SSC results 2022: मुलासोबतच आईनेही दिली दहावीची परीक्षा! दोघंही उत्तम मार्कांनी उत्तीर्ण, जास्त मार्क कुणाला?

आई आणि मुलगा दोघेही सोबत अभ्यास करायचे. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अभ्यास, त्यात बदलेला अभ्यासक्रम, बदलेले परीक्षेचे नियम या सगळ्यावर आज गीता यांनी पती आणि मुलाच्या साहाय्याने मात केलीये. काही गोष्टींचा विचार करायला धाडस लागतं, विचार केल्यावर त्यानुसार मेहनत घ्यायला तितकं सातत्य लागतं हे गीता पासी यांनी दाखवून दिलंय.

SSC results 2022: मुलासोबतच आईनेही दिली दहावीची परीक्षा! दोघंही उत्तम मार्कांनी उत्तीर्ण, जास्त मार्क कुणाला?
जास्त मार्क कुणाला?Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 12:07 PM

मुंबई: गीता अजयकुमार पासी म्हणतात, “मला सकाळीच टेन्शनने जाग यायची. पाच वाजता उठून अभ्यासाला बसायचे. आपण जर नापास झालो तर मुलाला कसं तोंड दाखवणार असं वाटायचं. मुलगासुद्धा दहावीला (SSC Exam) त्यामुळे डबल टेन्शन! आज जेव्हा निकाल (SSC Results 2022) लागला तेव्हा डोळ्यात पाणीच आलं, मुलाला 74 टक्के मिळाल्याचा आणि सोबत मीही पास झाल्याचा मला आनंद आहे.” कधी कधी नुसत्या परीक्षेला बसायचा विचार करण्यालाही धाडस लागतं. TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये (TV9 Marathi Office) काम करणाऱ्या गीता पासी यांनी हे धाडस केलंय. 1996 साली दहावीची परीक्षा दिलेली व्यक्ती आपल्या मुलासोबत जेव्हा 2022 मध्ये परत परीक्षेला बसायचा विचार करते तेव्हा त्या विचारला धाडस म्हणतात, बदललेला अभ्यासक्रम, कोरोनामुळे बदलेले परीक्षेचे नियम, स्वतःचा मुलगा ऑनलाईन अभ्यास करत असताना आपणही तेच करणं या सगळ्याला धाडस लागतं.

विचार करायला धाडस लागतं

गीता यांचा मुलगा आर्यन अजयकुमार पासी हा देखील 74 टक्के गुण मिळवून पास झालाय.आपण पास, मुलगाही उत्तम गुणांनी पास म्हटल्यावर गीता यांचा आनंद गगनात मावेना! आई आणि मुलगा दोघेही सोबत अभ्यास करायचे. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अभ्यास, त्यात बदलेला अभ्यासक्रम, बदलेले परीक्षेचे नियम या सगळ्यावर आज गीता यांनी पती आणि मुलाच्या साहाय्याने मात केलीये. काही गोष्टींचा विचार करायला धाडस लागतं, विचार केल्यावर त्यानुसार मेहनत घ्यायला तितकं सातत्य लागतं हे गीता पासी यांनी दाखवून दिलंय.

हे सुद्धा वाचा

पतीने दिलं प्रोत्साहन!

गीता पासी यांनी 1996 साली दहावीची परीक्षा दिली. त्या परीक्षेत इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास या विषयात त्या नापास झाल्या. घरी आर्थिक अडचण, त्यानंतर लग्न, संसार या सगळ्यात दहावीची परीक्षा पुन्हा देणं शक्य झालं नाही. पण स्वतःचा मुलगा जेव्हा दहावीच्या परीक्षेला बसला तेव्हा पतीने परीक्षेला बसायचं प्रोत्साहन दिलं. आज दहावीचा निकाल लागला त्यात गीता इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल या सगळ्या विषयात पास झाल्या. TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये त्यांचं हे यश केक कापून उत्साहात साजरं केलं गेलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.