या चित्रात तुम्हाला रिंग दिसतेय का? चला सांगा…
ऑप्टिकल इल्युजन हे कोडे असते. कोडी सोडवायला मजा येते नाही का? कोडी सोडवण्याचा सराव असेल तर ती पटकन सोडवली जाऊ शकतात. विशेष म्हणजे ही कोडी ठराविक वेळेत सोडवायची असतात. या चित्रात तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे. ते काय आणि किती वेळात शोधायचं आहे ते वाचा. जर तुम्ही सोडवलंत तर समजा की तुम्ही हुशार आहात.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचं कोडं आहे. लहाणपणी आपण कोडी सोडवायचो, सट्टी लागली रे लागली की सगळी भावंडे एकत्र येऊन छान कोडी सोडवत बसायची. आधी सारखी एकत्र कुटूंबपध्दती आता फारशी राहिलेली नाही पण कोडी मात्र अजून शिल्लक आहेत. कोड्यांचं स्वरुप बदललेलं आहे. ही कोडी आता ऑनलाइन पध्दतीत उपलब्ध असतात आणि यालाच ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. ऑप्टिकल इल्युजनचा सराव असणाऱ्या व्यक्तीला हे पटकन सोडवता येतं. रोज जर ही कोडी सोडवली तर कदाचित तुम्हाला सुध्दा सोपंच जाईल.
ऑप्टीकल इल्युजन
आता हे चित्र नीट बघा. या चित्रात तुम्हाला एक गार्डन दिसेल. या गार्डनमध्ये गाजर, ससा दिसेल यात तुम्हाला रिंग शोधायची आहे. जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला यांत रिंग लगेचच दिसेल. नीट निरखून पाहिल्यास हे नक्कीच शक्य आहे. अनेक शास्रज्ञ असं म्हणतात की ऑप्टीकल इल्युजन तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते सांगतात, तुम्ही किती हुशार आहात ते सांगतात.
तुम्हाला शोधायची आहे रिंग
आता या चित्रात गाजर दिसेल, ससा दिसेल, फुलपाखरू दिसेल पण तुम्हाला शोधायची आहे रिंग. तुम्ही याचं उत्तर तर शोधालंच पण हे उत्तर तुम्हाला जास्तीत जास्त आणि जमेल तसं पटकन शोधायचं आहे. चला तर मग, तुम्हाला याचं उत्तर दिसलं आहे का? जरा चित्राच्या चहुबाजूंनी तुमची नजर फिरवा. आता? दिसलं? काळजी करू नका, या कोड्याचं उत्तर आम्ही तुम्हाला खाली दाखवून देत आहोत. खाली दिलेला फोटो बघा, या फोटोमध्ये तुम्हाला याचं उत्तर दिसेल.