iPhoneच्या फोटोमध्ये नेहमी 9 वाजून 41 मिनिटंच वेळ का दाखवतात? जाणून घ्या कारण….
अॅपल कंपनीच्या आयफोनची नेहमीच चर्चा असते. iPhone 14 नुकताच लाँच झाला आहे. पण जेव्हाही आयफोनचा फोटो दाखवला जातो, तेव्हा त्यामधील वेळ ही 9 वाजून 41 मिनिटेच दाखवली जाते. असे का, हे तुम्हाला माहीत आहे का?
आज जगभरातल आयफोन प्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस आहे. अॅपल कंपनीच्या (Apple Company) नव्या फोनची (iPhone 14) सीरिज नुकतीच बाजारात लाँच झाली आहे. त्यामध्ये iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro Max Ultra हे फोन लाँच झाले आहेत. यासह Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2देखील लाँच करण्यात आले. तुम्हीही आयफोनप्रेमी असाल तर एका गोष्टीची नोंद नक्कीच तुमच्या मनात झाली असेल. जेव्हाही आयफोनचा फोटो दाखवला जातो किंवा पब्लिश होतो, तेव्हा त्यामधील वेळ ही 9 वाजून 41 मिनिटेच (9.41 time) दाखवली जाते. तुम्ही ॲपल (iPhone) कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन किंवा गुगलवर जाऊन आयफोनचा फोटो सर्च (Search) केलात तर प्रत्येक फोटोमध्ये 9.41 अशी वेळ दिसेल. मात्र असे का करतात, हे तुम्हाला माहीत आहे का?
काय आहे यामागची गोष्ट?
आयफोनच्या फोटोमध्ये दिसणारी वेळ ही सर्व आयफोनमधील सर्वात कॉमन गोष्ट आहे. जेव्हापासून आयफोन लाँच होत आहेत, तेव्हापासून सर्व फोनमध्ये एकच वेळ दाखवलेली असते. हे खप वर्षांपासून सुरू असून अॅपल कंपनीच्या प्रत्येक डिव्हाइसमध्ये वेळ ही 9 वाजून 41 मिनिटे दाखवलेली असते. खरेतर, 2007 साली जेव्हा पहिला आयफोन लाँच करण्यात आला तेव्हा त्या इव्हेंटदरम्यान स्टीव्ह जॉब्स यांची इच्छा होती, की प्रेझेंटेशनदरम्यान जेव्हा फोन दाखवण्यात येईल, तेव्हाची अचूक वेळ दिसावी. जसे, की आयफोन जर 8 वाजता लाँच झाला तर स्क्रीनवरही 8 वाजताची वेळ दिसावी.
जेव्हा पहिला आयफोन लाँच झाला…
फोन लाँच होईल तेव्हा साधारण किती वाजले असतील, याचा अंदाज मांडण्यात आला. प्रेझेंटेशनमधील (फोनच्या) स्लाइडच्या वेळेनुसार हे ठरवण्यात आले आणि जेव्हा फोन लाँच झाला, त्यावेळी वेळ 9 वाजून 42 मिनिटे झाली होती. आधीही कॅलक्युलेशन करून 9 वाजून 42 मिनिटांचीच वेळ सेट करण्यात आली होती. त्यानंतर जेव्हा पहिला आयफोन लाँच झाला आणि त्याचा फोटो दाखवण्यात आला, तेव्हा तीच वेळ झाली होती.
…मग 9 वाजून 41 मिनिटे कुठून आली?
अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला, की त्यावेळी फोन एक मिनिट आधीच लाँच झाला होता आणि तेव्हा 9.42 झाले होते. त्यानंतर 2010 साली ही वेळ बदलण्यात आली आणि तेव्हापासूनच 9 वाजून 41 मिनिटांनी फोन लाँच व्हावा यासाठी प्रयत्न केला जातो. 2010 साली पहिले आयपॅड लाँच झाल्यावर डिव्हाइसचा फोटो दाखवण्यात आला, तेव्हा त्यामध्ये 9 वाजून 41 मिनिटे ही वेळ दिसत होती.
गुगलवरही करता येईल सर्च
तेव्हापासूनच अॅपल कंपनीचे कोणतेही डिव्हाइस सादर केले जाते, त्यामध्ये 9 वाजून 41 मिनिटे हीच वेळ दाखवली जाते. वेबसाइटवर जे फोन दिसतात, त्यामध्येही हीच वेळ दिसते. तुम्ही स्वत: अॅपल कंपनीच्या वेबसाइटवर अथवा गुगलवर जाऊन हे चेक करू शकता.
काय आहे आयफोन 14ची खासियत?
Phone 14 आणि iPhone 14 Plusमध्ये दोन 12 MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. iPhone 14 Proमध्ये 48MPचा कॅमेरा आहे. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Maxमध्ये 1TBपर्यंतचे स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे. iPhone 14 Maxमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असून इनहाऊस चिपसेट A15 वापरण्यात आला आहे. iPhone 14च्या लेटेस्ट सिरीजमध्ये कंपनीने मिनी फोनचे ऑप्शन ठेवलेले नाही. iPhone 14, iPhone 14 Plus या US मॉडेल्समध्ये सिम ट्रे देण्यात आलेला नाही. मात्र, भारतीय मॉडेलमध्ये टीम ट्रे पाहायला मिळेल. पर्पल, एल्फाईन ग्रीन, सीअरा ब्लू, ग्रॅफाइट या कलर ऑप्शनमध्ये हे नविन मॉडेल्स उपलब्ध होणार आहेत.