कळतं. एखादी व्यक्ती गोष्टी किंवा प्रतिमांकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहू शकते.
हेच कारण आहे की प्रत्येकजण ऑप्टिकल भ्रमात लपलेल्या कोड्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
काहीजण ते पटकन सोडवतात, तर अनेकांना डोकं खाजवायला भाग पाडलं जातं. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट घेऊन आलो आहोत.
एक कपल रेस्टॉरंटमध्ये जेवत आहे. पण बिल भरताना त्या व्यक्तीला आपलं पाकीट कुठेतरी हरवल्याचं लक्षात आलंय.
त्याचवेळी हातात बिल घेतलेला वेटर संशयाने त्याच्याकडे पाहत आहे. तसे त्या माणसाचे पाकीट त्याच्या आजूबाजूला कुठेतरी पडले आहे, पण ते त्याला दिसत नाही. आता ते पाकीट तुम्हाला 10 सेकंदाच्या आत शोधावे लागेल. हे तुमचे आव्हान आहे.
पाकिट सापडलं नसेल तर ते कुठे पडलं आहे, हे आम्ही खाली पांढऱ्या वर्तुळात सांगत आहोत.
तुमच्या मेंदूची चाचणी घेण्याच्या उद्देशाने हे चित्र तयार केले गेले आहे. पण हे सोडवताना तुमचा घाम निघेल. पाकिट शोधण्यात ९९ टक्के जनता अपयशी ठरल्याचा दावा चित्रासह करण्यात आला आहे.