Instagram Blue Tick : इंस्टाग्रामवरील ब्लू टिकसाठी डोक्यात टीक टीक वाजतेय? या पध्दतीने झटक्यात होईल काम…

तुम्हालाही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लू टिक मिळवायची असेल. परंतु त्यासाठीची पध्दत माहिती नसेल तर काळजी करुन नका… या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ब्लू टिक कशी मिळवता येईल, याबाबतची माहिती अगदी सोप्या शब्दात सांगणार आहोत.

Instagram Blue Tick : इंस्टाग्रामवरील ब्लू टिकसाठी डोक्यात टीक टीक वाजतेय? या पध्दतीने झटक्यात होईल काम...
इंस्टाग्रामवरील ब्लू टिकसाठी डोक्यात टीक टीक वाजतेय?
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 8:32 PM

अनेकदा आपण फेसबूक (Facebook ), इंस्टाग्राम आदी अकाउंटवर मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या अकाउंटवर ब्लू टिक बघत असतो. ब्लू टिक असणं म्हणजे सोशल मीडियावर (Social Media) एक प्रकारे स्टेटस सिंबोल समजला जात असतो. प्रत्येकाला आपल्या अकाउंटवरही ब्लू टिक मिळावी, अशी अपेक्षा असते. परंतु त्यासाठी काय करावे, हे समजत नाही. फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्ट्राग्राम (Instagram) आपल्या युजर्सना त्यांचे खाते व्हेरिफाय करण्याची किंवा ब्लू टिक मिळविण्याची संधी देते. या ब्लू टिकला व्हेरिफाय बॅज म्हणतात आणि हा बॅज युजर्सना बनावट आणि खऱ्या सोशल मीडिया अकाउंटमधील फरक समजण्यास मदत करतो. तुम्हालाही तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय करायचे असेल, तर या लेखातून त्याची सर्व सविस्तर माहिती देणार आहोत.

ब्लू टिक मिळेलच असे नाही

जर एखाद्या युजर्सने इस्टाग्रामवर व्हेरिफाईड बॅजसाठी अर्ज केला असेल तर त्याला ब्लू टिक नक्की मिळेलच असेही नाही. कंपनीने यासाठी काही नियम घालून दिले आहेत, त्याची पूर्तता झाल्यावरच ब्लू टिक मिळत असते. जर तुम्ही इस्टाग्रामच्या नियमांचा आणि धोरणांचा भंग केला तर कंपनी कधीही तुमच्याकडून ब्लू टिक परत घेऊ शकते.

काय आहेत नियम?

युसर्जनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, एकदा तुमचे खाते व्हेरिफाय झाले की, तुम्ही तुमचे अकाउंटवरील नाव बदलू शकणार नाही. याशिवाय, तुम्ही व्हेरिफिकेशन इतर कोणत्याही खात्यात ट्रान्सफर करू शकणार नाही.

हे सुद्धा वाचा

अशा आहे पायऱ्या

– सर्वप्रथम तुम्हाला तुमचे इन्स्टाग्राम खाते उघडावे लागेल.

– खात्यात लॉग इन केल्यानंतर, तळाशी असलेल्या तुमच्या प्रोफाइल चित्रावर क्लिक करा.

– प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला दाखवलेल्या आडव्या रेषांवर क्लिक करा.

– यानंतर तुम्हाला सेटींग्स > अकाउंट > रिक्वेस्ट व्हेरिफिकेशन्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– यानंतर, तुमचे पूर्ण नाव टाकून, पडताळणीसाठी विनंती केलेली कागदपत्रे अपलोड करा आणि नंतर सबमिट बटण दाबा.

टीप : युजर्सनी व्हेरिफिकेशन्सची रिक्वेस्ट सबमिट केल्यापासून 30 दिवसांच्या आत तुमचे खाते व्हेरिफाय झाले आहे की नाही, याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. तुमची विनंती नाकारली गेल्यास तुम्ही पुढील 30 दिवसांनंतर पुन्हा अर्ज करू शकता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.