Naveen Ul Haq, IPL 2023 : विराट कोहली याच्याशी भांडणारा नवीन उल हकचं एमएस धोनीबाबत असं वक्तव्य, म्हणाला…
IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धा अजून संपली नसली तरी खऱ्या अर्थाने गाजली ती विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या भांडणाने. या भांडणासाठी अफगाणिस्तानचा नवीन उल हक जबाबदार होता. पण आता त्याने धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा सामना विराट आणि गंभीरच्या भांडणामुळे क्रीडारसिकांच्या कायमच लक्षात राहील. कारण पहिल्या सामन्यात रंगलेल्या नाटकाचा शेवट दुसऱ्या सामन्यात भांडणाने झाला. या भांडणासाठी अफगाणिस्तानच्या नवीन उल हकला जबाबदार धरलं जात आहे. दुसरीकडे गंभीर आणि धोनीचा वाद सर्वश्रूत आहे. आता अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या भेटीत नेमकं काय झालं याबाबत अंदाज बांधले जात आहे. आता नवीन उल हकने या भेटीत नेमकं काय झाले ते सांगितलं आहे.
लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणांवर समाधान मानावं लागलं. यावेळी नवीन उल हकने महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
“सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी माझा आदरर्श आहे. मी त्याला भेटू इच्छित होतो. मी त्याच्या कर्णधारपदाखाली खेळू इच्छित होतो. पण त्याची भेट होणं एक स्वप्नपूर्ती आहे. या क्षणाचा फोटो मी घरी फोटोफ्रेम करून लावणार आहे.”, असं नवीन उल हकने भेटीनंतर सांगितलं.
Everyone loves a post-match meeting with the ? pic.twitter.com/uMk2Xrxo88
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 4, 2023
अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हकची विराट कोहलीसोबत तू तू मै मै झाल्यानंतर 3 मे रोजी त्याने धोनीची भेट घेतली. बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात नवीन जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा विराटसोबत शाब्दिक चकमक सुरु झाली होती. सामन्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि गौतम गंभीर या भांडणात पडला आणि प्रकरण वाढलं.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नवीन आणि कोहली मधील वाद शमवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कर्णधाराचं काही एक ऐकलं नाही. राहुल विराटशी बोलत असताना त्याने नवीनला जवळ बोलवलं. कारण माफी मागून वाद संपवणं हा हेतू होता. पण नवीनने स्पष्ट नकार दिला. त्याच्या अशा वागण्याने राहुलला देखील धक्का बसला. त्यामुळे नवीनला नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावले होते.
लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह.