VIDEO | रस्त्यावरचा कुत्रा मुंबई लोकल ट्रेनचा कायम प्रवासी, रोज एकाचवेळी प्रवास करतो, व्हिडिओ व्हायरल
VIDEO | इंडिया कल्चरल हब यांच्याकडून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. हा कुत्रा बोरिवली येथून रोज एकाचवेळेत ट्रेन पकडतो, ट्रेनमध्ये आल्यानंतर संपूर्ण प्रवासाचा आनंद घेतो.
मुंबई : मुंबई लोकलमधील (Mumbai Local Train Viral Video) रोज व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. लोकलमधून प्रवास करणं कधीही सोप्पं नाही, हे अनेकांना माहित आहे. लोकांना बसायला मिळेलचं याची सुध्दा खात्री नाही. लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) व्हिडीओ सध्या चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा (Dog Video) दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये सांगितलं जात आहे की, हा कुत्रा रोज एकाचवेळी बोरिवली (Mumbai Local Train Video) येथून ट्रेनमधून प्रवास करतो. रस्त्यावरील या कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला इंडिया कल्चरल हब यांच्याकडून शेअर करण्यात आलं आहे.
प्रवास करणाऱ्या लोकांच्यासाठी तो एक सहकारी झाला
इंडिया कल्चरल हब यांनी जो व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा कुत्रा रोज एका बोरिवली स्थानकातून एकाचवेळी ट्रेन पकडतो. ट्रेनमध्ये चढल्यानंतर तो कुत्रा संपुर्ण प्रवासाची मजा घेतो. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे कुत्रा प्लॅटफॉर्मवरती दिसत असलेल्या लोकांना नजरेला नजर देत पुढे जात आहे. तो कुत्रा कधी ट्रेनमध्ये येत उन्हाची मजा घेत आहे, तर कधी प्रवाशांच्या पुढे पाठी फिरत असतो. त्याच्यानंतर नियमानुसार तो कुत्रा अंधेरीला नियमानुसार उतरतो. कुत्र्याचा हा प्रवास रोजचा आहे. त्यावेळी प्रवास करणाऱ्या लोकांच्यासाठी तो एक सहकारी झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं त्यावर जबरदस्त कमेंट करीत आहेत.
View this post on Instagram
लोकांच्या व्हिडीओला जोरदार रिएक्शन
या व्हिडीओला लोकं चांगल्या कमेंट करीत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, ‘अधिक प्रेम दाखवणारा व्हिडीओ’, आणखी एका व्यक्तीने चांगल्या कमेंट करीत लिहीलं आहे की, ‘ही त्याची दुनिया आहे’ आणि त्याचा आपण एक हिस्सा आहे’. तिसऱ्या व्यक्तीने लिहीले आहे की, ‘हा कुत्रा राहायला बोरीवली परिसरात आहे आणि कामाला कांदिवली परिसरात आहे’. हा व्हिडीओ आतापर्यंत 70 हजार पेक्षा अधिक लोकांना आवडला आहे. या व्हिडीओ काही लोकांनी मजेशीर कमेंट सुध्दा केल्या आहेत.