New Smartphone | नवीन स्मार्टफोन घ्यायचाय? ‘या’ 3 दमदार फीचर फोनचा आहे पर्याय…
New Smartphone | जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील आठवड्यात Motorola आणि Realme त्यांचे दमदार फीचर स्मार्टफोन बाजारात दाखल करणार आहेत.
New Smartphone | जर तुम्ही नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण पुढील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी नवीन स्मार्टफोन (smartphone) सादर करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात मोटोरोला (Motorola) तसेच रिअलमी (Realme) आपले नवीन फीचर स्मार्टफोन बाजारात आणणार आहेत.
हे स्मार्टफोन येणार बाजारात
Realme GT Neo 3T, Motorola Edge 30 Ultra, Motorola Edge 30 Fusion हे बजेट स्मार्टफोन असून यात, अत्याधुनिक फीचर्सचाही वापर करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात भारतात कोणते स्मार्टफोन येणार आहेत? त्यात कोणते खास फीचर्स असतील? याची सविस्तर माहिती या लेखातून बघणार आहोत.
Realme GT Neo 3T स्पेसिफिकेशन्स
फ्लिपकार्टवर या फोनसाठी बनवलेली मायक्रोसाइट पाहता, हा स्मार्टफोन 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता 80W फास्ट चार्ज सपोर्टसह लॉन्च केला जाईल. हा फोन अवघ्या 12 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल, अशी माहिती मिळाली आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 870 5जी प्रोसेसर वापरण्यात आला आहे. स्मार्टफोनला 120Hz AMOLED E4 डिस्प्ले, 1300 नीट्स पीक ब्राइटनेस, HDR10 प्लस आणि 92.6 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह लॉन्च केले जाईल.
Motorola Edge 30 Ultra स्पेसिफिकेशन्स
हा आगामी स्मार्टफोन देखील पुढील आठवड्यात 13 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला जाणार आहे. फ्लिपकार्टवर बनवलेल्या मायक्रोसाइटवर करण्यात आलेल्या लिस्टींगनुसार, हा स्मार्टफोन 200 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरसह लॉन्च केला जाईल.
Motorola Edge 30 Fusion
या स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली असून त्यानुसार हा हँडसेट 13 सप्टेंबर रोजी लॉन्च केला जाणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 888 प्लस 5जी प्रोसेसर वापरण्यात आले आहे. याशिवाय, 6.5 इंचाचा 10 बिट डिस्प्ले उपलब्ध असेल जो 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअपसह 144 Hz रिफ्रेश रेट देईल.