WTC Final 2023 : टीम इंडियाचा पहिला ग्रुप इंग्लंडला रवाना, फ्लाइट पकडणाऱ्या प्लेयर्समध्ये कोण-कोण?
Team India leaves for WTC : चर्चा असूनही दोन मोठे प्लेयर्स या फ्लाइटमध्ये नव्हते. चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी 30 मे रोजी इंग्लंडमध्ये एकत्र जमायच आहे. कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या उमेश यादवला IPL 2023 दरम्यान दुखापत झाली होती.
मुंबई : सध्या भारतात IPL 2023 चा सीजन सुरु आहे. हा सीजन अंतिम टप्प्यात आला आहे. शेवटचे चार सामने बाकी आहेत. आयपीएल संपल्यानंतर सर्व क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे ते, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर. WTC 2023 ची फायनल इंग्लंडमध्ये रंगणार आहे. टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाच आव्हान असणार आहे. आयपीएलमधील लीग स्टेजचे सामने संपले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू गटागटाने इंग्लंडला रवाना होणार आहेत.
टीम इंडियाचा पहिला ग्रुप मंगळवारी इंग्लंडला रवाना झााला. या फ्लाइटमध्ये टीम इंडियाचे दोन मोठे खेळाडू नव्हते. लंडनला रवाना होणाऱ्या टीम इंडियाच्या पहिल्या ग्रुपमध्ये एकूण 20 सदस्य होते.
सर्वांनी कधी एकत्र जमायच?
यात बहुतांश सपोर्ट स्टाफचे मेंबर होते. इंग्लंडला रवाना झालेल्या ग्रुपमध्ये टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड सुद्धा आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी 30 मे रोजी इंग्लंडमध्ये एकत्र जमायच आहे.
पहिल्या फ्लाइटमध्ये कोण-कोण?
सपोर्ट स्टाफशिवाय पहिल्या ग्रुपमध्ये आयपीएलमध्ये प्रवास थांबलेल्या टीमचे खेळाडू सुद्धा आहेत. यात अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज आहेत.
The Man. The Celebration.
Take a bow, @imVkohli ??#INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/QrL8qbj6s9
— BCCI (@BCCI) March 12, 2023
नेट बॉलर म्हणून कोण गेलेत?
विराट कोहलीची RCB आणि आर. अश्विनच्या राजस्थान रॉयल्सचा प्रवास सुद्धा थांबलाय. ते दोघे पहिल्या फ्लाइटने इंग्लंडला रवाना होतील, अशी चर्चा होती. पण विराट आणि अश्विन 24 मे रोजी इंग्लंडला रवाना होऊ शकतात. बंगालचा मीडियम पेसर आकाश दीपक, दिल्लीचा ऑफ स्पिनर पुलकित नारंग, पहिल्या ग्रुपसोबत लंडनला रवाना झालेत. हे दोघे नेट बॉलर म्हणून टीमसोबत असतील. उमेश यादवसोबत कोण जाणार?
कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या उमेश यादवला IPL 2023 दरम्यान दुखापत झाली होती. पण आता तो फिट आहे. लंडनला जाण्यासाठी तयार आहे. तो पहिल्या ग्रुपसोबत लंडनला जाणार होता. पण तो सुद्धा नंतर जाईल अशी शक्यता आहे. उमेशसोबत राजस्थानचा लेफ्ट आर्म पेसर अनिकेत चौधरी आणि आंध्रचा लेफ्ट आर्म पेसर पृथ्वी राज सुद्धा जाऊ शकतो.