Optical Illusion | तुम्हाला या चित्रात F हे अक्षर शोधायचंय, फक्त 17 सेकंदात!
ऑप्टिकल भ्रम मानवी मेंदूवर कसा परिणाम करतात याचा अभ्यास संशोधक वर्षानुवर्षे करीत आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासात दिसून येतं की मेंदूचे विविध भाग ऑप्टिकल भ्रमांना कसा प्रतिसाद देतात. दिलेल्या चित्रात तुम्हाला एक वेगळं अक्षर शोधायचं आहे. 17 सेकंद आहेत तुमच्याकडे.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचे अनेक प्रकार असतात. हे एक प्रकारचे कोडे असते. ऑप्टिकल इल्युजन आजकाल खूप ट्रेंडिंग आहे. यात एखादं चित्र तुम्हाला दाखवलं जातं आणि मग त्या चित्रामध्ये एखादी लपलेली वस्तू, प्राणी, पदार्थ तुम्हाला शोधायचा असतो. कधी तुम्हाला यातली चूक ओळखायची असते तर कधी या चित्रात काय वेगळं आहे ते शोधायचं असतं. तुम्हाला हे वाचून लक्षात आलंच असेल की ऑप्टिकल इल्युजन म्हणजे एक प्रकारची परीक्षा. ही परीक्षा तुमच्या मेंदूला चालना देते. मेंदूचा व्यायाम झालाच पाहिजे. हा व्यायाम करण्यासाठी तुम्ही ही कोडी सोडवावीत. आता आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक वेगळा ब्रेन टिझर, ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत.
17 सेकंदात उत्तर शोधा
हा फोटो बघा, या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे T हे अल्फाबेट दिसेल. पण गंमत अशी आहे की यात एक वेगळं अल्फाबेट आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. यात तुमच्या मेंदूचा कस लागणार आहे. ज्या व्यक्तीचं निरीक्षण चांगलं असेल त्याच व्यक्तीला याचं योग्य उत्तर सापडेल आणि तेही वेळेत. कोडं सोडवण्यापेक्षा सुद्धा अवघड आहे की ते दिलेल्या वेळेत सोडवणे. 17 सेकंदात तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे.
जर उत्तर सापडलं नसेल तर…
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? पुन्हा एकदा या चित्राकडे नीट बघा, एकाग्र व्हा. शांत चित्ताने हळू-हळू करत एक एक लाईन तपासा. पण उत्तर शोधताना लक्षात ठेवा की तुम्हाला दिलेल्या वेळेतच याचं उत्तर शोधायचं आहे. तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना याचं उत्तर सापडेल. हे ऑप्टिकल इल्युजन खूप व्हायरल झालंय. F अक्षर सापडले असेल तर अभिनंदन. जर उत्तर सापडलं नसेल तर काळजी करण्यासारखं काहीही नाही खाली आम्ही याचं उत्तर देत आहोत.