धक्कादायक! 32 वर्षीय ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेत्या खेळाडूचा राहत्या घरी सापडला मृतदेह, पोलिसांनी…
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूचा राहत्या घरी मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून 32 वर्षीय खेळाडूचा कुठेच थांगपत्ता नव्हता. अखेर पोलिसांना तिचा मृतदेह हाती लागला.
नवी दिल्ली : क्रीडा जगताला हादरा देणारी बातमी समोर आली आहे. कारण अवघ्या 32 वर्षी फिटनेस असलेल्या ऑलिम्पिक खेळाडूने जगाचा निरोप घेतला आहे. अमेरिकेची माजी ऑलिम्पिक चॅम्पियन अॅथलीट टोरी बोवीचं अचानक निधन झाला आहे. 32 वर्षीय टोरीचा मृतदेह फ्लोरिडा येथे तिच्या राहत्या घरी आढळला. टोरीने रियो ऑलिम्पिकमध्ये रिले रेस इव्हेंटमध्ये गोल्डसहीत 3 मेडल जिंकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टोरी थांगपत्ता नव्हता. त्यामुळे ती बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. अखेर तिचा मृतदेह पोलिसांना तिच्या राहत्या आढळून आला. बोवीच्या मॅनेजमेंट कंपनीने तिचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, फ्लोरिडाच्या ऑरलँडोमध्ये राहणारी टोरी बोवी मागच्या काही दिवसांपासून बाहेर दिसलीच नाही. तिचा थांगपत्ता नसल्याने याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत तिचं घर गाठलं तेव्हा तिथे तिचा मृतदेह आढळला.तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.
View this post on Instagram
ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण पदक
बोवीने आपल्या क्रीडा कारकिर्दीत जबरदस्त कामगिरी केली आहे. 2016 आणि 2017 या कालावधीत सर्वाधिक यश मिळालं. रियो डि जनेरोमध्ये 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने 4×100 मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. या खेळात तिने एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली होती.
2017 मध्ये वर्ल्ड अॅथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिथे जबरदस्त कामगिरी केली. लंडनमध्ये झालेल्या या स्पर्धेत तिने रिले स्पर्धेत गोल्ड मेडलची कमाई केली होती. त्याचबरोबर महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पदक मिळवलं होतं.
ऑलिम्पिक संघटना आणि मॅनेजमेंट कंपनीने व्यक्त केलं दु:ख
बोवीची मॅनेजमेंट कंपनी असलेल्या आयकनने इंस्टाग्रावर एक पोस्ट करत तिच्या मृत्यूची माहिती दिली आहे. बोवीचा फोटो शेअर करत कंपनीने लिहिलं आहे की, बोवीच्या मृत्यूने आम्हाला तीव्र दु:ख झालं आहे. आम्ही एक क्लाइंट, एक मुलगी, एक बहीण आणि एक मित्र गमावला आहे. कंपनीने लिहिलं की, तिचं क्रीडा विश्व आणि खासगी आयुष्याचा आम्ही सम्मान करू.
My heart breaks for the family of Tori Bowie. A great competitor and source of light. Your energy and smile will always be with me. Rest in peace.
— ShellyAnnFraserPryce (@realshellyannfp) May 3, 2023
Shocked and deeply saddened to learn of the sudden passing of Olympic gold medallist Tori Bowie. In this moment of grief, let me express my heartfelt condolences to her family and friends. The sports world has lost a true champion.” – IOC President Thomas Bach
— IOC MEDIA (@iocmedia) May 3, 2023
टोरी बोवी वर्ष 2014 मध्ये लांब उडीसाठी तयार होती. त्यानंतर 100 मीटर इव्हेंटमध्ये आली. 2016 मध्ये ऑलिम्पिकच्या 100 मीटरमध्ये भाग घेतला. या स्पर्धेत बोवी 10.83 सेकंदासह दुसऱ्या स्थानी राहिली. 2011 नंतर बोवीन पहिली अमेरिकन खेळाडू आहे, जिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली.